पत्रांक ४५७
श्री. १७१८
यादी संस्थान मंडले व किल्ले चौ-यागड राजेश्री रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांजकडे द्यावयाचा अलाहिदा करार आहे. त्याविसीं सनदी व पत्रें, सु। सबा तिसैन मया व अल्लफ.
१ बाळाजी गोविंद यांस सनद कीं:-
१ राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा याजकडे संस्थान मंडले पो अठ्ठेचाळीस हजार तीनसें रु।। याचा सरंजाम सरकारांत ठेऊन बाकी द्यावयाचा करार. त्याप्रों। हालीं सरकारांतून कारकून पाठविले आहेत. यांचे स्वाधीन अठ्ठेचाळीस हजार तीनशाचा माहाल करून, बाकी संस्थान ठाणें जातसुद्धां सेनासाहेबसुभा यांजकडील अंमलदार येतील त्याचे हवाला करून कबज घेणें, ह्मणोन.
१ किल्ले चौरागड सरंजाम सुद्धां सेनासाहेब सुभा यांजकडे द्यावा. हवाली करून हे सनद सादर केली असे. सेनासाहेबसुभा यांजकडील अंमलदार येतील त्याचे हवाले करोन कबज घेणें ह्मणोन.
------
२
२ सदरहू अन्वयें शिरस्ते प्रों जमीनदारांस पत्रें.
१ संस्थान मंडले.
१ किले चौरागड.
-----
२
----
४
सदरहू प्रों दोन सनदा व दोन पत्रे शिरस्ते प्रों.