Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक १६१.

श्री.
१६९७ वैशाख शुद्ध ६

राजश्री सखारामपंत बापू गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंग गायकवाड दंडवत विनंती ती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल सदैव पत्रीं लेखन करून संतोषवीत असावें. विशेष. आपणाकडून पत्रें आह्मांस व साहित्याविसीं पत्रें अमदाबादकर ग्रहस्त व पित्रव्यास येत गेली तीं त्यांजकडे पावती करीत गेलों. साहित्याचा प्रकार आजपर्यंत प्रथम दिवस! त्यापैकीं आह्मीं कारकिर्दी ममतेनें पित्रव्याचे मुख्य पुत्र चिरंजीव राजश्री मल्हारराव गायकवाड आह्मांकडे आणिलें. तेव्हां अधिक शुद्ध द्वितीया-तृतीयांचीं युद्धें दोन जाहली. याज अलिकडे युद्धप्रसंग आजपर्यंत जाला नाहीं. आह्मीं बडोदें, खेड, पाटण प्रांतांची ठाणीं कायम करून, आपले लेख धैर्याविशीं येतात, त्याजवर दिवस काढितों. पुढें दिवस निघावयाचें संकट. हें पूर्वीं व हालींचे वर्तमान राजश्री दादासाहेबाकडील वगैरे, सविस्तर राजश्री बाळाजी नाईक भिडे यांचे पत्र लिहिलें आहे, त्याजवरोन कळों येईल. सारांश, मुरबीपणाचा सर्वस्वीं भरंवसा आपला आहे. त्याजवर असूं. विशेष ल्याहावेसें नाहीं. आपणाकडील साकल्यार्थ लिहून संतोषवृत्ती करावी. रा छ ४ माहे सवाल. बहुत काय लिहिणे? लोभ असों दिजे. हे विनंती-मोर्तबसूद.

पत्रांक १६०.

श्री.
१६९७ चैत्र वद्य ६

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री आबा स्वामींचे सेवेसी:-

पो बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. तुह्मीं छ २७ मोहोरमची पत्रें पाठविलीं तीं प्रविष्ट जाहालीं:--

आरमाराकडे गल्ली नेमिला त्या पौ कांहीं पोंचत नाहीं, मामलेदार तपशील सांगतात, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, तुमचे लिहिल्या पूर्वींचे सरकारचे खिजमतगार व पत्रें भाताचे वसुलास पाठविले असेत. या उपरी नेमणुकेप्रों गल्ला पोहोंचेल. कलम १
देवगड तालुकियापौ सरदार चौतीस आहेत, त्यापौ निमे तालुके मजकुरीं ठेवावे, निमे दुसरे तालुकि यांस नेमावे, ह्मणोन लिहिलें तें कळलें.

उत्तम आहे. करावें कलम १ गंगाधर, गोविंद यांणीं गलबत नारळाचें धरून आणिलें म्हणून लिहिलें तें कळलें. कलम १.
इंग्रजांचे कागद पेटींत घालून पाठविले ते पोहचले व चित्रें पावलीं कलम १.
---
गोंवेकर फिरंगीयांचे गलबत आणिलें आहे, येविशीं त्याचें पत्र आलें आहे, त्यास तहाचा ठराव कसा जाला आहे, म्हणोन लिहिलें तें कळलें. ऐशियास, तहनाम्याची नकलच अगोदर तुह्मांकडे पाठविली आहे त्यावरून कळेल. तेथें लिहिलें असेल त्याप्रों पाहून लेहून पाठवावें. कलम १.

सर्व तालुकदारांस व आरमारांस तहनाम्याप्रों सांगून .... जिवाजी विश्राम भेटीस येणार म्हणोन लिहिलें तें कळलें. उत्तम आहे. सरळपणें येत असल्यास भेट द्यावी. कलम १.

बाबूराव साळेकर याचा मजकूर तुम्हीं लिहिला तो कळला. ऐशियास मारनिले यांणीं किल्ले विजयदुर्ग येथें गंगाधर गोविंद यांजवळ चाकरी एकटेयांनी करून वेतन नेमणुके प्रों रत्नागिरीं लाऊन घ्यावें. अरमाराकडे त्याची नेमणुक नाहीं. कलम १.

