पत्रांक ३२६
श्री. १७६९ कार्तिक वद्य ३.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामचंद्र दिक्षित ठकार स्वामी गोसावी यांसी.
शेवक परशराम श्रीनिवास प्रतिनिधी नमस्कार विनंति उपरी. श्रीमंत क्षेत्रियकुलावतंस श्रीमन्माहाराज राजश्री छत्रपति स्वामी याणीं चिरंजीव राजश्री श्रीनिवासराव याचे विवाहाचा निश्चय मार्गसीर्ष शु।। ९ गुरुवारी योजिला आहे. शरीरसंबंध राजश्री आंताजी नारायेण मुतालीक यांची कन्या वधू योजिली आहे. तरी तुम्ही सहकुटुंब सहपरिवारें लग्नसरंभास यावें. रा। छ १६ जिल्हेज, सु।। समान अर्बैन मयातैन व अलफ. बहुत काय लिहिणे, १ हे विनंति.