लेखांक २८४
श्री १६१२ ज्येष्ट वद्य ८
नकल
राजश्री माहादजी सामराज देशाधिकारी वर्दन लेखक प्रांत मावल गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र निलकंठ नमस्कार सु॥ इहिदे तिसैन अलफ राजश्री सर्जाराऊ जेधे देशमुख ता। भोर तर्फ रोहिडखोरे हे हुजूर भेटीस आले याणी विनती केली की इदलशाहचे वेलेसी इसाफतीचे गाव इनाम चालत होते बितपसिल एणेप्रमाणे इसाफतीचे गाव च्यारी व इनाम ठिकाण
इसाफतीचे गाव मौजे इन्हवडीस इनाम
१ मौजे चिखलगाऊ टके ६ साहा एकूण टके
१ मौजे आबोडा
१ मौजे नाटिबी
१ मौजे कारी
-------
४
एक आहे याप्रा। चालत हेते तेणेप्रमाणे च राजश्री कैलासवासी छत्रपति स्वामीचे वेलेसी चालत होते त्याउपरी आपला भाऊ सिवाजी जेधा यात व आपणात वडिलधाकटेपणाचा कथला मौजे कारी निमित्य लागला या निमित्य उभयता राजश्री पावेतो भाडत गेलो याकरिता राजश्री कैलासवासी स्वामीने निवाडा होये तोवरी आदिकरून देशमुखी अमानत करून देशमुखीस मुतालिक ठेऊन त्याच्या हाते स्वामीकार्य घेत होते ऐसियासि साप्रत सिवाजी जेधा मृत्यु पावलियावरी आपले बाप भाऊ व आपण समजलो आपला वडिलपणाचा मानास कारी गाव आपणास दिल्हा आहे तरी कृपाळु होऊन आपले इसाफतीचे गाव ठिकाण पहिले राजश्री कैलासवासी स्वामीचे वेलेसी चालत होते तेणेप्रमाणे चालविले पाहिजेत ह्मणून तपसील विदित केला त्यावरून मनास आणून सर्जाराऊ जेधे ह्मणजे कदीम विस्वासू बहुत दिवस कस्ट मशाखती केल्या आहेत व राजश्री कैलासवासीचे वेलेसी हि थोर थोरी काम करून दिल्हहे आहेत हाली हि गनीमान कितेक किले कोट घेतले आहेत ते हस्तगत करून घ्यावे स्वामीकार्ये करावी यास्तव कृपाळु होऊन राजश्री कैलासवासी छत्रपतिस्वामीचे वेलेसी देविले इसाफतीचे गाव ठिकाण चालिले असतील तेणेप्रमाणे चालवावे ऐसा तह करून हे आज्ञापत्र तुह्मास सादर केले असे तरी राजश्री कैलासवासी स्वामीच्या सनदा असतील त्या मनास आणणे सनदाप्रमाणे भोगवठा जाता आहे किंवा नाही हे मनास आणून सनदा रुजू घालून जेणेप्रमाणे कैलासवासी स्वामीचे वेलेसी यास गाव व ठिकाण याचे चालिले असेल तेणेप्रमाणे बिलाकसूर याच्या दुमाला करणे तालिक घेऊन मुख्यपत्र परतून देणे जाणिजे छ २१ रमजान पा। हुजूर मोर्तब
जोडगिरीस मोर्तब २
बार सुरुसूद बार