Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८३
१५३९ माघ वद्य ११
अज रखतखान खुदायवद आगौ अजम आगौ मुमरास तूलीदयामदौलतहू बिजानेबू हुदेदारानी व मोकदमानी हाल व इस्तकबाल मौजे देउलगाऊ ना। आलेगौऊ पा। पुणे सु॥ सन समान असर अलफ दामोधरभट बिन नारायणभट व रामेस्वरभट बिन नारायणभट सो। आरवी हुजूरु एउनु मालूम केले जे आपणास इनाम सेत कदीम बेवजूरीस व दा। नखतयाती व बाजे बाबा कुलबाब कुलकानू साल बादगहदम चालिले आहे व पेसजी हि तसफिराती भोगवटे पाहौनु खाने अजमे हैबतखान इही दुमाले केले आहे हाली साहेबास मुकासा अर्जानी जाला हुदेदार खुर्द खताचा उजूरु न कीजे तालीक घेउनु असली फिराउनु दीजे अलादी व अफलादी चालवीजे
तेरीख २४ माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
श्री.
श्रीसद्गुरु बाळकृष्णस्वामी प्रसन्न ।। श्रीसत्यपूर्णगुरुभ्यो नमः ।। अथ मूळपुरुषविचारः ।। तालीख ।। श्रीमूळपुरुष लक्ष्मीधरभट्ट ।। गोत्र उपमन्य वसिष्ठ ।। कुळदेवता भैराळलिंग मंगसोळी ।। कोल्हापूर महालक्ष्मी ।। वरदेवता भुवनेश्वरी ।। आराधि देवता सिद्धबिडेश ।। मंडपदेवता शमी ।। पुरोहित मंचभट्टी अन्योन्य ॥ स्थळदेवता रामलिंग ।। मिर्जला परमेश्वरी ॥ श्रीशमनामीर ग्रामदेवता ।। अडीशेरी कोठीस॥ लक्ष्मीधर त्याचा पुत्र मंचिभट्ट ॥ त्याशि पुत्र २ दोघ ॥ मूळवृत्ति ॥ तास १ बेडग ज्योतिष अष्टाधिकारी ॥ २ तार्द्दाळ, ३ तंदलगे, ४ कुलकरण देश हुकेरी ।। वज्रचंडे पटेलकी देश मुर्तजाबाद ।। एकवाटा। दुसरा वाटा ॥ ज्योतिष्य अष्टाधिकारी मुर्तजाबाद ।। हवेली खेडीं १०॥ गृहस्ताचीं घरे ॥ इनामें ॥ आतां वाटा॥ वडील पुत्र बिडंभट्ट त्याशि मृगनहळ्ळीस ठेविलें॥ त्याचा वाटा पुरातन जाहला असे ॥ मृगनहळ्ळी ज्योतिष ॥ हवेली ज्योतिष ॥ इनामें गृहस्ताचीं घरें ॥ इतुका वाटा ।। अथ यादि पुरुष ।।
( अथ यादि पुरुष वाचण्यासाठी येते क्लिक करा. )
रघुनाथभट्ट बिन्न नामदेवभट्ट यानें सुलतान महंमद पादशाह सदर मेहर्बानी केली ।। हक ॥ ०|० जमीन पाव चावर ।। फश्की ।। तेल॥ नमक ॥ तसरीफ ॥ मुढा व दिवाली प्रताप तनखा चावडी रोज पैसे ४ चबुतरा कोतवाली ॥ पंचोत्री पैसे २॥
ही याद इ. स. १६२७ पासून १६५६ पर्यंत राज्य करणा-या सुलमान महंमद आदिलशहाच्या वेळची आहे. त्यावेळीं रघुनाथभट्ट बिन नामदेवभट्ट, ज्योतिषी मिरजकर, हयात होता व त्याची मूळपुरुषापासून पंधरावी पिढी होती. म्हणजे रघुनाथभट्टाचे मूळ पुरुष, २२ वर्षे दर पिढीस धरिलीं असतां, इ. स. १३०० च्या सुमारास हयात होता असें दिसतें. त्यावेळेपासून १६५६ पर्यंतचीं ब्राह्मणांचीं काहीं नांवें ह्या यादींत आहेत. ह्या यादीत (१) संस्कृत लक्ष्मीधर, (२) महाराष्ट्री पिल्लंभट्ट, (३) देशी डोंगरोबा, व (४) कानडी तिमप्पा, हीं नांवें आलीं आहेत.
