Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १८०
श्री.
१६९९ आश्विन वद्य ९
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव कृष्ण गोसावी यांसीः-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार, सुा समान सबैन मया व अलफ. तुह्मांपासून सरकारांत कर्ज घेतलें मुद्दल मित्या.
रुा
३५०००
मिती मार्गशीर्ष शुा ३ त्रितिया शके १६९७, मन्मथनाम
संवत्सरे, छ १ सवाल, सन सीत सबैन. ऐन मुद्दल बेरीज रुा १०९०॥. मिति चैत्र शुा ३ त्रितिया शके १६९८, दुर्मुख नाम संवत्सरे, छ १ सफर, सन सीत सबैन. व्याजाबा का
३६०९०।-
एकूण छत्तीस हजार पावणेएक्याण्णव रुा सदरहु मित्यांनी घेतले. त्यांसी व्याज दरमाहे दरसदे रुा .१ एकोत्रा शिरस्तेप्रमाणें करार केलें असे. तरी जाहले मुदतीचें व्याज व मुद्दल हिशेब करून दिल्हा जाईल. जाणिजे, छ २५ रमजान, बहुत काय लिहिणें ? लेखनसीमा. बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७९
१६६९ भाद्रपद शुद्ध १४
आज्ञापत्र सेनाधुरंधर विश्वासानिधि राजमान्य राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा, ता मोकदम, मौजे घनवाडी, पा तळेगांव दाहा सहस्रांची, हालीं वस्ती मौजे हिंगणगांव, पा कु-हा, प्रांत व-हाड. सुा समान सबैन मया व अलफहु. मौजे मजकुरीं पळून जाऊन धनोडी मजकुरावर दावादंद कारितोस ह्मणोन हुजूर विदीत जालें. तर, हे गोष्ट कार्या ( स येणार नाहीं ) हल्लीं देखत आज्ञापत्र आपले गांवास उठून येणें. दावादंद न करणें, याजउपर दावादंद केला तरी पारपत्य केलें जाईल. या कामास जासूद पाठविला असे. यासीं मसाला रुा ५ पांच आदा करणें. जाणिजे. छ १३ माहे शाबान. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७८.
श्रीसीताकांत.
१६९९ श्रावण शुद्ध ६.
राजश्री बाबूराव विश्वनाथ गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो मुधोजी भोंसले सेनाधुरंधर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लिहिला मजकूर अवगत जाहला. पूर्वी जाहलेला प्रकार यजमानांनी खासदस्तुरपत्रीं लिहिला आहे, त्याजवरून कळलें असेल. फौजेची समजोती होत आहे. चाळीस पन्नास लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. बाजत बरसात हैदरावरी जाणार. शिंदे व होळकर आपलाले स्थळास निरोप घेऊन छावणीस गेले. पुण्यास येणार. उभयतांचें ऐक्य फार चांगलें जाहलें ह्मणोन लिहिलें. त्यास पूर्वी राजश्री बाळाजीपंत नाना यांचें पत्र स्वदस्तुरें विस्तारयुक्त आलें तें अवलोकमीं सर्व अर्थ इच्छित घडलें हें समजोन जो संतोष जाहला त्याचा अर्थ लिहिणेयांत आलाच आहे. सांप्रतच्या लिहिण्यावरून तरी कोणताही गुंता राहिला नाहीं. मुख्य राजश्री पंतप्रधान दैवशाली आणि राजश्री नाना यांची एकनिष्ठता, त्यांचींच फळें श्रीनीं दिल्हीं- याजउपरी सर्व बंदोबस्त यथास्थित होऊन येतील. वरकड इकडील कित्तेक मजकूर पूर्वीं लिहिले आहेत. सांप्रत राजश्री दिवाकर पुरुषोत्तम यांचे पत्रावरून कळों येतील. रा छ ५ माहे रजब. सविस्तर मारनिलेच्या पत्रावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? हे विनंती, मोर्तबसुद* * t
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७७
१६९९ चैत्र शुद्ध १४
श्री ( अस्सल बरहुा नकल.)