एकूण कलमें सात लिहिल्याप्रों करावें. राजश्री हरबाजीराव धुळप आरमारसुधां स्वारीस गेले होते, डंगी धरून आरमारसुधां आले, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशियास, डंगीवरील माल फरोख्त करऊन आरमाराकडील तोडमोडीस लाऊन, व अडसेरीचे बेगमीस गल्ला घेऊन अडसेरीस देऊन, आरमार सुवर्णदुर्गास पाठवावें. रा छ २० सफर बहुत काय लिहिणें, लोभ असों दीजे. हे विनंती. पो छ २८ सफर.

पत्रांक १५९

श्री,
१६९६ फाल्गुन वद्य १०

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री जनार्दनपंत दादा स्वामीचे सेवेसीः-

पोष्य हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता छ २३ मोहरम मुा खेड जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष, नारोपंत नानास कैलासवास जालियाचें वर्तमान ऐकून श्रम जाहले, ते ईश्वर जाणे. एकाएकींच गोष्ट अशी घडली ! ईश्वरीसत्तेस इलाज नाहीं ! आम्हांस तर वडील होते. व राज्यांत माणूस एक ! अशा व्यक्ती दृष्टीस पडावयाच्या नाहींत. ईश्वरीसत्तेस इलाज नाहीं. हीच गोष्ट खरी. त्यांचे मागें आपण आहेत. लहान मोठ्यांचा परामर्ष करावा. खेद करू नयें. होणार गोष्ट ती चुकत नाहीं. आह्मी नानाप्रों आपल्यास मानितों. त्यांचा लोभ आमचे ठाईं कसा होता, तो तुम्हांस ठाऊक आहे. तदन्वयें करून आपण लोभ करून समाचार घेत जावा. इकडील वर्तमान तर श्रीमंत इंग्रजांकडील सरंजाम घेऊन खंबाइतास आले आहेत. उभयतां गायकवाड आह्मांस येऊन भेटणार. तोहि प्रकार अद्यापि घडला नाहीं ! दोन चार रोजांत कोणता अर्थ तो निवडेल. लिहून पाठऊं. तिकडील वृत्त लिहित जावें. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती.

राजश्री सदाशीवपंतदादा स्वामीस सा नमस्कार विनंती. उपरी. फार दिवस पत्र येत नाहीं. ही गोष्ट तुह्मांपासून दूर असावी. नानाचें वर्तमान ऐकिल्यापासून चैन पडत नाहीं. श्रीसत्तेस इलाज काय ? सदैव पत्रीं समाचार येत जावा. लोभ कीजे हे विनंती.

राजश्री तात्यांस सां नमस्कार -विनंती. उपरी; लिा परिसन लोभ कीजे हे विनंती.

पत्रांक १५८

श्री.
१६९६ फाल्गुन शुद्ध १३

सेवेसी जनार्दन आपाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. फिंगोंजी व भवानी वोतुरकर सिंपी वस्ती पेठ पुरंधर हे पुरंधरास अटकेस होते, त्यांस पुण्यास पाठविले आहेत, तरी या दोघांचा शिरच्छेद करून लिहून पाठवणें ह्मणोन स्वामचे पत्रीं आज्ञा, त्यास, आज्ञेप्रमाणें फिंर्गोजी व भवानी शिंपी यांचा शिरच्छेद केला. रा छ ११ मोहरम सुा खमको सबैन मया व अलफ. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक १५७.

श्री.
१६९६ फाल्गुन शुद्ध १२.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी-

