[ ३३४ ]
श्री शके १६७४ पौष वा। ३
पै॥ छ २९ रबिलाखर,
सन सबा खमसैन.
श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेबाचे सेवेसीः--
विनंति सेवक बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना. येथील वर्तमान ता। छ २१ रबिलाखरपर्यंत साहेबाचे कृपावलोकनेकरून यथास्थित असे. विशेष. साहेबी आज्ञापत्र सादर केलें. तेथें आज्ञा की, बहुत दिवस वर्तमान कळत नाहीं, तरी सविस्तर विनंतिपत्रीं लेहून संतोषवीत गेलें पाहिजे. ह्मणोन आज्ञा. ऐसियास, सेवकाचें वर्तमान सर्व साहेबांस विदित आहे. जे समयीं वर्धमानकृपा सेवकाचे मनोदयानुरूप करतील ते वेळेस सेवेसीं अंतर होणार नाहीं. श्रुत होय. हे विज्ञापना. +