[ ६०५ ]
श्री.
शके १६५२
श्री मार्तंड चरणी दृढ भाव
होळकर मलार
राव
राजश्री नंदलाल मंडलोई पा। इंदूर गोसावी यासी
छ अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारराऊ होळकर दंडवत. सु॥ इहिद्दे सलासीन मया अलफ. आह्मी घाट चढोन देपाळपुरावर आलों. ये प्रांतीचा बंदोबस्त करावा लागतो. याजकरितां राजेश्री निळोपंत दिमत राजश्री पंतप्रधान हे तुह्माकडे पाठविले आहेत. तर तुह्मी भेटीस येणे. कितेक वर्तमान मशारनिले मुखवाचा सांगतील ते मनांत आणून निस्संदेह भेटीस लौकर येणे. व जेजाला ८० ऐशी व दारू खंडी सवा व सिसें मण अर्धा पाठविणे. व उंटें पन्नास ऐशी तयारी करून पाठवणे. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
० ॅ
मार्तबमुद