विनंति सेवक बाजी गंगाघर मुा बेलापुर चरणावर मस्तक ठेऊन सां नमस्कार विज्ञापना तागाईत छ १० माहे मोहरम पावेतों स्वामीचे कृपावलोकनें करून सेवकाचें व तालुके मजकुराचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. काल रविवारीं संध्याकाळीं राजश्री रणछोड शेणवी वकील सरकारचे मुंबईस होते ते येथें आले. कारण श्रीमंत दादासाहेबीं सुरतेहून सनद मुंबईस पाठविली कीं, लक्षुमण गोपाळ यांस वकिली सांगितली आहे, त्यांजपासोन कामकाज घ्यावें आणि रणछोड शेणवी यांस सुरतेस रवाना करणें. हे वर्तमान मारनिल्हेचे इष्टमेस्र मोस्टीन यांणीं सांगितलें. त्याजवरोन हे तेथून चंद्रगमनी होऊन होडीस पांच रुा देऊं करोन आले. होडीवाले यानें साष्टीचे खाडींत अलिकडे मौजे वसी ता मजकूर याचे नस्तावर चिखलांत उतरोन होडी निघोन गेली. तेथें चौकी सरकारची आहे. त्यांणीं बराबर शिपाई देऊन येथें रवाना केलें. ते प्रहर रात्रीस आवशीचे पावले. त्यांणीं तोंडी मजकूर सांगितला कीं, श्रीमंत दादासाहेब सुरतेस आहेत. इंग्रजानें जागा राहावयास माहामुदी बागांत दिल्हा आहे. श्रीमंत अमृतरावजी बराबर आहेत. नाटकशाळा आठजणी व पंचवीस च्याळीस पावेतों खिजमतगीर वगैरे आहेत. इंग्रजानें आपले लोक जवळ ठेविले आहेत. सर्व साहित्य त्याजकडूनच होत आहे. मुंबईहून राजश्री सदाशीवपंत सौनी व नारोपंत गेले ते श्रीमंताजवळ आहेत. कारभार प्रस्तुत नारोपंत करितात. सुतेंचे जफ्तीस सरकारचे राऊत हजार बाराशें होते. त्यांस दादासाहेबीं दोन वेळ सनदा सादर केले व निदानीं सांगोन पाठविलें कीं, उठोन जाणें, नाहींतर खासा स्वारी होईल! त्याजवरोन बंदीचे लोक पांच कोस माघारे सरले. इंग्रजांची उमेद तीन हजार गाडदी वगैरे लढाईचा सरंजाम घेऊन, रा गोविंदराव गायकवाड व खंडेराव गो यांजकडोन पो बडोदें आधीं सर करोन, गोविंदरायास द्यावें, नंतर अमदाबाज घ्यावी. भडोजेस गाइकवाडाची तक्षीम निमें आहे ती इंग्रेजास बक्षीस द्यावी आणि मोबदला गाइकवाडास बडोदे पौ ऐवज सरकार तर्फेचा द्यावा. राजश्री हरीपंत तात्यांचे फौजबराबर लढाई घेऊन श्रीमंतांस देशीं पुणेंयास आणावें. इतके जालियावर इंग्रजांस सुरतेची चौथाई बक्षीस द्यावी. सुरत-अठाविशी, वसई, बेलापूर देखील द्यावें. याजप्रों करार मदार उभयपक्षीं होऊन शिक्के देखील झाले. इंग्रजानें बंदर किना-याचे तालुकदारांस व धुळपास दादासाहेबांच्या सनदा आणावयाविशीं मुजरत फतेमारी गेली आहे. सनदा आल्या ह्मणजे ज्याच्या नांवच्या येतील तिकडे पाठवाव्या. कोण सनद मानितो, कोण मानीत नाहीं, हें पहावें. प्रस्तुत, दादासाहेब म्हणजे मोठा किमया इंग्रजांचे हातीं सांपडला आहे. दुसरें दैवत नाहीं. ऐसा प्रकार मुंबईस जाला आहे. सुर्तेहून फतेमारी मुंबईस दोहोंरोजां येत्ये. दादासाहेबांचे पत्र मुंबईस जनरलास आलें कीं पुणेकर सावकार मुछदी यांचा ऐवज मुंबईस आहे तो जप्त करणें, जाऊ न देणें. याप्रों पत्र आलें आहे! इंग्रजांस प्रस्तुत स्वर्ग ठेंगणी जाला आहे. वरकड मुंबईत आज पांचशें माणूस व साष्टी टांपूत आठ नवशें, उरणास दिडशें पर्यंत आहे. आणि हिकडून कोणी त्याजवर जात नाहीं. याजमुळें फार टिका करितात, असा प्रसंग! मुंबईस लोकांची भरती नाहीं, ऐसे घडलें नाहीं, तिजोरी जामदारखान्यामध्यें आज पंचवीस हजार रुा पाहिजेत तरी नाहींत, धुळपाचें अरमाराची मोठी सलावत इग्रंजावर आहे, परंतु तोहि अरमार सुद्धा येत नाहीं. दबोन राहिला आहे. याजमुळें इंग्रज फारच हांवभरित जाला आहे. बंगाली व चिनई व विलायती व बसराई मिळोन दाहा अकरा तरांडीं तालचिरीस नागखाडेयास आहेत. वर माल बहुत आहे. हलावें यासाठीं खोटी आहे. मुंबईस गुराबा व रेवा दोन तरांडीं मुंबईपैकीं आहेत. परंतु याचा भरंवसा धरीत नाहीं. धुळपाची सलाबत मोठी गालीब आहे ! तिसरें तरांडें विलायती येणारं आहे. तें आलेंयाजवर मग यावे, ऐसा करार जाला आहे. प्रस्तुत धुळप हिकडे नाहीं त्या अन्वयें तिकडेच त्या तरांडेयाजवर सख्ती करून गळीं पडला तर मोठें काम होईल. इंग्रजांस तितकी दहशत आहे. याजकरितां सरकारांतोन धुळपाकडे कोणी शाहाणा माणूस व पत्रें जावोन, त्यास बक्षिस देऊं करोन सुवर्ण वगैरे तालुकेयाचें आरमार एकत्र करून, त्या तरांडेंयांजवर जावें अथवा मुंबईस यावें, लूट माफ करावी, शहर लुटोन फन्ना करवावें. याप्रों जालेयास इंग्रजांचा गर्व परिहार होईल. इंग्रज ह्मणतो कीं, सर्वांचा ऐवज मुंबईस आहे, यामुळें आह्मांवर सकती कोणी करणार नाहींत. याप्रों बोलतात, ह्मणोन रणछोड शेणवी सांगतात. याजवरोन विनंति लिा आहे. मारिनल्हेचे मानस स्वामीचे भेटीस यावयाचें बहुत आहे. आज्ञा होईल त्याप्रों वर्तणूक करितील. कित्तेक मजकूर स्वमुखें विनंति करणार आहेत. सरकार उपयोगीं आहेत. आशेप्रमाणे वर्ततील. श्रीमंतांस मुंबईस आणावें हें मानस इंग्रजांचें नाहीं. दुसरा मजकूरः सावकारी वर्तमान रा गोविंदराव गो व खंडेराव गो दोन्ही राजश्री हरीपंत तात्यांकडे रुजू झाले. हे असल्यास इंग्रजाच्यानें कांहीं होत नाहीं. फजित पडतो. साष्टी तालुका घेतला. पुढेंही मनसबा कित्तेक करितो. हा विचार मेस्त्र मोस्टीन याचे व दुसरे दोन कोशलदार यांचे विचारास येत नाहीं, परंतु सरकार काम ! आणि साष्टीचें यश आलें. याजमुळें उपाय नाहीं, ऐसें ह्मणतात. सदरहु विनंति मानिल्हेचे जबानीवरून सेवेसीं लिा आहे. रणछोड शेणवी यास हुजूर आणावयाचें असल्यास, राजश्री विसाजी कृष्ण यांस आज्ञापत्र असावें. ह्मणजे घोडे व तटू देऊन रवाना करितील. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक १५६.

