पत्रांक ४०५
श्री. १७१८ ज्येष्ठ-कार्तिक
मा। अनाम देशमुख व देशपांडे पो। लोणार यांसी:--
चिमणाजी माधवराव प्रधान. सु।। सबा तीसैन मया व अलफ, परगणें मजकूर येथील निमे मोकासा व तिजाई खारकुंडा श्रीहणमंतराव दरेकर सरलष्कर याजकडे फौजेचे बेगमीस सरंजाम पेशजीपासून आहे त्याप्रमाणें करार असे. तरी, सालमजकुरापासून रा। नारायणराव विश्वनाथ दिवाण व फडणीस नि।। सरलष्कर यांजकडील कमावसदारांसी रुजू होऊन परगणें मजकूरचा निमे मोकासा व तिजाई खारकुंडाचा अंमल सुदामत प्रों सुरळीत देणें. सरलष्कर यांजकडे न देणें.