[ ५८९ ]
श्री. शक १६४२ आश्विन वा। १२
श्रीमार्तंडचरणि
दृढभाव शीवजी-
सुत रघोजी बारगळ
निरंतर
राजश्री राउ नंदलाल मंडलोई पा। इंदूर गोसावी यांसि.
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारराऊ होळकर दंडवत. सु॥ इहिदे अशरीन मया व अलफ. पा। मजकूरच्या ऐवजाचा करार जाला. ते समयीं अंतस्त, रुपये चार हजार केले आहेत. ते तों तुह्मी दिल्हेच असतील. नसतील दिल्हे तरी सदर्हू रुपये राजश्री नारो शंकर दि॥ मा।र यांजवळ झाडियानसी देणें. हैगै न करणे. हैगै कराल तरी एका दों रोजां तुमचे भेटीस आह्मासच येणे लागेल. मग जें होणे तें होईल. आजीं छ २५ जिल्हेजीं मुकाम चिखलदियानजीक जाला आहे. पुढें मजल दरमजल त्या प्रांतीं येतों. तरी तुह्मी सदर्हू रुपये व बाकी मा।रनिलेजवळ देणे. जाणिजे. छ २५ जिल्हेज.
मोर्तब
सुद.