Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७८
१५३३ मार्गशीर्ष वद्य १
अज दिवाण + + + मामले + + + गोयाजी + + + चौगला वा सुलोबा कुलकरणी वा सेटिये वा माहाजन वा समस्त प्रजा पेठ सिंगणापूर कर्याती मजकूर सु॥ इसने असर वा अलफ दिल्ह दरी वखत खुर्द खत रखतखाने मोक तेरीख २३ माहे रमजान सन असर व अलफ आह्मी विले जे पेठ मजकुरीचे मोकदम पूर्व कदीम इ विठोजी भोसला आहे याचा फरजंद बरहुकूम फर्मान हुमायून + + + + + तालीक लहौनु घेउनु असली परतौनु देणे ह्मणउनु तरी बरहुकूम खुर्द खत पा। मजकुरास पाटेलगी विठोजी मशारुनइलेचे दुंबाला केले असे + + + + + + + +
मोर्तब सुद
तेरीख छ २५ सौवालु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७७
१५३३ कार्तिक वद्य १०
हुवलखलील
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायवंद खाने अलिशान हैबतखान तूलिदयादौवलतहू ता। कारकुनानी व देसाईयानी का। मालूम बाद सु॥ इसने असर अलफ चूं दरी वखत फर्माने हुमायून सादीर जाहाले जे पेठ सिगणापुरीची मोकदमी मोकदमल बेनिसाल विठोजी भोसला बदायाद अफाद मरहामत करुनु दिल्हे आहे तुह्माकारणे ह्मणुउनु तरी बाफर्मान पेठ मजकुरीचे मोकदमी भोसले मशारनिलेचे दुंबाला केले कीजे तालीक लिहून घेउनु असेली परतौनु दीजे मोर्तब सूद
तेरीख २३ माहे रमजानु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७६
हिजरी १०२० साबान
शके १५३३ आश्विन
अलमुल्कउल्ला
(फारसी मजकूर)
फर्मान हुमायून सरफ सुदुर याफत बजानिब मुतालिकानी व कारकुनानी कर्याती मालेवाडी के अज जानिब आमदे दौलताखाहेनी बर + + + मुस्तकीम व जुबादे मक बर दर देहाये इसरु दमान कदीम हाल अलशाहीनी अलमकान हैबतखान नसब असे व देसाईयान असेत चू मकदमल इमसाल विठोजी भोसले नजदीक व वज नियत बिना करउनु सिगणापूर पाठविले असे बिनावरा बमराहीम बतसरगे खुशरवाना व अताफ दमकारम पादशाहाना मुकदमी मजकूर अवलादी व अफलादी कुरसी दर + + कुमदमल इनसाल मशारनुले अनायत फर्माविले असे जे मोमीनुलेसी मुकदमत इनायत मजकूर देउनु मोकरर जाणणे अवलाद अपरादरा रिकाप पादसाहाद हुबहू तालीक फर्मानी घेउनु असेली फर्मान फिराउनु दीजे बरहुकूम फर्मान रवा छ माहे साबान पा। उरू असरफान हमायून आला बा। खान अलीशान रया अल कदरवल मकान खा। मजालसीहू
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
परंतु, बोलणें हें क्षणिक व तात्पुरतें असतें, तेव्हां तपेच्या तपें जिचा व्यासंग केला ती इंग्रजी समयीं जिव्हाग्रावर नाचूं लागली, तर त्यासंबंधी नांवें ठेवूं नयेत, अशी या मंडळींच्या तर्फे कोणी विनंति करील, तेव्हां ह्या विनंतीला मान देणें सभ्यपणाला अनुचित होणार नाहीं. पण, ज्यांची रचना करण्यास अनेक वर्षांचा अवधि लागतो व ते कोणत्या भाषेंत लिहावे हें ठरविण्यास हवा तितका वेळ असतो, ते ग्रंथ किंवा निबंध लिहिण्याच्या