पत्रांक ४३०
॥ श्री ॥ १७१८ माघ शुद्ध २
यादी विनंति बहुलचंद जाट जोतिसी वास्तव्य पो राजकड याची. पोंमजकुरीं आमचें वर्षासन रु।। ९० नवद आहे. येविसीची सनदहि आह्माजवळ आहे. त्याप्रमाणें वर्षासन आह्मी आपलें पावीत अस्तो. आतां सालगुदस्तां रा। प्रतापसिंग याणीं एक साला रु।। नवद दिल्हे नाहींत. म्हणून ताकिदपत्र दिल्हे पाहिजे कीं, भटजी मजकूर याचे वर्षासनाचे रु।। पूर्वपासोन चालत आले आहेत त्याप्रा हाली सालगुदस्ताचे राहिले ते भटजी मजकूर याचे यास देणें. फिरोन येविसीचा बोभाट येऊं न देणें. म्हणून पत्र.
सदरहू विप्राकडे पैके द्यावे. छ १ साबान, सबा तिसैन.