लेखांक ३५४
श्री १६१३ भाद्रपद वद्य १३
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १८ प्रजापतिनाम संवत्सरे भाद्रपद बहुत त्रयोदशी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणी समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी राजमान्यराजश्री शंकराजी पंडित सचिव यासि आज्ञा केली ऐसि जे प्रयागजी दिनकरराऊ हतनोलीकर याचा कबला तुह्मी दस्त करून आणिला त्याउपरि तो हि कौल घेऊन तुह्माकडे आला त्यास तुह्मी चालीस हजार रुपये दंड बाधिला कबिला अटकेमध्ये ठेविला हे वर्तमान पाहिले विदित जाले आहे ऐशास सांप्रत मा। सर्जाराऊ जेधे देसमुख ता। रोहिडखोरे हुजूर आले त्याणी त्याविशी विनंती केली की मिरासदार आहे त्याचे हाते स्वामीकार्य विशेश होणार तरी त्यास जमान घेऊन मोकले करावे आणि कार्यभाग सांगावा ह्मणौनु तरी दिनकरराऊ मिरासदार व कार्याचा आहे त्यास जमान मख्तसर मर्हाठे लोक व देसमुख घेऊन त्याचा कबिला आपले कबजाबत हरएक जागा ठेऊन त्यास सोडणे आणि त्याचे हाते स्वामीकार्य घेत जाणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
सुरु सुद