महाराष्ट्रांतील मराठ्यांचीं व ब्राह्मणांचीं नांवें १३०० पासू १६५६ पर्यंत कशी होतीं त्याचा मासला वरील दोन यादींवरून पहातां येतो. त्यावरून असें दिसतें कीं ब्राह्मणांचीं नांवे ह्या तीन साडेतीनशें वर्षांत आंतररूपानें फारशी बदललीं नाहींत, बाह्य रूपाने मात्र किंचित् बदललीं आहेत. गांगो पाटेलु, राघो पाटेलु ह्याऐवजीं सध्यां आपण गंगू पाटील, राघू पाटील असें ह्मणतों. गांगो व राघो ह्या जुन्या रूपांचीं भाषेंतील इतर शब्दांप्रमाणें गंगू व राघू अशीं रूपें सध्यां झालीं आहेत. मोरो, विसाजी, वगैरे रूपें अद्यापहि प्रचलित आहेत. तेव्हां विशेषनामांची परंपरा १३०० पासून आजपर्यंत बिनतूट चालत आली आहे हें स्पष्ट आहे.
आतां इ. स. १३०० च्या पाठीमागें विशेषनामांची परंपरा अशीच बिनतूट आहे कीं काय तें पाहूं. एतदर्थ मुसुलमानांच्या पूर्वी महाराष्ट्रावर राज्य करणा-या जाधवांच्या वंशावळीतींल नांवे खालीं देतों व त्यांची मुसुलमानी अमलाच्या वेळच्या नावाशीं तुलना करतों.
( जाधवांची वंशावळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८२
१५३८ मार्गशीर्ष वद्य ४
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। पुण्या ताहा मोकदमानी मौजे वडगाऊ ना। पेडगाऊ का। पाटस पा। मजकूर दा। की हरची सु॥ सन सबा असर खुर्द खत रफतखाने छ माहे रमजान पैवस्तगी छ १७ माहे जिल्हेज सादीर असे जे रामेश्वरभट बिन नारायणभट जुनादार सा। आरवी मुदगल मालूम केले जे आपणासी इनाम जमीन वाहाती रुके .।. प्रज माहामद पटेल ठोबरा मुजेरी दर सवाद मौजे मजकूर सालाबाद चालिले असे तरी मोकासाई मौजे मजकूर आपुले इनाममधे बिघे वा गला घेउनु जात असे वा पेसजी घेउनु गेले असे आपुले बिघे वा गला मोकासाई नेले असे ते फिराउनु देवणे ह्मणउनु तरी मौजे मजकुरीचे मोकदमासी ताकीद करून मोकासाईयाचे बाकीमधे इनामदाराचे बिघे वा गला जे नेले असेल ते ताकिदी करून दीजे पेस्तर ऐसे आमल होऊ न दीजे वा सालाबादप्रमाणे इनामाचे सेतीचे हिसा एईल ते दुबाला कीजे तालीक घेउनु असल फिरउनु दीजे ह्मणउनु तरी बा। रजा सदरहू इनाम दुंबाला केले असे सालाबादप्रमाणे इनामाचे सेतीचे हिसा एईल ते दुंबाला कीजे मोर्तब
तेरीख १७ माहे जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८१
साक्षश्रीशंभु १५३७ फाल्गुन शुध्द ४
शके १५३७ राक्षसनामसंवत्सरे सीमगा सुध चतुर्थी वार शनिवार सु॥ सीत असर अलफ तद्दिनी राजश्री दसोजी बिन विठोजी भोसले येही जानेजी बिन कनकोजी वेवगे मोकदम व चौगले मौजे कविठे पा। पुणे यास लिहून दिधले ऐसे जे मौजे मजकुरीची मोकदमी व चौगलकी तुमची तुमचा बाप कनकोजी वेवगा चौगलकी खात होता व मोकदमीबदल रामोजी सीपारेकरासी भाडत होता जे मोकदमी आपली तुज आपले वडिलीं जेवणाईत करून ठेविले आहे तुझी मोकदमी नव्हे तु मोकदमीचे काम चालवू नको याबद्दल रामोजीन कनकोजीस व आकपाटेलास व वाघोजीस मारा करून मारिले तुझी वस्तभाव व गुरेढोरे नेली तू धाकुट होतास तुझी पाठी राखे ऐसा कोण्ही नव्हता याकरिता रामोजी सीरजोरीन मोकदमी खातो ह्मणोन तुवा मोकदमीचे वादाची पाठीराखणाबदल आह्मास आपली चौगलकी निमे देखील हक्कलाजिमे व मान व पाने व लुगडी व सेत एकीदोरी व घर समुदे दिधले आहे आह्मी खाऊन तुझी पाठी दिवाणात व हरएक बाब राखणे तुवा रामोजीसी मोकदमीचे गोता वाद सागोन मोकदमी साधून आह्मास मोकदमी देखील हक्कलाजिमे व मान व पाने व लुगडी व सेते व घरे देणे मोकदमी आमचे हातास आलेयावरी तुवा आपली चौगलकी समुदी सुखे खाणे यास आनसारिखे कराल तरी ++++ असे
गोही
रामेस्वरभट सो। आरवी मुद्गल रूपाजी मोकदम मौजे आरवी पत्रप्रमाण