कामीं इंग्रजीचा उपयोग देशाभिमानी विद्वान लोक करूं लागले. म्हणजे त्यांनाहि देशाभिमानाची व राष्ट्रत्वाची व्याप्ति कोठपर्यंत असते हें कळत नाहीं असें विधान करणें प्राप्त होतें. असे नसतें, तर त्यांनीं आपले ग्रंथ देशी भाषांत लिहिले असते. भाषा विचाराचें साधन आहे तेव्हां स्वभाषा स्वदेशांतील विचारी पुरुषांच्या विचारांचें साधन असावें हें उचित होय. हे विचारी लोक परभाषेंत आपले विचार प्रकट करूं लागले तर त्यांनीं स्वभाषेचा मोठा अक्षम्य अन्याय केला असे होतें. घरच्या गरीब माणसांची उपासमार करून बाहेरच्या श्रीमंतांना मेजवानी करणारा इसम स्वकीयांच्या व परकीयांच्या उपहासास मात्र पात्र होतो. असे गृहस्थ आपल्या देशांत गेल्या पंचायशी वर्षांत बरेच झाले. पैकीं कित्येकांची नावनिशी त्यांनीं केलेल्या कांहीं ग्रंथ व निबंध यांसह पुढील पिढ्याच्या स्मरणार्थ येथें देतों:-
( पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
वर दिलेल्या सर्व गृहस्थांची जगांतील कोणत्याहि देशांत विचारवंतांत गणना होईल व एकदोघांची तर कदाचित् प्रतिभासंपन्न पुरुषांत गणना करावी लागेल. ह्या गृहस्थांनीं मराठींत ग्रंथरचना किंवा विचारप्रदर्शन काय केलें व इंग्रजींत काय केलें, हें पाहिले असतां, मराठीपेक्षा इंग्रजीकडेच ह्यांचा कल विशेष आहे हें दिसून येईल. ह्या सर्व गृहस्थांच्या लेखांत ग्रंथ ह्या संज्ञेस अंशतः पात्र अशीं चारच पुस्तके आहेत, (१) कुंट्यांचीं आर्य संस्कृतीचीं स्थित्यंतरें, (२) रानड्यांचा मराठ्यांचा इतिहास, (३) डॉ. भांडारकरांचा दख्खनचा इतिहास व (४) रा. टिळकांचें आर्यांचें मूलस्थान. ह्या चारीं पुस्तकांत विचार व कल्पना ह्यांचे बरेंच प्रदर्शन झालें आहे. आतां, इतकें खरें आहे कीं त्या त्या शाखेंत युरोपांत जे पहिल्या प्रतीचे उत्तमोत्तम ग्रंथ झालें आहेत त्यांच्याशीं ह्या ग्रंथांच्यानें बरोबरी करवणार नाहीं. परंतु त्या त्या शाखेंतील ब-याच ग्रंथांत ह्यांची गणना करावी लागेल हें उघड आहे. उदाहरणार्थ, डॉ. भांडारकरांचा दख्खनचा इतिहास घ्या. ह्या इतिहासाची योग्यता डॉ. प्लीट्कृत कर्नाटकांतील राजघराणीं ह्या पुस्तकापेक्षां किंचित् जास्त आहे. डॉ. भांडारकरांचें पुस्तक ताम्रपटें व शिलालेख ह्यांच्याशीं ज्याचा परिचय झाला आहे असा कोणीही गृहस्थ लिहिता. एक दोन क्लृप्त्या मात्र डॉ. भांडारकरांनीं ह्यां पुस्तकांत नवीन काढिलेल्या आहेत. टॉलेमीचा Baleoeuros व कोल्हापूरचा विळिबायकूर हे एकच पुरुष होत, ही डॉक्टरांची कल्पना मोठी अपूर्व आहे व तिचें सर्व श्रेय त्यांनाच आहे. अशा स्वतंत्र कल्पना व कोट्या ह्या चारी पुस्तकांत आहेत. परंतु ह्या कल्पना व कोट्या ह्या देशांतील भाषेस काय होत? हे चारी ग्रंथ इंग्रजीत लिहिलेले आहेत व ह्यांचा उपयोग महाराष्ट्रांतील लोकांपेक्षां युरोपातील लोकांना जास्त होणार