पत्रांक ३२५
श्री. (नकल) १७५९ आषाढ शुद्ध ९
हरीभक्तपरायण राजश्री विष्णुबावा संस्थान धावडशी यांसी:-
प्रति प्रतापसिंहराजे दंडवत उपरी. तुम्ही हुजूर विदित केलें कीं, संस्थानचे खर्चाकडे गांव व जमीन वगैरे आहे. त्याची वेवस्था आह्मी व आमचे भाऊबंद मिळोनं करीत होतों. दरम्यान आमचे भाऊबंद यांणीं कामांत बखेडा केल्यामुळें गैरव्यवस्था जाली. तेव्हां संस्थानचे जमाखर्चाचे वेवस्था नीट ठेवण्याकरितां हुजरून गोविंद माहादेव कारकून व व्यंकाजी भोंसले यांस पाठऊन, त्यांस माहितगारी करून देऊन, त्यांचे विद्यमानें वहिवाट करित जाणें. येविशीं आमचे व वासुदेव बाबूराव तांबे फडणीस संस्थान मजकूर यांचे नांवें सनतिस्सा अशरीनांत पत्र आलें. नंतर त्या सालीं गोविंद माहादेव कारकून हुजुर नेले. भोंसला राहून देवस्थान चौकशीकडून मुनीम राजश्री विष्णु माहदेव माहजनी वहिवाट, करित आहेत. त्यास हल्लीं आमचे भाऊबंद यांणीं पेशजींप्रमाणें संस्थानीं वागावें, गांवकामांत बखेडा करूं नये, असा बंदोबस्त करून घेतला आहे. या उपरी संस्थानचे जमाखर्च गैरवेवस्था होणार नाहीं. याकरितां स्वामींनीं कृपा करून पूर्ववतप्रमाणें संस्थान वहिवाट आम्हांकडे कायम करून, हुजरून भोंसला आहे त्यास आणून देवस्थानाकडील देखरेख होत आहे ती मना करण्याविशी आज्ञा जालीं पाहिजे. म्हणेन. त्याजवरून, संस्थान मा।रचे वहिवाटींत भाऊबंद बखेडा करीत नाहींत, हें आह्मी मिळोने एकविचारें पूर्ववतप्रमाणें व्यवस्था नीट राहून वहिवाट तुम्हांकडे कायम करून, लिहिलें आहे. तरी संस्थानाकडे इनामी गांव व जमीन वगैरे उत्पन्न परइलाख्यांतीलसुद्धां चालत आहे. त्याचा जमाखर्चाची वेवस्था दुरुस्त राखीत जावी. जाणिजे. छ ८ रबिलाखर, सु।। समान सलासीन मयातैन व अल्लफ. तारीख १२ जुलै सन १८३७ इसवी मोर्तब आहे.