लेखांक ३८२
१५३८ मार्गशीर्ष वद्य ४

(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। पुण्या ताहा मोकदमानी मौजे वडगाऊ ना। पेडगाऊ का। पाटस पा। मजकूर दा। की हरची सु॥ सन सबा असर खुर्द खत रफतखाने छ माहे रमजान पैवस्तगी छ १७ माहे जिल्हेज सादीर असे जे रामेश्वरभट बिन नारायणभट जुनादार सा। आरवी मुदगल मालूम केले जे आपणासी इनाम जमीन वाहाती रुके .।. प्रज माहामद पटेल ठोबरा मुजेरी दर सवाद मौजे मजकूर सालाबाद चालिले असे तरी मोकासाई मौजे मजकूर आपुले इनाममधे बिघे वा गला घेउनु जात असे वा पेसजी घेउनु गेले असे आपुले बिघे वा गला मोकासाई नेले असे ते फिराउनु देवणे ह्मणउनु तरी मौजे मजकुरीचे मोकदमासी ताकीद करून मोकासाईयाचे बाकीमधे इनामदाराचे बिघे वा गला जे नेले असेल ते ताकिदी करून दीजे पेस्तर ऐसे आमल होऊ न दीजे वा सालाबादप्रमाणे इनामाचे सेतीचे हिसा एईल ते दुबाला कीजे तालीक घेउनु असल फिरउनु दीजे ह्मणउनु तरी बा। रजा सदरहू इनाम दुंबाला केले असे सालाबादप्रमाणे इनामाचे सेतीचे हिसा एईल ते दुंबाला कीजे मोर्तब
तेरीख १७ माहे जिल्हेज