[ ३६६ ]
श्री शके १६७८ माघ शुद्ध १.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधरपंत दादा स्वामीचे सेवेसीः--
पो। गोपाळराव त्र्यंबक सां। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ता। छ ३० रा।खर मा। रणोद जाणून स्वकीय कुशळ लेखन करीत जावें. विशेष. राजश्री गोविंदरावजी यांचा वृतबंध माघ शुद्ध २ स नेमस्त केला आहे, तरी येऊन मंडपशोभा करावी, ह्मणोन लि॥. ऐशास, आह्मीं पछारेस होतो. तेथील गुंता उरकोन सरदारांचे आज्ञाअन्वयें लस्करास जावयासि निघोन मुकाम मजकुरास. येथून दरकूच जावयाचा उद्योग. एक दोन रोजां कूच करोन जाऊं. आपण नेमले तिथीस व्रंतबंधाची कार्यसिद्धि संपादावी. व रविसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पा। ते पावोन स्वीकारिले. येथून आपल्याकारणें संक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पा। आहेत. आदरें स्वीकारिले पाहिजेत. वरकड आपण मोरवरीस कांहीं दिवस राहाल किंवा लखनउकडे जाणार तैसें लिहावें. सदैव पत्रप्रेषणीं संतोषवीत जावें. * बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती.