[ ५९३ ]
श्री शक १६४६ माघ शु॥ १
० श्री ॅ
राजा शाहु नरपति
हर्षनिधान । बाजि
राव बलाल प्रधान.
छ मा। अनाम नंदलाल मंडलोई पा। इंदूर यासि बाजीराउ बल्लाळ प्रधान. सु॥ खमस अशरैन मया व अलफ. तुह्मी विनंतिपत्र बराबर शंकराजी रघुनाथ पाठविले ते प्रविष्ट होऊन वर्तमान निवेदन जाहलें, व तुह्माकडील कितेक वर्तमान शंकराजी रघुनाथ यांनी निवेदन केलें त्यावरून कळों आलें. तुह्मी आपणाकडील मातबर माणूस पाठवून परगणे मजकूरची खंडणी चुकवायाची होती, ते गोष्ट तुह्मी न केली. हे गोष्ट तुह्मी बराबर केली आहा, ऐसे नाही. हाली आह्मी अलीमोहनच्या रोखें जातों. तिकडील काजकाम जालियावर ते प्रांते येऊन. राजश्री केशो महादेऊ वगैरे सरदार ते प्रांते आले तर त्यांस परगणे-मजकूरचा ऐवज न देणे. त्यांजला तुह्मी ऐवज दिल्हिया तुह्मास खंडणीत मजुरा पडणार नाहीं. कितेक जबानी शंकराजी रघुनाथ यांस सांगितले आहे. ते तुह्मास सांगतील त्याप्रमाणें वर्तणूक करणें. जे गोष्टीनें बरें होऊन तुमचा गौर होई ते गोष्ट करून घेणे. जाणिजे. छ रबिलावर. पा। हुजूर.
लेखन
सीमा