[ ५९७ ]
श्री. आषाढ वद्य २ शके १६५१
श्री मार्तंडचरणी
तत्पर मुकुंद
नरहर निरंतर
राजश्री नंदलाल मंडलोई गोसावी यासि
छ अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य सेवेसी मुकुंद नरहर नामजाद प्रा। तकटी दि॥ रा॥ उदाजी पवार सु॥ सलासैन मया अलफ. प्रा। बागोद येथील खंडणी साल गुदस्ता रा। रा। मलारराऊ होळकर यांनी केली. त्याप्रमाणें वसूल भरून पावला. आपला दामदिरिम राहिला नाहीं. + + + देशमुखी, चौथाई, सायेर, कारकुनी कुलबाब भरून पावलों. जाणिजे. रा। १५ माहे जिल्हेज.
मोर्तबसुद