पत्रप्रमाण साक्ष कृष्णाजी मोकदम का। ह्माकोजी वडितकर चौगला मौजे वडू
चांभारगोंदे पा। पांडिया-पेडगाऊं
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
ह्या वंशावळींत देवराजजी प्रथम दक्षिणेंत आला असें म्हटलें आहे. ज्याअर्थी राणा लक्ष्मणसिंह चितोडकर इ. स. १२७५-१३०३ पर्यंत हयात होता व देवराजजी त्याच्यापासून सहावा पुरुष होता, त्याअर्थी दर पिढीस २२ वर्षे धरिल्यास, देवराजजी इ. स. १४१३ पासून १४३५ पर्यंत हयात होता असें दिसतें. म्हणजे सातारकर भोसल्यांचे पूर्वज इ. स. १४१३ पासून १४३५ च्या अवधींत केव्हांतरी दक्षिणेंत आले असें होतें. परंतु सातारच्या घराण्याशीं संबद्ध असलेल्या सावंतवाडीच्या सावंतांपैकीं न-यसी देव इ. स. १३९७ त व भामसावंत १३६० पासून १३९७ पर्यंत हयात होते व त्यांचे पूर्वज इ. स. १२६० च्या सुमारास कोंकणांत होते असें वर सिद्ध केलें आहे. तेव्हां राणा लक्ष्मणसिंह चितोडकराच्या पूर्वी सावंतवाडीकर भोसले कोंकणांत प्रसिद्ध होते असा ह्या सिद्धीचा अर्थ होतो. म्हणजे भोसले हें आडनांव लक्ष्मणसिंहाच्या अगोदरचें आहे असें म्हणावें लागतें; परंतु सातारच्या बनावट वंशावळींत भोसाजीपासून भोसले हें आडनाव पडलें असें म्हटलें आहे. म्हणजे भोसले हें आडनांव इ. स. १३९० पासून १४१३ पर्यंतच्या अवधींत केव्हां तरी पडलें, असा ह्या विधानाचा अर्थ होतो. परंतु इ. स. १३६० पासून १३९५ पर्यंत राज्य करणा-या सावंतवाडीच्या भामसावंताचे आडनांवहि भोसलेच होतें. म्हणजे भोसले हें आडनांव ज्या कालीं पडलें असें बनावट वंशावळ सांगते, त्याच्या अगोदर तीस वर्षे भोसले हें आडनाव सावंतवाडीकरांना लावीत होते, अशी निष्पति होते. अर्थात् ह्या दोहोंपैकी कोणतें तरी एक विधान खोटें असलें पाहिजे. येथें कोणतें विधान खरें असावें ह्यासंबंधीं वादाला जागाच नाहीं. मठ येथील शिलालेखापेक्षां बनावट वंशावळींतील मजकूर अविश्वसनीय असावा असेंच म्हणणें भाग पडतें.
सातारकर भोसल्यांची म्हणून जी वंशावळ प्रसिद्ध झाली आहे ती बनावट आहे, हें मठ येथील ह्मा शिलालेखावरून उत्तम सिद्ध होतें. भोसले हें आडनांव शिर्के, मोहिते, मोरे, जाधव वगैरे आडनांवांप्रमाणें महाराष्ट्रांत फार जुने आहे. तसेंच शिर्के, मोरे ह्यांच्याप्रमाणेंच भोसल्यांचें कुळ महाराष्ट्रांतील अस्सल आहे. त्याचा संबंध चितोडच्या रजपुतांशीं लावूं जाणें अशास्त्र आहे. शहाण्णव कुळींतील मराठे ज्यांना म्हणतात, ते जातिवंत क्षत्रिय होत. व ह्यांनाच मी मराठा किंवा महाराष्ट्र क्षत्रिय असें विशेषण मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या चवथ्या खंडाच्या प्रस्तावनेंत दिलें आहे. ज्याप्रमाणें मराठा ब्राह्मण म्हणजे महाराष्ट्रांतील ब्राह्मण त्याप्रमाणेंच मराठा क्षत्रिय म्हणजे महाराष्ट्रांतील क्षत्रिय, असा अर्थ समजावा. ह्या महाराष्ट्र क्षत्रियांनीं रजपुतान्यांतील रजपुतांशीं संबंध जोडण्यास धावूं नयें. कारण जातिनिर्णायक असे जें संस्कृत ग्रंथ आहेत त्यांत रजपूत म्हणजे क्षत्रियांची एक कनिष्ठ प्रकारची जात आहे असें म्हटलें आहे. तेव्हां त्यांच्याशीं तादात्म्य पावण्याची उत्कंठा इकडील कांहीं महाराष्ट्र क्षत्रियांनीं यद्यपि दाखविली व उपजातींचें एकीकरण करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला तत्रापि त्यानें भोसल्यांचे कुळ चितोडच्या घराण्यापासून निपजलें, ह्या म्हणण्याला आश्रय मिळणें ऐतिहासिक रीत्या दुरापास्त आहे. शिवाय चितोडच्या घराण्याचें गोत्र, कुलदैवत, वगैरे पुष्कळ बाबी भोसल्यांच्याहून भिन्न आहेत, ही कथा निराळीच आहे.