श्री.
१६९६ माघ–फाल्गुन

सेवेसी नारो आपाजी सां नमस्कार विज्ञापना. विसाजी कृष्ण यांस तूर्त महिनाभर आणूं नये. खालें आहेत त्याप्रों असों द्यावे. परंतु, त्यास निक्षून पत्र असावें कीं, तुह्मी परशीकाजवळ जाऊन सारे फौजेनिशी राहाणें, केलण्या (कल्याण ) कडून परशिकापावेतों पातळ उतळ राऊत तलाव्यास पाठवीत जाणें, कल्याणास एकंदर न राहणें, या प्रों परिच्छिन्न ल्याहावें. हे त्यांच्यानें होत नसल्यास मग दुसरे पत्रीं काय आज्ञा करणें ते करावी. कर्नाटकांत पाठविणें जरूर असिल्यास तसेंहि करावें. विसाजी केशव व सर,... आपाजी हरी व शिवाजी विठल यांस निक्षुण पत्रें पाठवावीं. चौदाशें माणुस आवघें साष्टीच्या बेटांत येशवंतगडसुधां इंग्रजांचें आहे. तुह्मांजवळहि भरणा बराच आहे. याउपरी हर तरतूद करून इंग्रेजांस पेंच पडे, बेटांत लोक उतरून ठरेत, अशी तरतूद होत नाहीं, हें ठीक नव्हे. हेटधारे लोकांस इंग्रज काय करितो ? आंतील आंत खायास व पाणी पायच्या माणसांस उपड आहे असें असोन कडव्या माणसांवांचून होतच नाहीं ह्मणऊन लिहितां ! तरी गनिमी त-हेनेंहि आंत राहीन ह्मटल्यास त्यास सहजच पडेल ते तरतूद करून लेहून पाठवणें. ह्मणऊन पत्रें लेहून पाठवावीं.

