[ ५९४ ]
श्रीशंकर. शक १६४६ फाल्गुन वद्य १२
श्रीराजा शाहुचरणी
तत्पर संताजी
भोसले नीरंतर
छ मा। अनाम नंदलाल मंडलोई प्रा। इंदूर प्रांत माळवे यांसि सवाई संताजी भोसले. सु॥ सन खमस अशरीन मया व अलफ. फौजेच्या उस्तवारीबद्दल त्या प्रांते थोडीयाच रोजांत येत असो. त्यास, सांप्रत राजश्री आपाजीपंत व राजश्री गोपाळपंत याजपासी कागदपत्र देऊन महाराणाकडे उदेपुरास रवाना केले आहेती. हे तुह्मापासी येतील. यासि खर्चास रुपये ५०० पांचसे परगणे मजकुरपैकी नाजुक काम समजोन आधि आधि याचे पदरीं रुपये घालून, समागमे माणसें आपलीं देऊन, पलिकडे पोहचावणे. या कार्यास एका घडीचा विलंब न लावणें. साल गुदस्ता रुपये १५००० पंधरा हजार पडले होते, त्यापैकीं राजश्री विसाजी हरी याजबा। घोडी व कापड पांच हजार रुपयांचे पाठविलें. बाकी रुपये १०००० दहा हजार राहिले. हे मा।रउननिल्हेस पाठवून देणें. रुपयेही आखर देणे लागेल. परंतु पाठविलेयामध्या उत्तम आहे. कळलें पाहिजे. छ २५ जमादिलाखर
मोर्तबसुद