लेखांक ३५५
श्री १६१६ श्रावण शुध्द १३
राजश्री विनाजीराम हवलदार व कारकून ता।
रोहिडखोरे गोसावी यासि
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक मल्हार येसाजी सुभेदार व कारकून सुभा मावळे प्रा। राजगड नमस्कार सु॥ खमस तिसैन अलफ बदल देणे इनाम सेत मा। बाजी सर्जाराव जेधे देशमुख ता। भोर बा। सनद राजश्री पंतसचिव छ १० रबिलाखर सन अर्बा पौ। छ ११ जिल्हेज तेथे आज्ञा की देसमुख मा। याणी विदित केले की आपणास पुर्वीपासून इनाम मोजे वेनवडी ता। मजकूर येथे जमीन कास टके ६ साहा पुर्वीपासून चालिला आहे तेणेप्रमाणे चालवणे ह्मणौन विदित केले मौजे मजकुरी पुर्वीपासून याचा इनाम चालिले असेल त्याचा भोगवटा मनास आणून हाली चालवणे ह्मणौन आज्ञापत्र सादर आहे त्यावरून तुह्मास सनद सादर केली असे तरी मौजेमजकुरी भोगवटा मनास आणून सदरहू इनाम चालवणे साल दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे तालिक लेहोन घेऊन असल सनद फिराऊन देणे छ ११ जिल्हेद मोर्तब सुद सदरहू इनाम सेत कीर्दी करितील त्यासी मलिकराचे कारकिर्दीचा भोगवटा दाखवितील तो मनास आणून सेत इनामती दुमाले करणे प्रस्तुत सदरहू गावीचे इनाम याचे दुमाले केला आहे किर्दी करू देणे जाणिजे मोर्तब सुद