                                                                                लेखांक ३८५

                                                                                                                                                            १५४० आश्विन वद्य ७                                                                                                                                                 
                                                                            68 2   

                                                                                         (फारसी मजकूर)          

 

                                                                               371           

 

                                                                            68 2          68 2                                                                

अज दिवाणि रखतखाने रवास बजानेबु कारकुनानी व देसमुखानी सा। दौलताबाद व मुकासाईयानी व हुदेदारानी अजहती मुकासाई हाल व इस्तकबाल व मोकदमानी मौजे चाभारवाडी पा। एळूर सा। मजकूर बिदानद सु॥ सन तिसा असर अलफ नारायणभट बिन दामोधरभट व प्रभाकरभट बिन रामेश्वरभट सो। आरवी मुदगल बदगी हजरती मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर एक गज सरायनी दर सवाद मौजे चाभारवाडी पा। एळूर सा। दौलताबाद देखील नखतयाती ता। देहाये व ता। ठाणे व पायपोसी व वेठीबेगारी कुलकबाब व कुलकानु बाहुजती विठोजी राजे भोसले अर्बा असर व अलफ छ २० माहे सौवालु आहे फर्मान बसिके खास मर्‍हामती होय मालूम जाले बाइसारुफाती दिवाणआला बराये इलतमेस देवविले नारायणभट बिन दामोधरभट व प्रभाकरभट बिन रामेस्वरभट सो। आरवी मुदगल यासि इनाम जमीन चावर एक गज सरायनी दर सवाद मौजे हुजती सदर्हूप्रमाणे करार केले असे ता। समान असर अलफ जैसा भोगवटा व तसरुफाती चालू असेली ते चि दर निसबती दुमाला कीजे औलाद व अफलाद चालू दीजे दर हर साल फर्मानाचा उजूर न कीजे तालीक घेऊन असेली फिराऊन दीजे

मलिक अजम एकदर इनामदारानी तिसा असर अलफ छ २० माहे सौवालू जमीन चावर एक बा। सवाद दफता खास मोर्तब सुदु

                                                                                                                                                                                                     385 1

 

तेरीख १७ माहे

पा। हुजुरु

 