महाराष्ट्रांतील बहुतेक सर्व आडनावें (१) धंद्यावरून, (२) खोडीवरून किंवा लकबीवरून, व (३) गांवावरून पडलीं आहेत. कित्येक आडनावें गोत्रावरूनहि पडलीं आहेत. शिवाजीच्या वेळेस जे लाखो नवीन धंदे देशांतील लोकांना मिळाले त्यांवरून मराठी, संस्कृत व फारशी नवीं व जुनीं आडनांवें प्रचारांत आलीं. मंत्री, डबीर, झुंजार, वगैरे आडनावें शिवाजीच्या वेळेपासून नवीन घराण्यांना पडली आहेत. मागें इ. स. १५४१ व १५५८ तील दोन लेख दिले आहेत त्यांत खालींल नावें व आडनांवें येतातः-
(नावें व आडनावें वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८०
१५३४ श्रावण वद्य २
अज रखतखाने खोदायवद खान अलीशान हैबतखान दामदौलत ता। आतामलीक नायब गैबत वा कारकुनानि पा। वाई बि॥ हर्ची सु॥ सलास असर अलफ जमीन चावर १॥ दर सवाददु मौजेन मजकूर
मौजे बोरीखल मौजे किणही
१ .॥-
बा। इनाम बो। गोपीनाथभट बिन रामेश्वरभट जुनारकर तबीब अवलाद राघव परसराम मरहूम बाद ऊ औवलियाद आफाद ऊ बमोजीब भोगवटा खुर्दखत रखतखान मोकरम दर सालगु॥ मुतैन खा अस्त वायद की एशाबनोका तागायत सालगु॥ चालियेप्रमाणे भोगवटा वा तसरुफाती पाहून दुबाला कीजे तालीक लिहून घेऊन असली परतोनु दीजे मो।
तेरीख १५ माहे जमादिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
शुद्रांस नुसत्या सौम्य नांवानें ओळखत व अतिशूद्रांस आ किंवा या प्रत्यय लावून हाका मारीत; जसे, ह-या मांग; राम्या महार, वगैरे. स्त्रियांस देवी, बाई, आउ, अवा, ई वगैरे प्रत्यय लावले जात; जसें, देवळदेवी, चांगुणाबाई, रमाऊ, रमाव्वा, रमाई, रमी, इत्यादि. ब्रह्मणांची एकरी नांवें जुन्या मराठींतल्याप्रमाणें प्रायः ओकारान्त असत; जसें, केसो, राघो, मोरो, वगैरे. मायेच्या बोलण्यांत हीं नांवें उकारान्त होत, जसें केसु, राघु, मोरु, शाहु, शिऊ, वगैरे. ह्या नांवांना बहुमानार्थी बा हा प्रत्यय लागत असे; जसे केसोबा, ज्ञानोबा, तुकोबा, इत्यादि. क्षत्रियांच्या नांवांना बहुमानार्थी जी हा प्रत्यय ओकारान्त, अकारान्त किंवा उकारान्त मूळ नांवांपुढे लागे; जसें ह्यादोजी, ह्यादजी, महादाजी, ह्यादूजी. हा जी प्रत्यय संस्कृत आर्य, महाराष्ट्री अज्ज, पासून आला आहे. महादेवार्य, महादाज्ज, महादजी, महादोजी, महादजी, महादूजी. उत्तरादाखल इंग्रजी Sir ह्या अर्थी जो शब्द महाराष्ट्रांत उच्चारतात तो आर्य, अज्ज, जी अशा परंपरेनें बनला आहे. नायकिणींच्या नांवांपुढे जी प्रत्यय येतो तो अज्झा नामक प्राकृत शब्दापासून आला आहे. स्त्रियांच्या नांवांपुढील आऊ, आई, आवा, हे प्रत्यय अयि, अव्वा वगैरे प्राकृत शब्दांपासून निघाले आहेत.