आहे. हेच ग्रंथ ह्या लोकांनीं मराठींत लिहिले असते, तर त्यांच्या अपूर्वतेमुळे परकी लोकांना ते भाषान्तर करून समजून घ्यावे लागते व मराठींत चार विचारप्रचुर ग्रंथांची भर पडती. मराठींत लिहिले जाते तर हे ग्रंथ यूरोपांतील विद्वानांना कळावयास अवधि लागता इतकेच. ह्यापेक्षा मराठीत लिहिण्यापासून जास्त तोटा नव्हता. परंतु मराठीचा संकोच होण्याची चोहोकडून जर सध्या वेळ आलेली आहे, तर त्याच्या आड ह्या पुढारी मंडळीनें तरी काय म्हणून यावें? आर्य संस्कृतीचीं स्थित्यंतरे, हा ग्रंथ बक्षिसाकरितां लिहिला होता, अशी कुंट्यांच्या तर्फेनें सबब आणतां येईल. परंतु ऋषि हें काव्य व इंग्रजी वर्तमानपत्र कुंट्यांनी इंग्रजींत कशाकरतां लिहिलें तें समजत नाहीं. तसेच, महाराज सयाजीराव गायकवाड ह्यांनी गिबनचा सारांश इंग्रजीत लिहिल्यानें, त्यांना स्वतः ला इंग्रजी लिहिण्याचा चांगला सराव झाला, ह्यापलीकडे इंग्रजांच्या किंवा मराठ्यांच्या विचारांवरती ह्या सारांशाचा कांहीं परिणाम झाला आहे असें दिसत नाहीं. टिळकांनीं आपले दोन्ही ग्रंथ मराठींत लिहिले असते तर काय बिघडते? ह्या ग्रंथांना जर काहीं किंमत असती-व ती आहे ह्यांत संशय नाहीं. तर कांहीं युरोपियन लोकांना जरूर असल्यास कदाचित् मराठी शिकावे लागतें इतकेंच.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
आता इंग्रजी भाषेच्या सान्निध्यानें मराठी भाषेची काय स्थिति झाली आहे व होईल तें पाहूं.
केवळ ह्या दोन भाषांच्या अंतःस्वभावाकडे पाहिले असतां, इंग्रजीपेक्षां मराठी विकृतिक्षम जास्त आहे व पूर्वगामी शब्दयोगी अव्ययें योजण्याची पद्धति तिच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. तेव्हां ह्या दोन भाषांचा गुण्यागोविंदानें जोड बनणें प्रायः अशक्य आहे. इंग्रजीच्या सान्निध्यानें मराठींत इंग्रजी शब्द व प्रयोग येतील एवढेंच. म्हणजे मराठींत इंग्रजी शब्दाचें व प्रयोगांचे मिश्रण होईल.
परंतु इंग्रजीच्या सान्निध्यानें मराठींत इंग्रजी शब्द व प्रयोग ह्यांचें मिश्रण होईल, ही गोष्ट फारशी उद्वेगजनक नाहीं. ह्या बाबतींत काळजी निराळ्याच त-हेची आहे. ती ही कीं ह्या देशांत इंग्रजीची व्याप्ति इतकी भयंकर होत चालली आहे कीं मराठी मिश्र होण्यापेक्षा नष्ट होण्याचा संभव जास्त आहे.
गेल्या शतकांत ग्वालेरीपासून तंजावरपर्यंत मराठी भाषा प्रचलित होती. नाना फडणिसांचीं हैदर व टिप्पू यांस पत्रें मराठींत जात व महादजी शिंद्यांचा रजपूत राजाशीं व्यवहार मराठींत होई. तसेंच ग्वालेरीपासून तंजावरापर्यंत खासगी व सार्वजनिक दफ्तरें मोडीत व मराठीत लिहिली जात. मराठीची ही व्याप्ति जाऊन तिची जागा आतां इंग्रजीनें घेतली आहे. आतां निव्वळ महाराष्ट्रांखेरीज मराठी इतरत्र कोठें चालत नाहीं. म्हणजे मराठीच्या व्याप्तीचा महाराष्ट्रांच्या बाहेर संकोच झाला आहे.