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री हरी बल्लाळ स्वामी गोसावी यांसीः-
पो माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. पा सांगोलें व आलेबले व माचनूर व पुळुंज वगैरे गांव राजश्री विसाजी कृष्ण यांजकडे सरंजामास आहेत. त्यास, तुह्मीं त्यांचे गांवांवर रोखे करूद ऐवज घेतला, व पुढें रोखे होतच आहेत, ह्मणोन हुजूर विदित जालें. ऐशास, यांचे माहालास व गांवास उपसर्ग न करणें. रोखे केले असतील ते मना करवून, ऐवज घेतला असेल तो माघारा देणें, गांवगन्ना राऊत रखवालीस देऊन, त्यांचे महालास व गांवास उपसर्ग होऊं न देणें. जाणिजे. छ १२ रोबल, सुा सबा सबैन मया व अलफ, बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
(लेखांक १३) पत्र अस्सल आहे. ह्या पत्राच्या सहाव्या ओळीत “पाठवणे” ह्या शब्दाच्यापुढें “व आणखी कांहीं नवल अपूर्व वर्तमान असेल तेंहि लेहोनु पाठवणें,” हें वाक्य घालावें.
जगन्नाथपंत व त्रिंबक वेंकटेश हे हुजूरचे कारकून होते. जगन्नाथपंताचें नांव शिवाजीच्या बखरींत एक दोन स्थळीं आलेलें आहे.
हें पत्र दिल्लीस जाण्याच्या अगोदर लिहिलें आहे. शिवापट्टण म्हणजे पुण्याजवळचें शिवापूर. मिर्जा राजा जयसिंग पुरंधराखालीं होता व त्याच्या पश्चिमेस शिवाजी शिवापुरास होता.
पत्राला श्रीकार नाहीं
(लेखांक १८) हें पत्र अस्सल आहे. शिवाजी विठ्ठल दत्तो सुभेदारास “दंडवत” लिहितो, रामराम लिहित नाहीं. सरनोबत=सेनापति. पत्राला श्रीकार नाहीं.
(लेखांक १९) लेख अस्सल आहे. श्रीकार नाहीं. दिवाळ=भिंत. चिंतामणी=गणपति. जी कोट घेण्याचा ह्या पत्रांत तह केला आहे त्याचें नांव दिलें नाहीं. गणपतीचे देवळास व कुणबिणींच्या घरांस भिंती व कोनाडे करून कोट घेऊन द्यावा, असा पत्राचा आशय आहे. परंतु कोटाच्या नांवाचा उल्लेख केला नाहीं.
(लेखांक २०) हें पत्र अस्सल आहे. ह्यावर जिजाबाईचा फारशी शिक्का आहे, तो बहुशः “जिजिआऊ वालिदा इ राजा सीवाजी,” असा असावा.
(लेखांक २१) पत्र अस्सल आहे. दस्तूर निळो सोनदेवाचें आहे. शिक्का अष्टकोनी असून त्यांत कोठेंहि चंद्रसूर्य नाहींत. शिक्क्याच्या ओळीं पांच आहेत व अक्षरें अगदीं स्पष्ट आहेत. जाबिता तह=आज्ञापत्र.
(लेखांक २२) वरीलप्रमाणें.
(लेखांक २३) पत्र अस्सल आहे. कृष्णाजी त्रिमळ, काशी त्रिमळ, विसाजी त्रिमळ व ह्या त्रिवर्गांची मातुःश्री ह्यांच्याजवळ आग्र्याच्यापुढें मथुरेस शिवाजीनें संभाजीस ठेविलें. कृष्णाजी त्रिमळ शिवाजीबरोबर आधीच आला. काशी त्रिमळ व त्याची आई संभाजीला घेऊन आली. आणि विसाजी मथुरेसच राहिला. विश्वासराऊ हा किताब कृष्णाजीपंताला शिवाजीनें दिला असें दिसतें. बखरींत एक लाख होन बक्षीस दिलें म्हणून म्हटलें आहे तें अतिशयोक्त आहें. वर्क सनद बक्षीस रक्षखाना=खजिन्यांतून पैशाचें बक्षीस देण्याची सनद. श्रीकार नाहीं.
(लेखांक २४) लेख अस्सल आहे. मध्यें कित्येक ठिकाणीं फाटला आहे. श्रीकार नाहीं.