ह्या मराठी नांवांत कांही शब्द (१) शुद्ध संस्कृत आहेत, (२) काहीं महाराष्ट्रांतून जुन्या मराठींत आले आहेत, (३) कांहीं शुद्ध देशी आहेत, (४) कांहीं फारशींतून आले आहेत, (५) व कांहीं तेलंगी, कानडी वगैरे द्राविड भाषांतून आले आहेत. (१) नारायण, (२) कान्होजी, (३) दगडू, (४) फिरंगोजी, व (५) तिमाजी, हीं ह्याचीं अनुक्रमें उदाहरणें होत. आडनांवांचाहि असाच पंचविध प्रकार आहे. पिंगळे, सावंत, मराठे, काळे, शिर्के, गोरे, सांळुंके, भोसले, फर्जंद, पटवर्धन, घैसास, महाराव, यादव, जाधव, निंबाळकर, पोवार, मोहिते, चिटणीस, पोतनीस, आर्चाय, वगैरे आडनांवांत संस्कृत, महाराष्ट्री, देशी, फारशी व कानडी त-हेचीं आडनावें आहेत. ह्या आडनांवांपैकीं संस्कृत शिलालेखांतील व ताम्रपटांतील आडनांवांव्यतिरिक्त जुन्यांत जुनें असें मराठी लेखांतील आडनांव म्हटलें म्हणजे वाडीकर सावंत यांचें होय. मठ येथील देवालयांतील इ. स १३९७ तील लेखांत न-यसीदेव व भामसावंत अशीं सावंतांचीं दोन नांवे आलीं आहेत. न-यसीदेव ज्याअर्थी इ. स. १३९७ त हयात होता व त्यानें ज्याअर्थी आपला बाप भामसावंत ह्याच्याप्रीत्यर्थ मठ येथील देऊळ बांधिलें, त्याअर्थी १३९७ च्या आधीं दोन चार वर्षे भामसावंत वारला असावा. म्हणजे भामसावंताची हयात इ. स. १३६० पासून १३९७ पर्यंत सरासरी असावी. सावंतांचें मूळ आडनांव भोसले. भामसावंताचें आडनाव सावंत होण्यास त्याच्यापूर्वी दोन चार पिढ्या त्याचे पूर्वज कोणीतरी चक्रवर्ती राजाचे मांडलिक असले पाहिजेत. त्याशिवाय भोसलें हें आडनांव जाऊन सावंत हें आडनाव पडावयाचें नाहीं. अर्थात्, १३६० च्या पूर्वी शंभर वर्षे सावंताचें कूळ कोंकणांत सावंत ह्या नांवानें महशूर होतें असें दिसतें. म्हणजे इ. स. १२६० च्या सुमारास हे भोसले आडनांवाचे सावंत हयात होते हें उघड आहे. ह्याचा अर्थ असा होतो कीं, इ. स. १२६० मध्यें भोसले हें आडनांव कोकणांत प्रसिद्ध होतें. हे सावंतवाडीचे भोसले सातारकर भोसल्यांचे संबंधीं आहेत. ह्याला पुरावा प्रस्तुत खंडांतील १३८ वा व ६२ वा लेखांक यांचा आहे १३८ व्या लेखांकांत मनाबाई सरदेसाईणीनें कोल्हापूरच्या संभाजी महाराजांस काका ह्या शब्दानें गौरविलें आहे. व ६२ व्या लेखांकांत दुस-या शिवाजीनें सावंताना भोसले हे आडनांव लाविलें आहे. तेव्हां हें भोसल्याचें कुळ इ. स. १२६० पासून महाराष्ट्रांत आहे हे पूर्णपणें सिद्ध आहे. आतां सातारचे छत्रपति भोसले चितोडच्या वंशापैकीं आहेत अशी जी गप्प आहे तिच्याशीं ह्या सिद्धीचा कितपत मेळ बसतो तो पाहूं. सातारची बनावट वंशावळ येणेप्रमाणें:-
(वंशावळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७९
१५३४ श्रावण शुध्द ३
अज रखतखाने खुदायवद मा। सर्क मा। अबर तुलीदयामे दौवलतहू बजानेबु कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानी परगणे सगमनेर व हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मुजेरियानी व मोहतर्फा रया कसबे वावी पा। मजकूर बिदानद सु॥ सन सलास असर अलफ कसबे मजकुरी पेसजी बाउजी बिन मोकदम होता तेणें राघोजी ठोबरा कसबे मजकूर यासि मा।रा करोन मारिला व तेरा खून केले ++++++ जे हरामखोर +++ परागदा जाला त्यावरी हुजुरून बालसा घेऊन याची गर्दन मारिली व अवघे पोगडे मारिले हाली कसबे मजकूरची मोकदमी संभाजी बिन विठोजी भोसले यासि हुजुरून मर्हामती करून मिरासी करून दिधली असे औलाद व अफलाद चालवीजे पेस्तर बाउजी ++ तेली वा दार व गोत्र व हरकती करून उभे राहातील त्याची गर्दन मारिजे हाली सभाजी बिन विठोजी भोसला यासि मोकदमी मर्हामती केली असे या पासुनु मोकदमीचे काम घेत जाइजे औलाद व अफलाद चालवीत जाइजे दरी बाब फर्मान हजरती बसिके ++ सभाजीपासी असे तेणेप्रमाणे याची मोकदमी चालवीजे पा। हुजूर मोर्तब सुद रुजु सुरुनिवीस
