पत्रांक ३२४
श्रीगुरुसमर्थ १७५५ श्रावण वद्य ९
पा। छ २७ रबिलावल,
सन अर्बा सलासीन.
श्रीमंत राजश्री नाना साहेब साहेबांचे सेवेसीः-
आज्ञाधारक रमाबाई देसाई नाडगौडा पा। गोकाक दंडवत विनंती विज्ञापना ता। छ २३ माहे रबिलावल पावेतों स्वामीचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. हणमंता काळे याजबरोबर आज्ञापत्र पाठविलें तें पावलें. धर्महाटीकर यांचे फैसल व्हावें लागतें, व दत्तक प्रकरणीं बोलोन ठरला पाहिजे, त्याजकरितां चिंचणीस येणेंविषयी आज्ञा, त्यास, एविशीं पेशजी राजश्री उडपी रामचंद्र याजबरोबर विनंतिपत्र देऊन पाठविलें होतें. मसारनिल्हेनें आपणास विनंति केलेच आहे. मी समक्ष येऊन, विनंति करावी, असें काय आहे ? मशारनिल्हे जे विनंति करतील तें माझें आहे. तत्राप चरणसांनिध येण्यास आलश नाहीं. परंतु, तूर्त शरीरीं नीट नाहीं. थंडीवा-याने प्रकृत बिघडेल. त्यास उडपीराव रामचंद्र यास इकडील मजकूर सांगून, विनंतिपत्र देऊन, पाठवितों. चरणास विनंति करतील. मनन करून आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करीन. इकडील जाबसालाविशीं मी याव असा भाव नाहीं. चेरणदर्शनाची इच्छा आहे. फुरसोतिन येईन. सारावश, आज्ञा बाहीर मी नाहीं. पाऊस गेल्यामुळे बखेडा माझी फार आहे. सर्वप्रकारें सांभाळ करणार स्वामी समर्थ आहां. मी विशेष लिहिणेस शेक्त नाहीं. ममदापूर कामयाविशीं आलाहिदा विनंतीपत्र लिहिलें आहे, त्याजवरून निवेदन होईल. मशारनिल्हे स्वामीकडे येऊन विनंति करितील, ते मनन होऊन जे आज्ञा होणें ते व्हावी. तूर्त कामती वगैरेस हरएक विशीं उपद्रव होऊं नये, या प्रमाणें हुजरेयांस ताकीदपत्र देणेंविसीं आज्ञा व्हावी. * सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.