पत्रांक ४५२
श्री १७१८
विज्ञापना. इकडील वृत्त. बाहादरजीची स्वारी घाटीवर पर्णेयाहून साताकोसांवर येऊन दाखल जाली, तों घाटीखालीं झाडून रांगडे जमा होऊन पाचसात हजार पायेदळ व स्वार च्यारसे-पाचसे याप्रों जमाव करून, जमलपूरचें ठाणें उठऊन दिल्हें. ऐसी सर्व जागां सुदीखाली रांगड्यांनीं कोटी केली. याजकरितां त्याचे तोंडावर व पारपत्याकरितां राजश्री मिर्जा-गनी-बेग याजला पाठविले आहेत. परंतु त्याचा भरणा बंदुकेचा बहुत आहे. दुसरें या जिल्ह्यांत जागा आहेत. परंतु त्याचा भरणा बंदुकेचा बहुत आहे. दुसरें या जिल्ह्यांत जागा आहेत त्या सर्व भयभीत नाईक मृत्यपावल्यापासून जाले आहेत. बिथरियेवाले व भगले व बुंदले या त्रिवर्गाचें पारपत्य चांगले जाल्या खेरीज जरब बसावयाची नाहीं. फौजेंतहि गवगवा बहूत आहे. कोणी कोणाचे येकविचारांत नाहींत. ऐसा प्रकार येऊन बाजसाला काल्पीकराकडील उभयताकडूनहि येकाचीहि पागापथक येऊन पावलें नाहीं. याणीं त्यास हि लेहून पाठविलें आहे कीं, आपले सरजामानिसी येऊन दाखल होणें, अपणाकडील ऐवज काल्पीकराकडे येणें. त्याविसीं याणीं निक्षूण ताकीद काल्पीकरास लेहून पाठविली कीं, आजवर वरातीचा ऐवज पटला नाहीं, याचें कारण काये, त्यास हालीं पत्र पावतांच ऐवजाची तोडजोड लाऊन द्यावी. त्याजवरून कांहीं तोडजोड लाऊन देणार आहेत. याप्रमाणें येथे लिहिलें आलें. भोसले याजकडील येणें वकील राजश्री केशवराव आले होते, याजकडील हि तिकडे कारकून गेला होता. दोन तीन दिवस त्या वकीलास ठेऊन घेतले होतें. सिष्टाचारीकरीतां आले होते. दोन दिवस राहून घेऊन, दोन वस्त्रें जातेसमई त्यांस दिलींत. तो आपले ठिकाणीं उदास होऊन गेलेत मेहरची जागा मातबर. तेथें रांगडयांनी येऊन मोर्चे लाविले. त्यांचे बंदोबस्ताकरितां कांहीं पागे पथकें नेमलींत. परंतु लवकर जाऊन पावत नाहींत. येथून त्याचीं ठाणीं दाहाबारा कोसांवर आहेत, तीं अद्याप उठून जात नाहींत. रांगड्याची चांगली येकवेळ पारपत्यें जाल्याखेरीज जरब बसणार नाही. निंबाळकराकडील कारभार येथे आह्मापासीं नित्य येतात कीं, आमचा बंदोबस्त तेथे नाईक साहेबाचे पुत्र आहेत. आपले विद्यमानें येखादा जाबसाल होऊन हिकडे त्याची येणी जाले ह्मणजे भरवसा चांगला त्यास येईल. शेवेसी श्रुत होये. हे विज्ञाप्ति.