तेरीख १ माहे जमादिलाखर
जमादिलाखर
बार सुद बार सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
फारशी भाषेचें साम्राज्य झालें असतां, मराठी वाचविण्याला व वाढविण्याला जे उपाय पूर्वी योजिले गेले तेच उपाय सध्यांहि योजिले पाहिजेत. भाषेचा संकोच म्हणजे आपल्या हालचालींचा संकोच, हें लक्षात घेतलें पाहिजे. जसजशा आपल्या हालचाली संकुचित मर्यादेंत येऊं लागल्या, तसतसा मराठी भाषेचा संकोच झाला. तेव्हां मराठी भाषेचा विकास करण्याला आपल्या राष्ट्रीय हालचाली वाढविल्या पाहिजेत. हालचाली न वाढवितां भाषेचा विकास करूं पहाणें म्हणजे तदबाह्य शक्ति न लावितां एखादी वस्तू हालवूं जाण्यासारखें आहे. धार्मिक, सामाजिक, व्यापारिक, राजकीय राष्ट्रीय, लौकिक, शास्त्रीय, वगैरे सर्व प्रांतांत पुनः नव्यानें जेव्हां आपण जोरानें हालचाल करावयास लागूं तेव्हां त्या त्या प्रांतांत मराठी भाषेचा उपयोगहि आपल्याला सहजगत्या करावा लागेल. भाषेंत शास्त्रीय ग्रंथसंपत्ति व्हावी ह्या सदिच्छेनें कोणी प्राणिशास्त्राच्या गूढ सिद्धांताचें प्रणयन मराठींत केलें, तर तो त्याचा प्रयत्न व्यर्थ जाईल. कारण राष्ट्रीय हालचालींची मर्यादा प्राणिशास्त्रांच्या सिद्धांतांचें प्रणयन अवश्य वाटण्यापर्यंत गेलेली नाहीं. मनुष्याची कर्तबगारी नमूद करण्याचें साधन भाषा होय. जेथें कर्तबगारी नाहीं तेथें भाषेनें नमूद तरी काय करावें? मुसुलमानी अमलांत मराठ्यांच्या सर्व राजकीय हालचाली बंद झाल्या. त्याबरोबर राजकीय वाङ्मयहि मराठींत व्हावयाचें बंद झालें. अशा अडचणीच्या प्रसंगीं महाराष्ट्रांतील साधुसंतांनीं हालचालीचें एक निराळेंच स्थान उत्पन्न केलें. तें स्थान धर्म व भक्ति ह्यांचे होतें. ह्या स्थानांत राष्ट्रातील सर्व लोकांचे एकीकरण करण्याचा त्यांनीं प्रचंड उद्योग केला; व हा उद्योग लोकांना समजून देण्याकरितां मराठी भाषेचा उपयोग केला म्हणजे मराठींत ग्रंथरचना केली. पंचवीस वर्षांपूर्वी विष्णुशास्री चिपळोणकरांनींहि हाच मार्ग स्वीकारला. विष्णुशास्री हालचाल करणारा मनुष्य होता, व जी हालचाल करण्याचा त्याचा मनोदय होता ती समजून देण्याकरितां मराठींत लिहिणें त्याला जरूर वाटलें. मराठी भाषेला उर्जितदशेला आणणें ह्या प्रयोगाचा अर्थ कांहींतरी राष्ट्रहिताची हालचाल करणे हा आहे; दुसरा काहीं नाहीं. जेव्हां आपल्या इकडील कोणी गृहस्थ इंग्रजीत लिहितो किंवा बोलतो तेव्हां स्वदेशाच्या हालचालीशीं त्या बोलण्याचा किंवा लिहिण्याचा साक्षात् संबंध नसतो किंवा असल्यास फारच दूरचा असतो, असें म्हणणें ओघास येतें. रा. रा. टिळकांनीं आर्याचें मूलस्थान हे पुस्तक इंग्रजींत लिहिलें ह्याचा अर्थ असा होतो कीं, ह्या पुस्तकांतील विषयाचा उपयोग इकडील लोकांना नसून तिकडील लोकांना आहे म्हणजे हे पुस्तक तिकडील हालचालींच्या हितार्थ लिहिलेलें आहे, हें उघड आहे. रानड्यांनीं मराठ्यांचा इतिहास इंग्रजींत लिहिला ह्याचाहि अर्थ हाच आहे; व इंग्लिश लोकांची मतें महाराष्ट्रासंबंधानें नीट करण्याकरितां हे पुस्तक आपण लिहितो, असें त्यांनीं स्पष्ट म्हटलें आहे. तेव्हां स्वदेशाचें हित व स्वभाषेचा उपयोग हे समानार्थक शब्द होत हें स्पष्ट आहे. जेथें स्वदेशाचें हित नाहीं, तेथे प्रायः स्वभाषेचेंहि हित नाहींच. ह्यासंबंधानें येथें आतां जास्त पाल्हाळ करावयाला वेळ नाहीं. हें प्रकरण एखाद्या स्वतंत्र निबंधाचाच विषय होण्याच्या योग्यतेचें आहे.
