[ २८३ ]
श्री शके १६७५ ज्येष्ठ वा। ४.
श्रीमंत महाराज राजश्री-आईसाहेब यांणी राजमान्य राजश्री जगजीवन पंडीत प्रतिनिधी यांसी आज्ञा केली ऐसी जेः- राजश्री गोपाळराव यादव यांची बटीक पळोन बुधास गेली. ते आणावयांबा। मशारनिल्हे यांनी माणसें पा।. ती बटीक घेऊन येत होतीं, ते मार्गी वस्तीस मोजे शेंदुरजणे येथें राहण्यास आले. तेव्हां गांवकरी यांणीं बटीक व माणसांची चिरगुटें घेतलें होतें ह्मणून हुजुर विदित झालें. त्यावरून गांवास हुजरे रवाना केले आहेत व तुह्मांस हें आज्ञापत्रे सादर केलें आहे, तरी गांवास ताकीद करून बटीक सातारा रवाना करणें. जाणिजे. छ १७ माहे शाबान सु॥
अर्बा खमसैन मया व अलफ. बहुत लिहिणें तर सुज्ञ असा.
लेखना
वधी.
पो।
छ. २८ रमजान.