(लेखांक २५) लेख अस्सल आहे. फाटला आहे श्रीकार नाहीं.
(लेखांक २६) लेख अस्सल आहे. शिवाजीनें नारळ व सुपारी ह्यांचा मक्ता केलेला होता असें दिसतें. श्रीकार नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७६
श्री.
१६९९
यादी निा दिनकरराव रामचंद्र, सुा सबा सबैन मया व अलफ.!
किल्ले सिहिगड येथील जवाहीर- आमचें पदरीं च्यार गृहस्थ मात-
खान्यापैकीं रुपयाचीं भांडीं काढून वर आहेत. त्यांस, हरएक बाचे, निमि-
लोकांस खर्चास दिल्हीं आणि किल्ला त्य ठेवून उपद्रव न द्यावा. कलम १,
लढविला. कलम १.
तीर्थरूप राजश्री शिवाजीपंत व तोतयास मिळोन कोंकण प्रांतीचे
धोंडोपंत यांची माणसे उभयतांच्या किल्ले सुटले व प्रांत खराब जाहला.
बेड्या काढून, त्यांस व त्यांची माण- त्याचा उपद्रव नसावा. कलम १.
सें आमच्या स्वाधीन करावी. कलम १
आह्मांमुळे आमचे सोयरेघायरे व रत्नागिरी ता ती राजश्री महि.
इष्टमित्र यांस उपसर्ग लागला अ- पतराव कृष्ण यांजकडे होता, तो सर
सेल. तरी निर उपद्रव करावा व कारांत घेतला ते समई चुलने व सौ
वस्तभाव जातीस आली असेल ती मातुश्री व बंधू यांजवर चौकीबसवून
माघारी देवावी. कलम १. घरची वस्तभाव जप्त केली. ती.माघारी
देवावी. कलम १.
खासगत घोडी व वस्तभाव सुद्धां रत्नागिरी तालुक्याचा ऐवज तो
आबरू संरक्षण करावी. कलम १. तयास खर्च जाहला तो हिबामुळें
वाजबी निघेल तो मुजरा घ्यावा,
कलम १.
किल्यावर सोनारापासून टंकसाळ ती राजश्री परशरामपंत, आमचे
घातली, व शिक्का नवा कोरविला, बंधु, यांची स्त्री कोंकणप्रांत आहे.
आणि रुा पाडविले. त्याचा जाबसाल ती आह्मांजवळ आणवावी. कलम १
आह्मांकडे व सोनाराकडे माफ करावा,
कलम १.
ती चुलते व सौ मातुश्री व पुण्यातील वाड्यांतील वस्तभाव
बंधू व मुलेंमाणसें यांजवर चौकी आहे जप्तींत आली असेल, ती माघारी दे
ती उठवावी. कलम १. वाबी. कलम १.
आमचे जेष्ठ बंधू कर्नाटकप्रांती आह्मां सर्वांस शिवाजीपंत सुद्धा
आहेत. त्यांजकडे स्वार आणावयासी प्रायश्चित देऊन शुद्ध करावें. कलम १,
गेले ह्मणोन ऐकिलें, त्यांस मनाई करावी.
कलम १.
तीर्थस्वरूप राजश्री महिपतराव आपले तीर्थरूपांचे मी ती
कृष्ण व तीर्थरूप मशारनिलेचे चाकर राजश्री महिपतराव कृष्ण सर्व कार-
या उभयतांस मालेमालतीस कोंकण- भार व मामलती व उदम ती चें
च्या बखेड्यामुळे उपद्रव जाहाला नांवें चालत होता. त्यास हली कोंक
असेल, त्यास दूर होऊन नवीन उप- णपट्टीच्या बखेड्यामुळे सर्व सोडून,
दूव न होय ते करावें. कलम १, महिपतराव यांचेस्वाधीन करून, त्यांचे
त्यांजकडे चालवावें. कलम १
कसबें पांवस येथील वाड्यांत का पांवस येथे ती रा महि-
वस्तवानी व नख्ती ऐवज जो सर- पतराव कृष्ण यांच्या वाड्यास व
बा-कारांतून जप्त जाहला आहे, तो आ- गास वगैरे कांहीं उपसर्ग लागला
मचा आमचे स्वाधीन करावा. असलियास मोकळी करवावी. कलम१
कलम १.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७५
श्री.