मराठीचा संकोच महाराष्ट्राच्या बाहेर तर झालाच आहे परंतु, खुद्द महाराष्ट्रांतहि मराठीचा संकोच अतोनात होत आहे. गेल्या शतकांत महाराष्ट्रांत सरकारीं व दरबारी मराठी भाषा विराजत होती. आतां तिच्या जागीं सर्वत्र इंग्रजी झाली आहे.
सरकारी दरबारीं मराठीला मज्जाव झाला ही तर लांछनाची गोष्ट आहेच, परंतु उच्च व मध्यम प्रतीच्या शाळा व पाठशाळा ह्यांतूनहि मराठीचें निष्कासन झालें आहे.
आतां शाळा व पाठशाळा परकीय सरकारच्या ताब्यांत असल्यामुळें तेथें मराठीचा रिघाव नसल्यास कोणाचा उपाय नाहीं. परंतु, सार्वजनिक सभा, खासगी सभा, पुस्तकालयें, प्रांतिक सभा, पेढ्या, ह्यांचेंहि सर्व लिहिणें इंग्रजींतच होऊ लागले आहे. ह्या ठिकाणीं कोणीं मराठींत लिहूं व बोलूं नये असा कोणाचा प्रतिबंध नाहीं. पण देशहिताच्या कल्पना सध्यां इतक्या विपरीत झाल्या आहेत कीं त्याचें स्वरूप काय असतें ह्याचाहि विसर सर्वत्र पडल्यासारखा दिसतो.
पेढ्या, सभा व पुस्तकालयें सार्वजनिक संस्था पडल्याकारणानें तेथें कोणाचा पायपोस कोणाच्याहि पायांत नाहीं. अशी स्थिति असते व इंग्रजी लिहिण्याचा व बोलण्याचा सहजासहजीं प्रघात त्या ठिकाणीं पडत गेला असतो, अशी समजूत कोणी काढील. परंतु भाऊबहीण, बापलेक, स्नेहीसोबती ह्यांच्यांतील खासगी पत्रव्यवहाराहि इंग्रजींतच चालतो. ह्या स्थलीं सार्वजनिक सबब आणतां येणार नाहीं. परंतु इतकें मात्र कदाचित् म्हणता येईल कीं, ह्या लोकांना विचारी लोकांत गणतां येत नाहीं; इंग्रजी लिहिण्याचें ह्या अज्ञ लोकांना कौतुक वाटतें व राष्ट्रहित कशांत आहे हें कळण्याची त्यांना ऐपत नसते, म्हणून असा प्रकार होतो.
परंतु राष्ट्रहित कशांत आहे हें ज्यांस कळतें अशी आपली कल्पना आहे तेहि विद्वान् लोक इंग्रजीच लिहितात व बोलतात. इंग्रजांशीं किंवा सरकारशीं व्यवहार करण्यांत हे लोक इंग्रजींत बोलून थांबते तर ती गोष्ट केवळ न्यायाची होती. पण आश्चर्य हें कीं स्वजनाशीं व्यवहार करतांनाहि हे लोक इंग्रजीच वापरतात. डॉ. भांडारकरांना स्वधर्माविषयीं किंवा सामाजिक सुधारणेविषयीं मुंबईत बोलावयाचें असलें, किंवा न्यायमूर्ति रानड्यांना बकलच्या इतिहासावर नगरास व्याख्यान द्यावयाचें असलें, किंवा रा. कुंट्यांना स्वदेशाभिमानाविषयी खुद्द पुण्यांत भाषण करावयाचें असलें, किंवा प्रो. गोखल्यांना कोल्हापूरच्या मराठ्यांपुढे इंग्लंडची हकीकत सांगावयाची असली, कीं इंग्रजीचा आश्रय केल्याविना बोलण्यास त्यांना उमेदच येत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७५
१५३३ आश्विन
अल् मुल्क उला