                                                                                 385 2

ह्यांपैकीं रामचंद्र, शंकर, महादेव, गोविंद, बल्लाळ हीं नांवे अद्यापहि चालतात. जैत्रपाळ ह्याचें हस्व जैतु, जैतुगि वर दिलेल्या मराठ्यांच्या नांवांपैकी विसावें नांव जें जैतोजी त्याच्याशीं जुळतें. जैतोजी हें जैतो ह्या नांवाचें बहुमानार्थीरूप आहे. जैतुगि ह्या शब्दांतील गि हा, जी बद्दल अपपाठ नसल्यास, बहुमानार्थीप्रत्यय तर खास आहे. प्रस्तुत खंडांतील पहिल्या लेखांकांतील कोनेरी हें नांव व ह्या वंशावळींतील कन्हार हें नाव एकच आहे. ब्राह्मणांच्या नांवांच्या यादींतील सातवें नांव मल्लिभट्ट व यादवांच्या वंशावळींतील मल्लुगि हे दोन्ही शब्द मल्ल, मल्लो, मल्लूपासून निघाले आहेत. राजगि हें अर्वाचीन रायजी, राजजी, राजाजी, ह्यांचे प्राचीन रूप आहे. वेसुगि व वाडुगि हीं वेसु व वाडु ह्यांची बहुमानार्थी रूपें आहेत. ह्यांची येसूजी व वाडोजी अशी अर्वाचीन रूपें व चा य होऊन होतात. गांगेय ह्याचें गांगो हें रूप प्रसिद्ध आहे. सिंघण, सेउण, धाडियप्पा, परम्मदेव व भिल्लम ह्या शब्दांचीं अर्वाचीनरूपें मात्र फारशी सध्यां प्रचलित नाहींत. ब्राह्मणांच्या यादींत विडाडि हें नांव आलें आहे. तें बीडाद्रि ह्या नावाचें प्राकृतरूप आहे. हेमाद्रि ह्या शब्दाचें जसें हेमाडि, हेमाड, असें रूप होतें तसेंच हेंहि होतें. मराठ्यांच्या यादींतील चांगो व तेराव्या शतकांतील चांगदेव हीं नावें एकच आहेत. सारांश, महाराष्ट्रांतील विशेषनामांची परंपरा नवव्या शतकापर्यंत जाऊं शकेल. रामदासस्वामींची वंशावळ नवव्या शतकापर्यंत गेलेली प्रसिद्ध आहे. तसेंच पटवर्धन, घैसास, वगैरे आडनांवेंहि अशींच जुनीं आहेत. तेव्हां विशेषनामांच्या प्रदेशांत मराठ्यांच्या इतिहासाचा प्रवाह आज एक हजार वर्षे सारखा अप्रतिहत चालत आला आहे. मुसुलमानी अमलातं मेहरबान् अजम, वगैरे उपपदें ब्राह्मण व मराठे ह्यांच्या नांवांपाठीमागें लागत, परंतु मराठशाही पुनः झाल्यावर राजश्री, राजमान्य, हे जुने मायने पुन्हां उदयास आले. प्रस्तुतकाळीं मिस्टर, सर, वगैरे शब्द महाराष्ट्रांतील लोकांच्या नावामागें हमेश लागलेले दिसतात. कांहीं फारशी विशेषनामें घेण्यापलीकडे विशेषनामाच्या प्रदेशांत मुसुलमानी अमलांत म्हणण्यासारखी ढवळाढवळ झाली नाहीं. परंतु काहीं फारशी नांवें प्रचारांत आलीं ही लहानसान गोष्ट नव्हे. उद्यां एखाद्या भटानें आपल्या मुलाचें नांव टॉमस किंवा वुइल्यम ठेविलें तर तें जितकें विलक्षण दिसेल तितकींच फिरंगु, दर्याजी, वगैरे नांवें प्रथम ठेवतांना दिसलीं असतील. हीच टीका आडनांवांनाहि अशीच लागूं करतां येईल.

(१०) प्रस्तुत खंडांत छापिलेल्या पत्रांसंबंधानें चवथी विचार करण्यासारखी बाब म्हटली म्हणजे गांवें, खेडीं, प्रदेश, नद्या, प्रांत, तालुके, इलाखे, थडी, देश, ह्यांच्या नांवाची आहे. मुसुलमानांच्या पूर्वी व वेळीं ह्यांचीं नावें कशीं होती व ह्यांच्या हद्दी कोठवर होत्या, ह्याचा विचार इतका महत्त्वाचा आहे कीं, महाराष्ट्रांचा मध्ययुगीन व शिवकालीन इतिहास त्याच्या शिवाय दुर्बोध राहील. परंतु, पुढील एक दोन खंडांत कांही फारशी लेख यावयाचे आहेत ते छापून झाल्यावर ह्या मनोरंजक व बोधप्रद प्रकरणावर खुलाशानें लिहिण्यास सोईचें पडेल.

(११) शिवकालीन पत्रव्यवहारासंबंधीं सामान्य विचार येथपर्यंत झाला. आतां ह्यापुढें प्रस्तुत खंडांत छापिलेल्या शिवाजीच्या प्रत्येक पत्रासंबंधानें बाकींच्या कांहीं बाबीविषयीं विशेष माहिती नमूद करितों.