(९) शिवाजीच्या पत्रांच्या अनुषंगानें मोडी अक्षर व फारशीच्या सान्निध्यानें मराठी भाषेचें स्थित्यंतर, ह्या दोन बाबींचा येथपर्यंत ऊहापोह झाला. आतां शिवाजीच्या पत्रासंबंधानें तिसरी विचार करण्यासारखी बाब म्हटली म्हणजे स्त्रीपुरुषांच्या नावाची होय.
इ. स. १२९० पासून १६५६ पर्यंत महाराष्ट्रांत चातुर्वर्ण्यातील निरनिराळ्या वर्णाच्या नांवांपुढे निरनिराळे विशिष्ट शब्द येतात. राजांच्या नांवांपुढे देव किंवा राज, राऊ, राव असे शब्द येतात; जसे सिंघणदेव, कृष्णदेव, रामदेव, बिंबदेव, वगैरे कधीं कधीं हे दोन्ही शब्द नांवापुढें जोडले जात, जसें रामदेवराव. क्षत्रियांच्या नांवांपुढे सिंग, राऊ किंवा जी हे प्रत्यय लागत; जसें, मानसिंग, विकटराऊ, अमृतराऊ, धनाजी, शिवाजी, शहाजी, वगैरे. कधीं कधीं हे दोन्ही प्रत्यय लागले जात; जसें शिवाजीराऊ, धनाजीराऊ ब्राह्मणांच्या नांवांपुढें गृहस्थ असल्यास देव, पंत, पंडित किंवा जी असे प्रत्यय लागत; जसें, ज्ञानदेव, नारोपंडित, नारोपंत किंवा नारोजी, ब्राह्मण भिक्षुक असल्यास, त्याच्या नांवापुढें भट्ट हें पद लागे; रामभट, गुंडभट वगैरे. वैद्य, शास्त्री किंवा ज्योतिषी असल्यास, नांवापुढें तदर्थवाचक शब्द लागत; जसें, बाळज्योतिषी, नरसिंहवैद्य, कृष्णशास्त्री, रामाचार्य, इत्यादि सामान्य ब्राह्मणांना हे प्रत्यय लावीत नसत; जसें मोरो त्रिमळ, केसो नारायण, काशी त्रिमळ, विसा मोरो, दादो नर्सो, वगैरे. वैश्यांना सेठी, देव हीं उपपदें लावीत; जसें, नामदेऊ, दामासेठी, रामसेठी, हरिसेठी, वगैरे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
हीच टीका इतर गृहस्थांच्याहि इंग्रजी लेखांसंबंधानें करतां येईल. ह्या सर्व लोकांना काय भुरळ पडलें असेल तें असो. इंग्रजींत लिहिणें म्हणजे कांही अजब चमत्कार करणें आहे असें ह्यांना निःसंशय वाटत असावें असें दिसतें. खरें म्हटलें असतां इंग्रजी लिहिण्यापासून ह्यांना वरकरणी फायदा किती असला तरी वस्तुतः कांहीं फायदा आहे असें वाटत नाहीं. श्रेष्ठ इंग्रज ग्रंथकारांप्रमाणे आंग्लभाषाप्रभुत्व ह्यांच्यापैकी एकालाहि येणें दुरापास्त आहे. तेव्हां विलायती सरस्वतीपुत्रांत ह्यांना उत्तम इंग्लिश ग्रंथकार म्हणून कोणी मान देतो असा बिलकुल प्रकार नाहीं. एकप्रकारचें तकलादु व बटबटीत इंग्रजी हे लोक लिहितात, असाच अभिप्राय ह्यांच्या इंग्रजीवर इंग्रज टीकाकारांकडून प्रायः पडला जातो. जिवापाड मेहनत करून परभाषेंत लिहावें आणि तत्रस्थ लोकांनीं फार तर intelligent म्हणून सर्टिफिकेट द्यावें, ह्यांत ह्यांना काय अभिमान वाटत असेल न कळे! हें ह्या लोकांच्या इंग्रजीभाषेसंबंधानें झालें. ह्यांच्या ग्रंथांतील विचारासंबंधानें पहातां, यूरोपांतील मोठमोठ्या पट्टीच्या शास्त्रज्ञांच्या विचारांच्या तोडीचे सिद्धान्त ह्यांच्याकडून निर्माण झाले आहेत असें किंचितच म्हणतां येईल. केन्, ब्राडला वगैरेचे विचार जितपत प्रगल्भ व खोल असतात तितपतच ह्या लोकांचे असतात. ग्लाड्स्टन्, हक्सल्ले, बन्सेन, मूलर, हंबोल्ट, ह्यांच्यापासून