फर्मान हुमायून सर्फ सुदुर्याफ्त बजानीब मुतालिकान् व कारकुनान् कर्यात मालेवाडी के अज् जानिब अमदे दौलतखाहान बर जादा अखलास् मुस्तकीम व जुबदे मक बर दर देहाय इसदु दमान् कदीम् हाल् अलशासिनी अलमकान् हैबतखान् नसब् अंद् व देसायान् अंद् चूं मकदमल् इम् साल् विठोजी भोसले नजदीक सिरस कोहे संभू नियत् बिना नमूदा सिंगनापूर नामीदा अस्त बिनाबरा बमराहीम बतदरगे खुशखाना व अताफ दमकारम् पादशाहाना मुकद्दमी + + स्ता कर्द् औलादी व अहफादी कुरसी दर मकदमल् इन साल मोमीनुलेह इनायत् नमूदा ईम् मीबायद् के मोमीनुलेरा मुकदम मजकूर दानिसता मोकरर व बाद ऊ बऔलाद व अहफाद ऊ सालाबाद साल हाल नमीदारीद दरमियान के तालीक निविस्ता साबिक फर्मान करदह असल फर्मान बाज देहद बरहुकमे फर्मान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७४
कृस्णारपन
-ll श्रीसकलतीर्थस्वरूप महामेरू वेदमूर्ति राजश्री दामोधरभट गोसावी यासि तथा चिंतामणभट गोसावी यासि तथा राजश्री रंगनाथभट गोसावी यासि तथा राजश्री विठलभट होसिंग तथा दिवाकरभट गोसावी यासी तथा पिलंभट गोसावी यासी व समस्त ब्रह्मपु + मौजे आरवी मुदगल गोसावी यासी चर्णरजे सेवके किमात्रे रामाजी एकदेऊ व विसाजी सायदेऊ श्रीसास्टांग नमस्कार विनंती विसेखु गोसावियाचे गावी आमच्या वडिलाची मिरासी घर भुमी स्थल आहे हेते भुमी आमचे वडिली रंगोपंत चुलते तेही राजश्री रामेस्वरभटास बुध्दिसंकल्प घालूनु दिधले आहे वडिली दिधले ते आह्मी दिधले यास सरण्या अनु सारखे नाही ए विसई काही सधेह नाही राउलास कळले असावे यावरी आह्मी आइकतो जे चवडभट कोकने ते भुमीसाठी करकर करितात तरी त्यास काय समध आहे जे लाइनी कचाट करितात आमचे आह्मी दिधले त्यास गोसावी सांगने जे लाइनी करकर करुनु काम नाही गोसावियास परंपरा समाचार कळला आहे आमची मिरासी आह्मी दिधलियास करकर करावया काय कारन आहे त्यास सागने लाइनी कचाट न करने कृपा लोब असा देने कळावे हे विनती एक विसी समाचार राजश्री चितामणभट गोसावियापासी व सिदणभट पारगौकर त्यापासी सांगितलें असे हे विनंती
दा। सेवके किमात्रे एबाजी रामे सास्टांग नमस्कार विनंती लि॥ परिसिजे कृपा असो दीजे हे विनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
येथें तीन्ही भाषांत क्रियापदांना विकृति झाली आहे. मराठींत पुस धातूला लें प्रत्यय लागण्यापलीकडे पुरुष व वचन ह्मासंबंधानें जास्त विकृति झाली नाहीं; लिंगांसंबंधानें मात्र झाली आहे. फारशींत पुरुष व वचन ह्या दोन्हीसंबंधानें विकृति झाली आहे. आणि इंग्रजींत ed प्रत्यय लागून द्वितीय पुरुष एकवचनी st प्रत्यय आणीक लागलेला आहे. येणेंप्रमाणें तिन्हीं भाषांत मूळ क्रियापदाला भूतकाळीं विकृति होते. येथें विकृतिराहित्याच्या बाबींत अमुक भाषा पहिली व अमुक दुसरी अशी नंबरवारी लावतां येत नाही.