(नकल) सिका
१६ १९८/९९
यादी विसाजी कृष्ण यास जातीस तैनात व पुत्रास पालखीची तैनात व विठल कृष्ण बंधु यास जातीस तैनात व फौजेस सरंजामास माहाल वगैरे आहते.
सुा सबा सबैन मया व अलफ.
खाशाच्या तैनाता देखील पालखी व खेरीज तैनात गांव जमिनीसुद्धा.
३५१६० तैनाता ।
३०६१० खुद तैनात.
१००१० बरहुकूम पेशजी.
२०००० जाजती हिंदुस्थानचे स्वारीस जाते
समयीं.
------
३००१०
६०० कापड आंख १५०
-----
३०६१०
१२६० महिपतराव विश्वनाथ जातीची तैनात नाहीं. पालखी व अबदागिन्याची तैनात.
३२९० विठल कृष्ण बंधू यांस तैनात पालखी दिवंट्या आबदागिन्यासुद्धां.
---------
३५१६०
१०७८ खेरीज तैनात गांव व जमीन
१००० मौजे नन्हे ता कर्यात मावळ.
८८४. ऐन
११५. जाजती.
-------
१०००
६० मौजे भिवू ता करेपठार जमीन चाहूर.
१८ मौजे घोरपडी तो हावेली प्रांत पुणे जमीन रुके ०४
-----
१०७८
----
३६२३८
फौजेस सरंजामास वगैरे गांव महाल आहेत
६६०५८ पों सांगोले देहे मिळोन २८
रुपये ६६०५८।३
तपसील
२४६४३०॥ सरंजामाकडे
४१४१५८॥ दुमाले
---------
६६०५८
१३४४३॥ पो ब्रह्मपुरी उर्फ माचनुर देहे ७ सात
गांवची तनखा रुपये
फुटगांव आकार रुपये
३६६८९।। ता कडे राजणगांव पा देहे १७
तनखा रुपये
१२५१४|| कसबे बेलगांव वगैरे गांव
होण नाणे ६२५७। यासी
दर होनास रुपये २
प्रमाणे १२५१४॥ रुपये
३६१९॥ मौजे देऊळगांव सिंदी देहे १
आकार तनखा रुपये
१९९१॥मौजे पारगांव ता पांडे पेडगांव रुपये
३८०९८॥
कित्ता फुटगांव
३८०९८॥:
१००० मौजे कौटं, मागील्यांत
कसूर प्रांत हुकेरी
४९५६८: मौजे सुस्ते व शकर
गांव पा काठी
९९२५ मौजे पुळंज पैकी माहाल
२३४६७।। दिगर जहागीर राक्षसभुवन वगैरे
देहे २३
तनखा
२१३७९॥l. ऐन
२०८८ सरदेशमुखी
-------
२३४६७।।
ता. १
२५० निरगुडी निसबते
मौरो गिरमाजी
१२१८ मानापुर नि।
छपा गोसावी
---------
२४६८
सरंजामांत
२०९९९।। ३९३४८॥
पौ वजा निरगुडी कसबा विसील
आलाहिदा लिहून रुपये १२५०
बाकी रुपये ३८०९८॥
९७९७= पो पारनेर पैकी
देहे तनखा रुपये
१०२२६॥
प्रांत जुन्नर पो गांव
चा तेनरवा रुपये
४२॥ प्रोः कालेवाडी
६३०-|- प्रो रणेवाडी ता कर्ड
३१४७ ता बेल्हे पो देहे ५
१०९६। ता चाकण देहे ३
२८३२०= ता गाजी भोइरे देहे ४ २४७८
पो पारगांव ता आले
१०२२६।। १२४५२९॥ ॥ पो आलमले देहे ७५
या तनखा रुपये ११४३१५८॥ ऐन १०२१४॥ दुमाले
१२४५२९॥॥ ४०६३६॥
पो पातशापूर १२५५८०। पो मजकूर देहे ४५
७११ कर्यात नससरी देहे २
१३२६९८॥ दर होनास ३८ प्रमाणे रुपये ४०६३६॥
१००० मौजे नन्हे ताा कर्यात मावळ तनखा रुपये
३५८५०७॥ll.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८८
१५४३ चैत्र शुध्द १४
थोरले राजे
(फारसी सिक्का)
अज रखतखाने राजश्री संभाजी राजे साहेबु दामदौलतहू बजानेबु कारकुनानी देहाये परगणे पांडियापेडगौ सु॥ इहिदे इसरीन अलफ बो। रामेस्वरभट बिन नारायणभट व चितामणीभट बिन बाळाभट उपाध्ये रा। इ॥ यासी मुकासा मौजे जातेगौ पा। मजकूर देह एक १ बिता।
पेसजी रवा आहे बाजा वर्दे रुद्राजी फुज
देह निमे .॥. सरगुर्हे देह निमे .॥.
