[ ६०६ ]
श्री.
फाल्गुन शु॥ ५ शके १६५२
० श्री ॅ
राजा शाहु
नरपति हर्ष-
निधान बाजिराव
बलाल प्रधान
राजश्री तेजकर्ण मंडालोई व कुंवर न्याहालकर्ण प्रगणे इंदूर गोसावी यास
अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य स्नो। मलारजी होळकर व राणोजी सिंदे दि॥ पंत प्रधान दंडवत. सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ. गिरमाजीपंत व भुटोजी तुह्माकडून आले. याणे हजूर कितेक वर्तमान निवेदन केलें व रा॥ नारोपंतीहि सांगितलें, त्यावरून कळों आलें. ऐसियासी, हाली राजश्री नारो शंकर व रा। मलार गोपाळ उभयतास कितेक मतलब सांगोन पाठविले आहेत, व गिरमाजीपंतही निवेदन करतील. त्याजमाफिक कबूल करून, तुर्त पोख्ता ऐवज जमा करून हजूर पाठविणे. खरीफाचा हंगाम होऊन गेला, अद्यापि तुह्माकडील निर्गम नाहीं. तरी याउपरि पोख्ता वसूल पाठवून देणे. आमचीहि फौज त्याप्रांते अविलंबेच येत आहे. तुह्मास मग जे गोष्टीनें लागे ते गोष्ट न करणे. तुमचा आमचा स्नेह जो आहे तो पुढें वृद्धि चाले, ऐसी गोष्ट करणें. वरकड मजकूर कित्येक पंत उभयतां मा।रनिले सांगतां कळों येईल. जाणिजे. छ ४ रमजान. पा। हुजूर. लेखनसिमा