[ ३६८ ]
श्री शके १६७८ फाल्गुन वद्य ११.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर माहादेव व पुरुषोत्तम माहादेव गोसावी यासीः--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र मथुरेच्या मुकामींहून पाठविलें, तें प्रविष्ट जाहालें. अबदालीनी दिल्ली घेतली; पातशाहा, वजीर कैद केले; स्वामींनी इकडें लौकर यावें; ह्मणोन विस्तारें लिहीलें, तें कळलें. याउपरि तेथील वर्तमान वरच्यावरी लिहीत जाणें. दिल्लीस राजश्री बापूजी माहादेव आहेतच. त्याजकडून वर्तमान आणऊन लिहीत जाणें. बिजेसिंग, माधोसिंग, बाजे उमदे अमीर यांचेही बारीक मोठें वर्तमान लिहीत जाणें. चिरंजीवास वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. ज्याप्रों। सांगतील, तैसें रोज करणें. अंतरबाह्य करीत जाणें; व तें मान वरचेवर लिहीत जाणें. छ २५ जमादिलाखर. हे विनंति.
( लेखनसीमा. )