[ ५९२ ]
श्री
शक १६४६ पौष वद्य १२
० श्री ॅ
राजा शाहुनर
पति हर्षनिधान
बाजीराव बलाल
प्रधान
छ मा। अनाम मंडलोई व कानगो पा। इंदूर यांसी बाजीराऊ बलाल प्रधान. सु॥ खमस अशरीन मया व अलफ. पा। मजकूर राजश्री चिमणाजी बलाळ यांजकडे पागेस मुकासा दिला आहे. तरी तुह्मी मशारनिलेसी रुजू होऊन पा। मजकूरचे पडलें पान आकार होईल त्याचे चौथाई वसूल मानिलेकडे सुरळित देणे. खलेल न करणे. जाणिजे. छ २५ रबिलाखर. पा। हुजूर.
लेखन
सीमा