पत्रांक १२९.
श्री
पौ अधिक वैशाख शुा १० गुरुवार.
१६९६ चैत्र वद्य १४.
राजश्री नानाजी कृष्ण जोशी व बाबूराव विश्वनाथ बैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष, हरीभक्तपरायण राजश्री मार्तंड बाबा, वास्तव्य श्री जेजूरी, हे आह्मांस पूज्यमान आहेत. सांप्रत गडबडीच्या प्रसंगाकरितां मुलेंमाणसें सुस्थळी असावीं म्हणोन यांचा मानस. त्यास विज्वर प्रसंगच रुबकार जाहलियास किल्ले पुरंधर समीप आहे. आपण राजश्री सखारामपंत बापू व राजश्री बाळाजीपंत नाना यांस सांगोन, निरोपद्वार्थ किल्ले मजकुरीं एक घर यांच्या मुलांमाणसांस देऊन सांभाळ करवावा. व पा करडेरांजणगांव यांच्या प्रघातांत आहे. तेथील फडणिशीची असामी यांचे ज्यामात आनंदराव भैराळ यांसीं करून देवावी. स्वदेशी चरितार्थ होईल, येविशीं आम्ही राजश्री नानांस पत्र लिहिलें आहे. प्रसंगीं येविशीं त्यांस सांगोन सदरहू कामें करून देविलीं पाहिजेत. बावाचें अवश्यक आम्हांस आहे. त्याप्रमाणें तुम्हीं अगत्य'वाद धरून उभयतांकरवीं ममता करवावी. येविशीं अनमान सहसा न करावा. रा छ २७ माहे मोहरम. बहुत काय लिहिणे ? हे विनंती. मोर्तब सुद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)