एकूनु सदर्हू देह १ कुलबाब कुलकानू दिधले असे व बा। खुर्दखत राजश्री राजे दिधले आहे तेणेप्रमाणे दुमाला कीजे अवलाद अफलाद चालवीत जाइजे दर हर साल ताजे खुर्दखताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेली भटगोसावियापासी फिराउनु दीजे
*
तेरीख १२ माहे जमादिलोवल
जमादिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
(लेखांक ९) हें पत्र अस्सल आहे. अक्षर पहिल्या लेखांकातल्यासारखें जाडे घोसदार आहे. निळो सोनदेउ व रखमाजी शिवदेऊ शिवाजीला साहेब ह्या शब्दानें संबोधतात. त्याअर्थी व इतर पत्रांत हाच शब्द योजिला असल्यानें, शिवाजीचे कारभारी शिवाजीस साहेब या संज्ञेनें संबोधीत असत हें उघड आहे. साहेब म्हणजे His Majesty.
ह्या लेखांकाची तारीख ठरविणें बरेंच घोटाळ्याचें आहे. ह्यासंबंधीं विस्तारानें विवेचन मुख्य प्रस्तावनेंत करावयाचें आहे. हें पत्र खबरनविसाच्या दफ्तरांतील आहे.
(लेखांक १०) हें पत्र अस्सल आहे. हें पत्र सरंजामी म्हणजे ज्याला सध्यां रेव्हेन्यू म्हणतात त्या दफ्तरांतील आहे. अफजलखान व फाजलखान ह्यांना पराजित केल्याच्या सुमारास शिवाजीनें नवे कारभारी केले. त्याच वेळीं निळो सोनदेवास मजमूदार नेमिले.
१६६० च्या नोव्हेंबराच्या पूर्वी मोरोपंत पेशवे त्रिंबक व शिवनेर हे औरंगझेबाचे किल्ले घेण्यात गुंतला होता. तसेंच, ह्या सुमारास सुरगिरी म्हणजे देवगिरी म्हणजे दौलताबाद म्हणजे औरंगाबाद घेण्याचा शिवाजीचा विचार होता.
हें पत्र बावडेकरांच्या दफ्तरांतील अत्यंत महत्त्चाचें आहे. निळो सोनदेव यास मजमूदार नेमिल्याचा हा तह म्हणजे निश्चयलेख आहे. डफ आपल्या इतिहासाच्या सातव्या भागांत अबाजी सोनदेव यास मजमू दिली म्हणून म्हणतो परंतु तें ह्या पत्रावरून निराधार आहे असे दिसतें.
(लेखांक ११) हें पत्र अस्सल आहे. ह्यात अफजलखान अशीं अक्षरें स्पष्ट आहेत. अबदुल, अबदला वगैरे अफजलखानाचीं नावें बखरींतून व पवाड्यांतून आढळतात तीं अपभ्रष्ट आहेत.
हिंदु व मुसुलमान ह्यांचीं इनामें जशीचीं तशी चालवावीं असें ह्या पत्रांत म्हटलें आहे. ह्यावरून जिंकलेल्या प्रांतांतील हिंदूंच्याप्रमाणेच मुसुलमानांचीं इनामें शिवाजी चालवी असें दिसतें.
हें पत्र सरंजामीपैकीं आहे. ह्यावर श्रीकार नाहीं.