[लेखांक १ व २]. हे दोन्हीं लेखांक अस्सल आहेत. ह्या दोहोंतहि शिक्का व मोर्तब फारशी आहेत. षाहनूरगादअल्ली दिनायतराव अशा शिक्क्यांचा पाठ मीं छापील पत्रांत दिला आहे, परंतु तो चुकला आहे. खरा पाठ दियानतराव बंदेहईआली आदिलशाह् असा आहे. ह्या दुस-या पाठाचा अर्थ आली आदिलशाहाचा सेवक दियानतराव असा होतो. मुसुलमानांची ही शिक्क्याची फारशी पद्धत शिवाजीनें उचलली. शिवाजी व त्याचे कामगार ह्यांनीं फारशीच्या ऐवजीं मराठी व संस्कृत भाषा वापरली इतकेंच महंमद आदिलशहा १५ नोव्हेंबर १६५६ त वारला. व त्याचा मुलगा आली आदिलशहा गादीवर आला. ह्या दोघांच्या कारकीर्दीत दियानतराव विजापुरास दफ्तरदारीच्या कामावर होता. ह्याची जन्मभूमि चंदन किल्ल्याजवळील ओझर्डे गांव होतें. हें गांव महंमद आदिलशहानें आपल्या मर्जीतला जो नूरखान त्यास दिलें. तें चंद्रराव मोरे ह्याचें राज्य घेतल्यावर शिवाजीनें चंद्ररावाच्या राज्यांतील गांव म्हणून काबीज केलें. ही खबर दियानतरावास कळतांच त्यानें हें गांव आपलें वतनस्थल आहे म्हणून निळो सोनदेवास पत्रें लिहिलीं. हीं पत्रे १६५६ च्या नोव्हेंबरांत महंमदशहा वारल्यावर लिहिलीं. ह्यावरून चंद्रराव मो-यांचे राज्य शिवाजीनें घेऊन १६५६ च्या नोव्हेंबरांत थोडेच महिने झाले होते असें दिसतें. चवथ्या खंडाच्या प्रस्तावनेंत चंद्रराव मो-यावर शिवाजीनें १६५५ च्या एप्रिलपासून १६५६ च्या मार्चापर्यंत केव्हांतरी स्वारी केली, असें मी लिहिलें आहे. आतां ह्या पत्रांवरून असें नक्की म्हणतां येतें कीं १६५६ च्या मार्चांत शिवाजीनें चंद्ररावाचें राज्य घेतले. १६५५ च्या नोव्हेंबरापर्यंत महाबळेश्वरास सडकून पाऊस असतो व त्या सुमारास तें स्थान मोहीम करण्यास अशक्य असतें. १६५५ च्या नोव्हेंबरानंतर उघाड झाल्यावर शिवाजीनें मो-यावर स्वारी केली व त्याचा सर्व प्रांत १६५६ च्या मार्च एप्रिलपर्यंत काबीज केला. येणेंप्रमाणें ह्या पत्रांवरून शिवाजीच्या एका मोहिमेचा काळ पक्का ठरला.

पत्रांक १५५

श्री
१६९६ माघ शुद्ध ९

सेवेसीं नारो आनंदराव सां नमस्कार विज्ञापना ता छ ८ जिल्हेज मुा नजीक बडोदें यथास्थित असे. विशेष. स्वामीचें आज्ञापत्र छ १४ जिल्कादचें आलें. त्या पत्रीं आज्ञा कीं "तीर्थस्वरूप तिकडे आले. त्यांचे पाठीवर राजश्री हरी बल्लाळ व शिंदे होळकर मातबर फौजेनशीं आले आहेत. त्यांस तुह्मी हरीपंतास लेहून पाठऊन तिकडून फौज आणून भडोच व सुरतेची बंदी करणें, टोपीकरास ताण जरूर देणें. सरकारचा अमल च्यार दिवस न चालल्यास कामास येईल. पुढें सर्व समजोन घेतलें जाईल " ह्मणोन आज्ञा जाहाली. त्यास, श्रीमंत राजश्री दादासाहेब बडोद्यास आले. त्यांचे पाठीवर हरपंत येतांच श्रीमंत महीपार गेले. आह्मी रेवा उतरोन फत्तेसिंगराव गायकवाडसुद्धां हरीपंतांस भेटलों. श्रीमंतांचा तहाचा मजकूर करारांत आलियावर सुरतेस जाऊन आज्ञेप्रों बंदोबस्त, करितों. तूर्त सुरतेचे बंदोबस्तास राजश्री बाळाजी खंडेराव पुरंदरे व बळवंतराव धोंडदेव व शंकराजी लक्ष्मण पुरंदरे पाठविले आहेत. राजश्री बहिरो रघुनाथ व गणेश हरी निा सरसुभा तापीतीरीं सुरतेनजीक आहेत. त्यास बंदीविशीं पत्रें पाठविलीं आहेत. त्यांच्यानें बंदोबस्त होईल तितका करितील, श्रीमंत दादासाहेबाकडिल जाबसालाचा फडशा होय तोंपर्यंत तिकडे जातां येत नाहीं व राजश्री हरीपंतहि निरोप देत नाहींत. लवकरच फडशांत येईल, सलुखावर घातलें असे. मागाहून सविस्तर वर्तमान सेवेसी लेहून पाठऊं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक १५४