येणेंप्रमाणें मराठी, फारशी व इंग्रजी ह्या तिन्ही भाषा विकृतीला सोडून चालण्याच्या विचारात आहेत. त्यात इंग्रजीनें विकृतीला बरेच सोडिलें आहे. तिच्या खालोखाल फारशीचा नंबर लागतो. व मराठीनेंहि विकृतीपासून दूर रहाण्याचा कांहीसा अभ्यास केला आहे. परंतु फारशी किंवा इंग्रजी ह्यांच्या इतकी सटकसीतारामी अद्यापि तिनें पत्करिली नाहीं. आतां, १३१८ पासून १६५६ पर्यंत मराठीची फारशीशीं गांठ पडली होती. त्या अवधींत विकृति सोडण्याच्या कामीं फारशीची मराठीला कांहीं मदत झाली कीं काय ते पहावयाचें आहे. द्वितीयेचा ला प्रत्यय, किंवा षष्ठीचा ई उपसर्ग, किंवा अनेक वचनाचा आन् प्रत्यय मराठीला फारशीनें देण्याचा घाट घातला तेव्हा जास्त विकृति मात्र मराठीला फारशीपासून प्राप्त झाली. ह्यापलीकडे अविकृत होण्याला फारशीची मराठीला बिलकुल मदत झाली नाहीं. मराठींतील लिंगें, वचनें, पुरुष ह्यांच्या रूपावर फारशीचा काडीइतकाहि परिणाम झाला नाहीं. ह्याचें कारण असें कीं, फारशींतील पूर्वगामी शब्दयोगी अव्ययें मराठीत रुजून तिचें स्वरूप बदलण्याला सतराव्या शतकांतील राज्यक्रांतीनें वेळ राहिला नाहीं. फारशींतील ग्रंथसमूह व शास्त्रेंहि अशीं नव्हतीं कीं त्यांच्यापुढें तत्कालीन मराठी वाङ्मयानें दिपून व हतप्रभ होऊन मरून जावें. शिवाय, मराठीला त्या तीन शतकांत असे कांही कट्टे ग्रंथकर्ते मिळाले कीं त्यांना, कवडीचीहि अपेक्षा न करिता, केवळ कर्तव्य म्हणून मराठींत ग्रंथरचना करणें अगत्याचें वाटलें. ह्या अनेक कारणांनीं फारशीला मराठी भाषेचे अंतःस्वरूप प्रायः बदलतां आलें नाहीं. ज्ञानेश्वरापासून आतांपर्यंत म्हणजे १२९० पासून १९०३ पर्यंत मराठी भाषा हळूहळू विकृतीपासून परावृत्त होत आहे, परंतु ती तशी आपल्याच छंदाने होत आहे. ज्ञानेश्वरीसंबंधानें विवेचन करतांना ह्या स्वच्छंदवृद्धीचा वृत्तान्त देण्याचा विचार आहे.
