[ २७८ ]
शके १६७४.
कैलासवास केलियावर तुह्मी असा डौल घातलात कीं, सर्वाध्यक्षता आपली, आमचे तर्फेचे माणसानें राजाजवळ एकांती बसूं देखील नये. रात्रीं दिवसा तुमची चौकी. ते प्रसंगी जे जे तुमचे पक्षीं लागले ते वाचत चालले, असें दिसों लागतांच वडूथचे तळावर रामाजीबावाजवळून तुह्मास सांगितले की, ऐसे न करावे. बाबानींहि सांगितलेच असेल. परंतु, आपण बहुमान मात्र बाबासी करीत गेलेत. ते गोष्टीचीहि आह्मी गमच खादली. तदोत्तर, सातारियासी दाखल होताच, आह्मीं शिवाजी हरि, देवराव, बाबूजी नाईक यांचा अभिमान धरिला. तुह्मीं जे माणूस आह्मांकडे आलें तें माडीतच चाललेस. तथापि आह्मी, शिवाजी हरि केवळ तुमचा ग्रामकंटक व लबाड ऐसें जाणून, त्याचा अभिमान सोडिला; देवरायास पोटास मात्र देविलें ; नाइकास कर्णाटक द्यावें, नाहीं तर, पांचा साताचा सरंजाम द्यावा. तेव्हां तुह्मीं बाबानीं मिळोन कर्णाटक मस्त हस्ती जलाली फकिराचे दारी बांधला-ह्मणजे दउलतीची फजिती केली. अखेर कर्णाट काढलें. तेव्हां सरंजामहि न दिल्हा. याप्रकारे ज्या ज्यांनी मुख्यपणें आमचा पक्ष मनांत आणिला ते सर्वस्वें बुडाले. या प्रसंगामुळें फारच आह्मास राग येऊन आह्मीं रुसून बाहेर आलों. तें समयीं तुह्मीं बाबांनी आपले जागा विचार करून आह्मापासून इमान तुह्मास देविलें. तुह्मीहि शफथ केली कीं, सहसा स्वामीचे हिताविशीं मजपासून कायावाचामनें अंतर होणार नाही. त्या दिवसापासून तुह्मीं कोणे प्रकारें चाललेस, हें मी जाणतो; मी कसा चालतों हें तुह्मी जाणत असाल. सांप्रत काळीं नाना प्रकारें लोक सांगतात तें एकीकडे ठेवून तुह्माजवळून पुर्ते अंतर पडेल तेव्हां आपणहि अंतर करावें. इतक्यांत, तुह्मीहि सर्व प्रकारें आमचे पक्षी, हें भाऊनीं बाबांनी सांगितलें. तदनरूप तुह्मीं गडकरीयांस भरवसा पुरवून राजे आईसाहेबास खालीं आणावयाचा विचार केला; चवकी मारली. एका दो दिवशीं खाली उतरून सुरळीत चालावें, दुलौकिक उभय पक्षींचा वारावा, तो विचार टाकून, बाबा रुसून घरास गेले. हें आइकतांच सुस्त पडलेत. माणसें देखील पळवूं लागलेत. हें कांहीं तुमचें इमानास योग्य नाहीं. बाबाचा आमचा रुसवा जाहाला तर तुह्मांस इतकी योग्यता आहे --