लेखांक ३०९
श्री
राजश्री त्रिंबकराव बादल गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीआलंकृतराजमान्य श्रीा फतेसिंग भोसले रामराम सुहूर सन इसन्ने सलासीन मया व अलफ राजश्री कृष्णाजी प्रभु हे मौजे कर्जे ता। रोहिडखोरे येथे यराहातात त्यासि मा।रनिले घर बाधीत आहेत त्यास राजश्री राणोजी नाईक याणी हि माने केले आहे की याचे घराचे साहित्य करावे तरी तुह्मी हि यासि सांगोन वासे पाचसे देवऊन याचे घर होये ते करवणे याचे सर्वप्रकारे अगत्य आहे जाणिजे २६ रमजान बहुत काय लिहिणे