पत्रांक ३३१
श्रीगजानन. १७११ पौष वद्य ९
रु
श्रीमंत राजश्री नानासाहेब स्वामीचे सेवेसीः----
विनंति सेवक विश्वासराव आपाजी कृतानेक सा। नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान छ २२ माहे रबिलाखर मु।। गारदौंड स्वामीचे कृपेंकरून येथास्थित असे. विशेष. मिर्जामुजफर बक्त शहाजादे छ १९ तारखेस प्रातःकाळीं स्वारी बागांत येथून आदकोसावर गेली होती. फिरून प्रहूर दिवसांत होवलीदाखल जाले. यानंतरीं हिंदुस्थानांतून यांचीं पत्रें आखबार छ १९ तारखेस रात्रौ आलीं. त्यांत मा।रः राजश्री पाटीलबाबा रामघाटास सूर्यग्रहणास गेले आहेत. तेथें कार्तिकस्नान करून श्रीमथुरेस आले. वजिराकडून टिकावस्त्रें आली आहेत. बिलकारसाहेब वकील यांचे मार्फतीनें गुजरावलीं. येकवीस पाचें होते व तीन किस्ती जवाहीर, येक हात्ती, दोन घोडे याप्रमाणें आले. त्यांचे कडील भला माणूस आला होता. त्यास तीन खोन वस्त्रे व येक रकम दिली व वरकड जैपूरवाल्याकडील वकील रा। सुभेदार यांचे लस्करांत येऊन बसले आहेत सुभेदारांनी पाटील बावास + + + + + + + राजेमार यांचा कांहीं तह ठरावा. त्यास हे मसलत काहीं ध्यानास आणूं नये. मिर्जा इसमायलबेग याणें फितूर करून जैपुराकडे संधान लाविलें. आपलीं कुटुंबें गडास होतीं तीं काढून आपले लष्करांत नेलीं. जेपुरास रवाना करणार. जेपूरवाले राज्यांनी लाख रु।। खर्चास पा।ले आहेत. दिल्लींत आवई गेली आहे कीं, इसमालबेग फौजसुद्धां येणार. ह्मणून पातशहानीं शहरचा बंदोबस्त मांडिला आहे. दरवाजे दरोबस्त बंद करून तीन दरवाजे मात्र खुले ठेविले आहेत. रो। पाटील बावास शुका पार होता कीं इसब बेगचा इरादा दिलीस यावयाचा आहे. त्यावरून पाटीलबावांनी खातरजमा करून लेहून पों।. वरकड खर्चावेंचाचीं तंगचाई बहुत आहे. सलातनि यास उपोषणें गुजरतात. येक शहाजादा कनसल होता तो निघोन गेला. यास्तव पातशहानीं पाटील बावास लिं। होतें कीं, सलातीन उपासी मरतात. त्यास यांचा भक्षावयाचा बंदोबस्त करावा, अथवा यास आनात करून द्यावें. त्यावरून शाहनीजामुदीन यास लि। कीं, माहालांत ताकीद करून बंदोबस्त करावा. जाबेखान गुलामकादराचा भाऊ याणें साहरणपूर प्रांतीं राहिले व सिख जमाव करून रो।. बालोजी इंगळे यांची लढाई रुबकार आहे. याप्रमाणें आढळलेलें वर्तमान तें सेवकानें लिहिलें आहे. सेवेसी श्रुत व्हावें. पत्रोत्तरी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहणें ? लोभ केला पाहिजे.