[ ४१२ ]
श्री शके १६८२ फाल्गुन वद्य ६.
राजश्री सुभानजी जाधवराव बाबा गोसावी यासीः-
-॥ छ श्रीसकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ रामचंद्र शामराज सुभेदार, प्रा। नरवर, आशिर्वाद विनंति येथील क्षेम, ता॥ छ १९ माहे साबान, मु॥ शिऊपुर, प्रों। मजकूर, येथें स्वस्तिक्षेम असो. विशेष. आपण कृपा करून पत्र अजूरदार काशीद याजबरोबर पाठविलें तें छ १८ साबानीं पावलें. वर्तमान कळों आलें. इलडील वर्तमान तरी सविस्तर खांसी यांनी व धोंडोपंत यांनी लिहिले आहे त्याजवरून कळों येईल. खासे राजश्री मल्हारराव होळकर याजपाशीं पछोरावर, नजीक गालीएर, येथें सुखरूप आहेत. ईश्वरें प्राण वांचवून स्वस्तिक्षेम आणिलें. बा। रा॥ बाबुजी नाईक व सदाशिव रामचंद्र व त्रिंबक शिवदेव व गोपाळराव बापोजी ऐसे वे रा॥ विठ्ठलराव शिवदेव पंचवीस तीस हजार फौज सडी आहेत. गोहद प्रांते संचारितात. दिल्लीकडील वर्तमान तरीः गिलचियाचे मुलकांत नादीरशाहा लाख फौज आली. पातशाहात गिलचियाची घेतली. याजमुळें तो दिल्लीहून छ ११ साबानी जातो. सुज्यातदवला यमुनापार होऊन आयुध्येस चालिला. लबाडी करावयास नजीबखान रोहिले व माधवसिंग आहेत. परंतु त्यांच्यानें चमेली अलीकडे येवत नाहीं. सलुख करावयाबा। वकील रा॥ मल्हारराव याजकडे आले आहेत. यांच्या मुद्दियाप्रमाणें तह झाला तरी करतील. श्रीमंत रा॥ भाऊसाहेब पाणिपता अलीकडे अल्लाजाटाच्या मुलकांत व जनकोजी सिंदे पांच हजार फौजेनसी सुखरूप आहे. कुंभेरीहून पत्रें जाटाची मल्हारबास आली. वकील बापोजीपंताचीं आलीं. त्यास आणावयास सुरजमल्ल जाट जाऊन घेऊन येतात. याजउपरि ईश्वरें दिवस उत्तम आणिले आहेत. नष्टचर्यास कांहीं बाकी राहिली नव्हती. परंतु उगवते दिवस आलेसें दिसतें. ईश्वर काय करील तें पाहावें.