वरील उदघाटनावरून एवढें निष्पन्न झालें कीं, फारशीं भाषेच्या अंतःस्वरूपाचा मराठी भाषेच्या अंतःस्वरूपावर म्हणण्यासारखा परिणाम घडला नाहीं. तीनशें वर्षांच्या जबरदस्तीनें मराठीचें अंतःस्वरूप वस्तुतः बदलावयाचें; परंतु हा बदल होण्याचा ओघ चार कारणांनीं थांबला, (१) मराठी भाषेचा स्वतःचा स्वभाव, (२) मराठी ग्रंथकारांचे प्रयत्न, (३) महाराष्ट्रांतील हिंदुधर्म, व (४) मराठ्यांनी सतराव्या शतकांत केलेली राज्यक्रांति. आतां यद्यपि मराठीचें अंतः स्वरूप फारशीच्या सान्निध्यानें बदललें नाहीं, तत्रापि तिच्या बहिःस्वरूपावर ह्या सान्निध्याचा बराच परिणाम झालेला आहे. उभयान्वयी अव्ययें, शब्दयोगी अव्ययें, उद्गारवाचक अव्ययें, सर्वनामें, विशेषनामें, क्रियाविशेषणें, विभक्तिप्रत्यय, इतर हजारों शब्द आणि प्रयोग, फारशींतून मराठींत आलें आहेत. हा परिणाम फारशी संस्कृतीचा मराठी संस्कृतीवर ठळक असा झाला आहे. मुसुलमान लोकांची संस्कृति महाराष्ट्रांतील लोकांच्या संस्कृतीहून त्यावेळीं बरीच कमी दर्जाची होती. त्यामुळें धर्म, शास्त्रें, कायदे, कविता, साहित्य, वगैरे सरस्वतीच्या प्रांतांत फारशीचा शिरकाव म्हणण्यासारखा झाला नाहीं. व्यवहारांत मात्र फारशी शब्दांचा भरणा फार झाला. व त्याचा ठसा मराठीवर इतका बेमालूम बसला आहे कीं, जोपर्यंत मराठी भाषा ह्या भूमंडळावर बोलली जाईल, तोंपर्यंत मुसुलमानाचें राज्य महाराष्ट्रावर कांहीं शतकें होतें, हें तींतील फारशी शब्द, प्रयोग व विभक्तिप्रत्यय ह्यांवरून कळून येईल.
ह्या तीनशें वर्षांच्या गुलामगिरीनें मराठीला फायदा काय झाला? एकंदर विचार केला असतां म्हणण्यासारखा फायदा काहींच झाला नाहीं. मराठींत एकाच अर्थाचे अनेक शब्द आले आणि तिची अर्थप्रदर्शक शक्ति व्यवहाराच्या प्रांतांत जास्त वाढली. ह्यापलीकडे मराठी भाषेला फारशीच्या सान्निध्यानें जास्त फायदा कांहीं झाला नाहीं. मोडी लिहिण्याची पद्धति हेमाडपंतानें मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत होण्याच्यापूर्वीच सुरू केली होतीं आणि बखरी लिहिण्याची पद्धति मुसुलमानांचें राज्य अस्तंगत झाल्यानंतर म्हणजे १६५६ नंतर प्रचारांत आली. खुद्द मुसुलमानांचें राज्य असतांना ह्या दोन्ही पद्धती अस्तित्वांत आल्या नाहींत. तेव्हां त्यांचें श्रेय मुसुलमानांना देता येत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७३
१५३० पौष शुध्द ७
अज रख्तखाने मसुरल हजरती माहामेरू अखंडितलक्षमीअलंकृत राजमान्यराजश्री लखमोजी राजेसाहेबु ता। हुदेदार व मोकदम मौजे बारडेगौ पा। पांडियापेडिगौ सु॥ तिसा अलफ मकसूद दामोधरभट व रामेस्वरभट सो। आरवी बदल र्धा। चावर एक यास इनाम दिधला असे प्रज याचे सेत सेराएणिनी गजे मोजुनु जमीन चावर एक दीजे दामोधरभट व रामेस्वरभट यास गले इनाम दिधला असे हे मोर्तबु
तेरीख ५ माहे सवालु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
भाषांच्या प्रगतीच्या चार पाय-या भाषाशास्त्रज्ञांनीं स्थूलमानानें ठरविलेल्या आहेत; (१) विश्लेष्टाक्षरात्मक, (२) श्लिष्टाक्षरात्मक, (३) विकृतिक्षम व (४) त्यक्तविकृति. ह्यांना (१) Monosyllabic (२) agglutinative,