श्री
१६९६ माघ, सेवेसीं नारो आपाजी सां नमस्कार विज्ञापना.

मुधोजी भो यांजकडील देवाजीपंतांचे पत्र आलें त्याचा मजकूर समजला. नबाबाचा पोख्त मनसबा खराच ! परंतु प्राप्त काळास ठीक नव्हेसा वाटतो. नवाब गुंतले तरी आपणच गुंतले असें आहे. चहूंकडे चार मनसबे वाढले. हा आणखी एक होतो. तेव्हां खर्चाचा ताण चहूंकडील व फौजेच्या खर्चाचा पेंच; व साष्टीची मसलत, व कर्नाटकांत फौज आणखी गेली पाहिजे; व परंदरीं फौज पाहिजे; पुणियांत पांचशें राऊत पाहिजेत. चहूंकडून खर्चाची मोडणी! वरातांची वगैरे पाहतां फारच आहे. त्याहून आणखी वाढते. याजकरितां मर्जीस आलें तरी देवाजीपंताच्या पत्राच्या नकला करून नबाबाकडेच पाठवाव्या आणि त्यांसच ल्याहावें. आपण पोक्त मनसबा ह्मणतात याप्रों करावयाचा ठीकच आहे. परंतु थोरला मनसबा श्रीमंताकडे. सारी फौज तिकडे गुंतली व आपण हिकडे गुंतले, तेव्हां हैदर नाईकानें फार लबाडी केली. त्याचें पारिपत्य जालें पाहिजे व स्वदेशीं फौज असली पाहिजे. आपणाकडेही फौज आलीच पाहिजे. तूर्त मर्जीस येईल तरी आपण त्यांस आणऊन, मुधोजी भोंसले यांनीं चांद्यासच राहावें, रघोजी भोंसले यांजवळ राहूं नये, रघोजी भोंसले व दर्याबाई यांनीं नागपुरीं राहून तहाप्रों वर्तावें, असें त्यांचे माथां भार ठेऊन केल्यानें प्राप्त काळास ठीक पडलेंसें वाटतें. पुढे कांहीं बदमामली दिसल्यास, फिरोन गोष्ट सांगावयास काय आहे ? करितां येईल. परंतु यासमयीं मसलत न वाढे तो प्रकार राजश्री कृष्णराव यांस लेहून दिला तरी बरासा वाटतो. नबाब तिकडे गेले, त्यापक्षीं त्यांस हेच गोष्टी बोलणें त्याच्या स्वरूपास योग्य. परंतु पुढें मागें पाहतां चहुंकडून शत्रु उठले, नबाब न गुंतेत तरी बरें, मला सुचला मजकूर लिहिला आहे. स्वामी विचार करून करणें तें करतीलच. सेवक लोकीं असलेली गोष्ट विनंति करावी. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना. सलूख करणें तो नवाबाचेच हातें व्हावा. ह्मणजे गुंता पडणार नाहीं. हे विज्ञापना. राजश्री कृष्णराऊ तेथून निघाले आहेत. जवळ आले असिले तरी भेटून त्यांची रवानगी व्हावी. ह्मणजे नवाबास वाईंट न वाटतां कारस्थानानें मनसबा न वाढे आणि भोंसला आपले पदरीं पडे, असें जाल्यास बरेंच आहे. कांहीं नजरहि होईल. पैका नसल्यास नजरेचे ऐवजीं मुलूख देईल. तूर्त बखेडा मोडेल. स्वामीस उचित वाटेल तें करण्यांत येईल. सुचला अर्थ लिा आहे. हे विज्ञापना.