[ ६०० ]
श्री फाल्गुन शु॥ ७ शके १६५१
श्री भवानीशंकर
मुधोजीसुत देसो-
जी वाघ निरंतर.
छ राजमान्य राजश्री नंदलाल मंडलोई प्रा। इंदूर यासी
देसोजी वाघ नामजाद किले मांडवगड सु॥ सलामीन मया अलफ. तुह्माकडून राजश्री नारो शंकर आले. यांणीं वसूलाविसी बेभाट घेऊन आले की तुह्मी खालमेली घालून आजीचें उद्यावर घालिता. या विचारेकरून निभाव होणार नाहीं. करारजमा इंदूर जेपालपूर सावेर केली. त्याप्रमाणें वसूल सिताबीनें रो। नारोपंताचे मार्फाती केलियावर पाठविणें. दुसरे, बाघोद वगैरे किलियाच्या जागिरि आहेत त्यांचा चवथाई मोकास बाबेचा करार मुकरर जमा इकडे असेल तेच करार. परंतु जागिरिचे ३ हिसियाची जमाबदीस जमीदबार कानगो किलियावर पाठविणें. जमा वसूल हिसेब मनास आणून, बाकी निघेल ते विल्हे करून घेऊन जाजती तोसीस लागणार नाही. याजकरितां आपला एक भला माणूस हिसेबास पाठविणें. त्याचे मार्फतीनें करार करून येविसी राजश्री उदाजी पवार याचींही पत्रें येतील, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? जाणिजे. छ. ६ साबान.