(लेखांक १२) हें पत्र अस्सल आहे. मंसरुंल हजरती=मशहूर अलहजरत्. मशर=प्रसिद्ध, मान्य अल्=चा. हजरत्=राजा, स्वामी, साहेब, मशहुरल हजरत = राजमान्य. येणेंप्रमाणें ह्या पत्रांत राजमान्य हा अर्थ एकदां मराठींत व एकदां फारशींत असा दोनदां व्यक्त झाला आहे. मराठींतील राजमान्य राजश्रीप्रमाणें मशहुरल हजरत् हा फारशीतील मायना आहे. तो तीन साडेतीनशें वर्षे प्रचारांत असल्यामुळें, मराठी राजमान्य हीं अक्षरें घालून शिवाय तोहि घालीत असत. ह्या शब्दांचा अर्थ प्रायः सर्व लोकांना कळत नसे. शब्द योजण्याचा मात्र सर्वत्र परिपाठ होता.
१६६३ च्या एप्रिलांत शाहिस्तेखान चाकण घेऊन पुण्यास येऊन राहिला होता. पुण्यास आल्यावर शाहिस्तेखानाने सिंहगडास फितूर केला. ही बातमी शिवाजीस कळतांच, त्यानें मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार ह्यांस राजगडाहून सिंहगडास जाण्यास हुकूम केला व बरोबर तान्होजी मालुस-यास नेण्यास सांगितलें. नंतर थोडक्याच दिवसांत शिवाजीनें शाहिस्तेखानावर पुण्यांत छापा घातला. शाहिस्तेखान पुण्यांत येण्याच्या पूर्वी शिवाजी कोंकणांत नामदारखानावर जाणार होता. परंतु सिंहगडीं फितवा झाल्यामुळें तो बेत तकूब करावा लागला.
ह्या पत्राला जी टीप दिलेली आहे, ती बावडेकरांच्या एका जुन्या पिढीजाद कारकुनानें मूळ पत्राच्या पाठीवर लिहिली आहे. तींत ह्या पत्राचें अक्षर निळोपंताचे असावें असें म्हटलें आहे. परंतु, निळोपंताला शिवाजीनें पाठविलेलें पत्र निळोपंताच्या हातचें कसें असू शकेल? निळोपंताच्या वळणावर दुसरें कोणाचें अक्षर असेल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
(लेखांक ३, ४, ५, ६, ७, १४, १५, १६, १७, ५४, ५५, ५६, ५७, ७७, ७८, ७९, ८०). शहाजी, शिवाजी व शाहू ह्यांस पाठविलेलीं हीं पत्रे अस्सल नाहींत; नक्कल आहेत व मूळ नसून भाषांतर आहेत. हीं भाषांतरें शिवाजीच्या वेळेस केलेलीं नसून, अलीकडे कोणी तरी केलेलीं आहेत हें ह्या पत्रांच्या भाषेवरून स्पष्टच होतें. शिवाय मूळ फारशीचीं ही बराबर भाषांतरें आहेत असेंहि नाहीं, मुसुलमानधर्मरक्षक हें विशेषण भाषांतरकारानें शिवाजी व शाहू यांस दिलें आहे. परंतु तें वस्तुतः दिल्लीच्या पातशाहाचें विशेषण आहे. भाषांतरकारांस ही गोष्ट समजली नव्हती, कारण हा भाषांतरकार प्रायः इसवीच्या एकोणिसाव्या शतकांतला असून, तो विशेष चिकित्सक नव्हता. ह्या सर्व पत्रांत दिलेल्या जुलुसी सनांवर व तारखांवर माझा यत्किंचितहि भरंवसा नाहीं. तेव्हां ह्या पत्रांसंबंधानें येथें जास्त कांही लिहीत नाहीं. मूळ फारशी पत्रे साता-यास आहेत म्हणून कळतें तीं उपलब्ध झाल्यावर त्यांच्यासंबंधीं जें बोलावयाचें तें बोलावें हें इष्ट आहे.