केन व ब्राडला, जितके दूर आहेत त्यापेक्षां आपल्याइकडील ही पुढारी मंडळी वरील मंडळींच्या फारशी जवळ नाहींत. येणेंप्रमाणें भाषाप्रभुत्व किंवा विचारसामर्थ्य वस्तुतः इतर राष्ट्रांतील लोकांना थक्क करून टाकण्यासारखें नसतांना, परभाषेंत लिहून तींतील लहानमोठ्या ग्रंथांच्या व चोपड्यांच्या गर्दीत गडप होऊन जाण्यांत काय पुरुषार्थ असेल तो असो! ही कृति केवळ तळ्याच्या पाण्यांत पडणा-या धुळीच्या कणाच्या मासल्याची दिसते! कोटश्च कीटायते! परंतु जेथें सर्वत्र उलटा प्रकार झालेला दिसत आहे. तेथें राष्ट्रांतील पुढारी म्हणून नांवाजली जाणारी मंडळीहि कांहींशी भांबावत जावी, ही सरळच गोष्ट आहे. सध्याच्या काळाचा महिमाच असा आहे कीं, स्वधर्म टाकावा, स्वदेश सोडावा व स्वभाषा विसरावी असें विचारवंतांना व देशाभिमान्यांनाहि वाटावें!
असा मराठीचा संकोच सध्यां चोहोकडून होऊं लागला आहे. सरकार परदेशी पडल्यामुळें तें ह्या भाषेला वा-यालाहि उभें राहूं देत नाहीं. व एतद्देशीय विद्वान् लोकांच्या स्वदेशाभिमानाच्या कल्पना कांहीं अपूर्व झाल्यामुळें, गंभीर ग्रंथरचनेच्या कामीं इंगजी भाषा वापरल्यानें मराठीचा आपण कांहीं गुन्हा करतों, हे त्यांच्या गावींहि नसतें. येणेप्रमाणें इंग्रजांच्या अमलाखालील महाराष्ट्रांत मराठीचा संकोच अत्यंत झालेला आहे. दहा पांच मोठीं मराठी संस्थाने आहेत, तेथीलहि दरबारी भाषा अलीकडे इंग्रजीच बनत चालली आहे. अशीच स्थिति शंभर दीडशें वर्षे चालली, तर मराठी निःसशय-मिश्र नव्हे- भ्रष्ट नव्हे- तर अजिबात नष्ट होईल.
मुसुलमानांची संस्कृति मराठ्यांच्या संस्कृतीहून कनिष्ट असतां व फारशी ग्रंथसमूह मराठींतल्यापेक्षां संपन्न नसतां, आणि मराठीतील ग्रंथकारांनीं स्वभाषेला उचलून धरिली असतां, तीनशें वर्षात फारशीने मराठीला गिळंकृत करण्याचा जर घाट घातलेला आपण इतिहासावरून पहातों, तर जेथें राज्यकर्त्यांची संस्कृति मराठ्यांच्या संस्कृतीहून कांहीं बाबतीत निःसंशय श्रेष्ठ आहे, जेथें इंग्रजी ग्रंथसमूह मराठी ग्रंथसमूहाहून सहस्रपट मोठा आहे. व जेथे देशांतील विद्वानांनींहि स्वभाषेला सोडल्यासारखीच आहे, तेथें तीनशेंच्या ऐवजीं शंभर दीडशे वर्षांतच स्वभाषेचा अंत झाल्यास नवल कसचें? मी म्हणतों ह्या विधानांत अतिशयोक्ति बिलकुल नाहीं. चालली आहे अशीच जर स्थिति शंभर दीडशें वर्षे चालेल, तर मराठी भाषेचें दुसरें तिसरें काय होईल?
आणि स्वभाषा नष्ट होणें म्हणजे देशावर केवढी घोर आपत्ति येणें आहे! गेलीं पंचायशीं वर्षे तर आपण बहुतेक फुकट घालविलीं. त्या सगळ्या अवधींत ज्याला प्रतिभासंपन्न म्हणता येईल असा मराठींत एकच ग्रंथकार उदयास आला आणि तोहि दहा पाच निबंध लिहून भर तारुण्यांत मावळून गेला. ह्यापुढें गमाविली गोष्ट पुनः साधावयाची असेल व बुडालों आहो त्याहून जास्त बुडवायचें नसेल, तर स्वभाषेला, म्हणजे स्वतंत्र विचाराला, म्हणजे स्वदेशाला, कायेनें, वाचेनें व मनानें आपण शब्दशः वाहून घेतलें पाहिजे नाहींतर, प्रसंग कठिण आहे!