[ ३५८ ]
श्री
१६७७.
सेवेसी विज्ञापना ऐसीजे. आपल्या वकालतीचा रोखा कांहींच नाहीं. कधी आपले मार्फत बादशहास पत्रें नाहींत. आपला वकर नाहीं सांप्रत सरदार फौज जवळ असतां बाळारायाची हवेली बसंतखोज्यानें हिरावून घेतली, व होळकरांचे वकील चोरमहालांत राहात होते, तेथून त्यांस काढून दिल्हे. ऐशास, फौजा देशीस गेल्यावर आह्मांसहि या हवेलींत राहूं देणें कठीण ! असें जाणून, सर्वांचे वकील हाजीर हजारा कोसांवरील व अवघे उमराव हाजीर नजर देतांच बनतें जें सर्व वकायनिगार चहूंकडे खबरा लिहितात. याजकरितां, हे गोष्ट हिसामुदीखानाच्या सांगितल्यावरून श्रीमत् दादासाहेबांच्या तर्फेनें केलें. श्रुत होय. हे विज्ञाप्ति.