लेखांक १५ १५८६ चैत्र शुध्द ७
सके १५८६ क्रोधी संवछरे चइत्र सुध सप्तमी बुधवार तदिनी खतलिखिते धनको नाम एसाजीपत आत्रे रिणको नाम गोपाल बाबाजी लेहोन दिधले ऐसे जे आत्मसुखे प्रवर्तसमधे घेतले रु॥ २०२ दोनी से वीस यासि कलांतर दर माहे सदे रु॥ १० पहिला महिना देउनु पुढिला महिनियात पैके राहिले तर दर सदे रु॥ ५ प्रमाणे देउनु हे लिहिले सही सदरहू दोनी से रु॥ देउनु हे लि॥ सही हे पैके रा। नरसिंहपंतापासून घेउनू दिधले हे पैके आपण देउनु हे लि॥ सही बिकलम
गोही
उधोजी झांबिरे रामाजी बाबाजी
मोकदम क॥ पुणे कुलकर्णी क॥ सुपे