पत्रांक ४२९
श्री १७१८ पौष वद्य ३०
यादी रघुनाथपंत आसरवाले यांस पत्र जेः--पायागडचे पोतनीसाच्या आसामीचे वेतनाविसी बलवंतराव महादेव यास तगादा करितां ह्मणोन हुजूर विदित जाहलें. त्यास, तेथील वेवाट रघुनाथ रागचंद्र यांच्या हातें होत आली आहे. ते येथें येणार आहेत. ते आल्यावर फडशा करून देतील. आसामीच्या ऐवजाविसीं बलवंतराव महादेव यास तगादा न करावा. ह्मणोन पत्र १
सदर्हूअन्वयें ताकीद द्यावी. छ २८ रजब, सबा तीसैन.