(लेखांक ८) हें पत्र अस्सल आहे व हें १६६८ नंतर लिहिले आहे कारण, सुरतेस फ्रेंच लोकांनीं आपली पहिली वखार १६६८ त स्थापिली. शिवाजीने १६७० त सुरतेवर स्वारी केल्यानंतर म्हणजे १६७० च्या आक्टोबरानंतर १५ रबिलाबलीं म्हणजे १६७१ च्या जुलईत हें पत्र लिहिलें आहे. मुशे डुरो म्हणजे Monsieur Duroc ह्यावेळीं सुरतेच्या फ्रेंच वखारीचा मुख्य एजंट होता. ह्या पत्रावरून असें दिसतें कीं, त्या वेळचे फ्रेंच व्यापारी शिवाजीशीं सलोख्यानें वागत. ह्याच कारणास्तव सुरतेच्या स्वारींत शिवाजीनें फ्रेंच लोकांना स्नेहानें वागविलें व फ्रेंचांनींहि शिवाजीच्या लोकांशी स्नेहाचें वर्तन केलें. फ्रेंच लोकानीं शिवाजीच्या लोकांशीं उद्धपणा केला नाहीं. ह्याबद्दल ग्रांट डफ फ्रेंचांना दोष देतो. “The French purchased an ignominious neutrality by permitting Sivajee’s troops to pass through their factory. (duff Chap. VIII). शिवाजीचा फ्रेंच लोकांना आश्रय होता म्हणून फ्रेंचांनीं शिवाजीच्या बाजारबुणग्यांशी व सैनिकांशीं तक्रार केली नाहीं, ही गोष्ट डफला माहीत नव्हती. शिवाय, हिंदुस्थानासारख्या परराष्ट्रांत येऊन फ्रेंचानी मराठ्यांशीं भाडलें पाहिजे होतें, असा जो डफनें ध्वनि काढला आहे, त्याला कोणत्याहि नीतीचा आधार डफनें दिला नाहीं. एकंदरींत न्याय आणि नीति ह्यांना सोडून डफने हें विधान केलें आहे, हें उघड आहे. डफनें मराठ्यांचा इतिहास निःपक्षपातानें लिहिला आहे, असें समजणा-यांनीं ह्या विधानाचा विचार करावा.
फ्रेंच कंपनीचीं ह्यावेळचीं दफ्तर मराठ्यांच्या इतिहासाला कांहींशी उपयोगी पडतील. पारिसांत मराठ्यांच्या संबंधींचे कागदपत्र आहेत असें कळतें.
ह्या लेखांत, (१) अज् जाबती कपीतानें फ्रांशेश्, (२) मुक्काम पेठ रायबाग, (३) बंदर (ई) राजपूरी व (४) बंदर (ई) सुरतेसी, हे शब्दप्रयोग (१) फ्रेंच कप्तानाच्या अधिकाराखालीं असणारा कलाल, (२) रायबागच्या पेठेंत राहाणारा, (३) राजापूरच्या बंदरांत, व (४) सुरतेच्या बंदरास ह्यांबद्दल योजिले आहेत. तसेंच, सराफराजनामा व वर्तणूक हीं नामें नपूंसकलिंगी योजिली आहेत. साहेब वैभव लेहावया आज्ञा केली पाहिजे हें फारशीचें हुबेहुब भाषांतर आहे व साहेब हा प्रथमांत कर्ता फारशीतल्याप्रमाणेंच योजिला आहे. (१) शीरदीदे ठेवणें, (२) सराफराज होणें, (३) रवाना करणें, (४) आरीफ असणें, हे प्रयोगहि फारशी आहेत. सातव्या पृष्ठाच्या पहिल्या ओळींतील पहिलें हा शब्द पूर्वी ह्याअर्थी अव्वल ह्या फारशी शब्दाबद्दल घातला आहे.
पहिल्या व दुस-या लेखांचे मोडी अक्षर जाड ढोबळ आहे. फारशी दफ्तरांत मराठी मोडी अक्षर असेंच ढोबळ लिहीत. ह्या आठव्या लेखांकाचें मोडी, कानडी लोक मराठी मोडी लिहीत त्या प्रकारचें आहे. हें मोडी ढोबळ नसून वेलांट्यांच्या फरफाट्या ह्यांत अतोनात आहेत. ह्या पत्रांत म्हणोनु, होउनु, वगैरे शब्द आहेत. ह्या पत्रावर रूपेरी बेगडीचे ठिपके आहेत. ह्या पत्रांतील सालीं सोमनाथपंत डबीर ह्याचा मुलगा निळो सोमनाथ डबीरीवर होता असें दिसतें.