[ ३६९ ]
श्री शके १६७९ वैशाख वद्य ११.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारायणजीबावा चिटनिवीस स्वामी गोसावी यासी, व राजश्री कारखानवीसबावा स्वामीचे सेवेसीः--
पोष्य मुकुंद श्रीपत कृतानेक दंडवत प्रा। विनंति उपरि येथील कुशल ता। वैशाख बहुल एकादशी मंदवार, मुक्काम सिरें, नजिक श्रीरंगपट्टण जाणून स्वकीय कुशल लेखन करित गेलें पाहिजे. यानंतर : आह्मांकडील वर्तमान तर तपशिलें ल्याहावयास अवकाश नव्हता. श्रीमंतानी आह्मांस सिरहाचे मुकामीं छावणीस ठेविलें. श्रीमंतांचे आज्ञाप्रों। राहावें लागलें. त्यास, आपणांजवळ जिरंजीव बाबा आहेत, त्यांचा परामर्ष वरचेवर घेत जाणें. जे काय घरी लागेल त्याचा समाचार वरचेवर घेऊन, त्याप्रों। पावीत जाणें. तुह्मांवर बेफिकीर असों ! कागदपत्र पाठवून वरचेवर समाचार आणावा तर छावणी दूरदेशीं जाहाली; यास्तव आमचा सर्व मजकूर आपणांवरच आहे. बहुत तपशिलवारें ल्यावें तर आपण कांहीं परकी नाहीं. आमची तारंबळच जाहली आहे. * सारांश आपण उभयतां तेथें आहेत. चिंता करीत नाहीं. घर नीट करून देवावें. आपणांकडील सविस्तर लिहित जावें. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.