(3) inflected, आणि (४) analytical, अशीं अनुक्रमिक नांवे युरोपियन लोकांनीं दिलेली आहेत. विश्लिष्टाक्षरात्मक भाषांत सर्व शब्द एकाक्षरी (monosyllabic) असतात. उदाहरणार्थ, चिनी भाषा. श्लिष्टाक्षरात्मक भाषांत अनेक एकाक्षरी शब्द दोन एकाक्षरी शब्दांच्या मध्यें घालून एक शब्द बनविला जातो. जशी, तुर्की भाषा. ह्या भाषांत शब्दांना विकृति किंवा प्रत्यय लागत नाहींत. सबंद शब्दांचा प्रत्ययाप्रमाणें उपयोग होतो. विकृतिक्षम भाषांत मूळ शब्दांस अनेक विकृति करण्याचा व शब्दांच्या अन्त्याक्षरांचा लोप होऊन बनलेल्या प्रत्ययांचा उपयोग करण्याचा प्रघात असतो; अशा संस्कृत, आरबी, लॅटिन, ग्रीक वगैरे. ह्या विकृतीचा आस्ते आस्ते त्याग करण्याकडे कित्येक भाषांची प्रवत्ती असते. उदाहरणार्थ, फारशी, मराठी, इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, बंगाली वगैरे. ह्या चवथ्या वर्गांतील ज्या भाषा सांगितल्या त्यांनीं शब्दांना विकृति करण्याचें अजीबात सोडून दिलें आहे असें नाहीं. त्यक्तविकृति अशी संज्ञा ह्या भाषांना देण्यांत मतलब इतकाच आहे कीं, विकृतिकार्य सोडण्याकडे ह्या भाषांची आस्ते आस्ते प्रवृत्ति होत आहे. ह्या त्यक्तविकृति भाषांपैकीं कित्येक भाषा विकृतित्यागाच्या कामी ब-याच पुढें गेल्या आहेत व कित्येक तितक्या पुढें गेल्या नाहींत. उदाहरणार्थ, मराठींत अद्यापि सात विकृत विभक्त्या आहेत, फारशींत चारच आहेत, आणि इंग्रजींत विकृति होऊन होणारी विभक्ति म्हटली म्हणजे s प्रत्यय लावून होणारी षष्ठीच कायती एक उरली आहे व तिचेंहि बहुतेक कार्य अलीकडे of, to वगैरे शब्दयोगी अव्ययेंच करतात. उदाहरणार्थ, राम ह्या शब्दाच्या विभक्त्या तिन्ही भाषांत चालवून दाखवितोंः:-(खालील तक्ता पाहण्यासाठी येथे क्लीक करा)
येथे मराठींत प्रथमेला बिलकुल विकृति झाली नाहीं; व अविकृत असें द्वितीयेचें व संबोधनाचें राम रूप होतें. बाकीच्या सर्व विभक्त्यांत राम हा शब्द विकृत होतो. फारशींत, रामरा, बराम्, इराम् व रामा अशीं द्वितीय, चतुर्थी, षष्ठी व संबोधन, ह्या चार विभक्त्यांत विकृत रूपें होतात. आणि इंग्रजींत राम् sअसें षष्ठीचें एकच विकृत रूप आहे व त्याचाहि किचितच उपयोग करतात. ह्यावरून विकृतींचा त्याग करण्यांत इंग्रजीचा पहिला, फारशीचा दुसरा व मराठीचा तिसरा, असे नंबर लागतात. जुन्या मराठींत रामू किंवा रामो अशी विकृत रूपें होत असत. तीं अर्वाचीन मराठीनें सध्यां सोडून दिलीं आहेत. (खालील तक्ता पाहण्यासाठी येथे क्लीक करा)
येथें मराठींत पुस धातूला तिन्हीं पुरुषांत, दोन्ही वचनांत व तिन्ही लिंगांत विकृति होते. फारशींत तिन्ही पुरुषांत व दोन्ही वचनांत विकृति होते; लिंगांत होत नाहीं. इंग्रजींत द्वितीय पुरुषी एकवचनी व तृतीय पुरुषी एकवचनीं मात्र विकृति होते; बाकी पुरुषांत, वचनांत व लिंगांत होत नाहीं. येथेंहि विकृतीचा त्याग करण्यांत इंग्रजीचा पहिला, फारशीचा दुसरा व मराठीचा तिसरा नंबर लागतो.
ह्माच क्रियापदांचीं भूतकालीं रूपें अर्शीं होतात. (खालील तक्ता पाहण्यासाठी येथे क्लीक करा)