[ २८० ]
श्री शके १६७५ चैत्र शुद्ध ३.
राजश्री दामोधर माहादेव व पुरुषोत्तम माहादेव गोसावी यांसी :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असावें. विशेष. श्री भक्तपरायण राजश्री तिमण्णा गोसावी यास देवाच्या पुजा नैवेद्य ब्राह्मणसंतर्पणकरितां प्रांत अंतरवेद येथें दरगांवास अमल आहे. त्यास, रु॥ १ येकप्रमाणें दरसाल करार करोन हें पत्र तुह्मांस दिल्हें असे. त्यास तुह्माकडील महाल बि॥.
१ पा। कनोज
१ पा। सोरा
१ प्रा। गंगेरी
१ पा। बचलाणें
१ पा। सिकंदरा
१ पा। जलाली
----
६
सा महाल प्रांत अंतरवेद येथील दरगांवास दरसाल रु॥ १ येक प्रों। आकारून जमा करून श्रीस प्रविष्ट करीत जाणें. नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची नकल घेऊन भोगवटियास हें पत्र माघारें देणें. छ. १ जमादिलाखर, सु॥ सलास खमतैन मया अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
मोर्तब
बार रु॥ सुद.
श्री ह्माळसाकां-
तचरणीं तत्पर खंडो-
जीसुत मल्हारजी
होळकर.