[ ५८८ ]
श्री.
श्रीमंत राजमान्य याविराजित राजश्री नंदलालजी मंडलोई पा। इंदूर
गोसावी यासि
सेवक मुकुंद नरहरी कृतानेक नमस्कार विनंति उपरि. येथील क्षेम जाणौन स्वकीय लेखन करणें. विशेष. पूर्वी हरी जासूदाबराबरी पत्रें पाठविलीं ते पावलीं असतील. त्यांना जौबसाल अद्याप आला नाही. तरी सत्वर जौवाबसाल पाठविला पाहिजे. जोंवरि जौवाब ये तोंवर फौज प्रगणियांतून जात नाहीं. नुकसान आहे. या उपर तुह्मी विवेकी आहां.