[ ५९९ ]
श्री. कार्तिक वद्य ५ शके १६५१
० श्री ॅ
राजा शाहु नरप-
ति हर्षनिधान ।
बाजीराव बलाळ
मुख्य प्रधान
छ मा। अनाम नंदलाल मंडलोई पा। इंदूर यांसि बाजीराउ बलाळ प्रधान सु॥ सलासीन मया अलफ. राजश्री कुसाजी गणेश हुजुर आले. यांणी कितेक अर्थ निवेदन केला. त्याजवरून सविस्तर कळलें. ऐसियास आमची स्वारी ते प्रांते सत्वरीचे आहे. माळवियाचा बंदोबस्ताचा अर्थ राजश्री लाला हरिनारायण यांणी लिहिला व जबानी सांगेन पाठविला होता. त्यास, प्रांत मजकूरचा बंदोबस्त जालिया रयत निरुपद्रवी राहून दुतर्फा किफायतच आहे एतद्विषयीं एथून उज्जैनच्या सुभ्यास व लाला हरनारायण यांस कितेक अर्थ-लेख करून पत्रें पाठविलीं व जबानी मा।रनिले सांगतील. तरी तुह्मी त्यास विचाराच्या चार गोष्टी सांगोन, मुलकाचा तह करून, दुतर्फा कमावीस सुरळित चालवणे. जरी हे गोष्टी त्यांचे विचारास न येच तरी आह्मी ते प्रांते येतच आहों. आमची फौज तिकडे आलियावर मुलुक सुप्रयुक्त राहतोसा नाहीं, खराब होईल. तेव्हां नुकसान होणे तें त्यांचे होईल. वरकड कितेक अर्थ मारनिले तुह्मास सांगतील त्याजवरून कळेल. सारांश, तुह्मी मातबर व कार्यकर्ते एकनिष्ठ आहां. हरएक विचारास चुकतासें नाही. तुमचें सर्व प्रकारें अगत्य आहे. तदनरूप बलाईस होणे तें होईल. आपला खातरजमा असो देणे. आमची स्वारी रेवातीरास येतांच तुह्मी मातबर मनुष्य हुजूर पाठवून देणे व त्यांजकडीलही मातबर मनुष्य बराबर घेऊन तुह्मीच रेवातीरीं भेटीस येणे. जाणिजे. छ १९ रबिलाखर. आज्ञा प्रमाण
लेखन
सीमा