पत्रांक ४५४
श्री. १७१८
राजश्रिया विराजित राजमान्य राजेश्री भगवंत रावजी स्वामीचे सेवेसीः-
पो अमृतराव रघुनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावे. विशेष. राजश्री काकानीं आपल्याकडून ऐवज देविला. त्याजकरिता स्वार मुजरद पाठविला. च्यार दिवस जाले. अद्याप ऐवज आला नाही. तूर्त दोन हजार रुपये देविले आहेत. तरी, हाली विळूरीहून ऐवजास स्वार आले तेच रवाना केले आहेत. तरी, लिया प्रे।। ऐवज आपली सिबंदीची माणसें देऊन ऐवज चापळ येथें पावता करावा. ह्मणजे पुढें विळूरीं आह्मी रवाना करूं. वरकड नवल विशेष ल्यावयाजागें नाहीं. भिल्लांचा उपद्रव, यास्तव सरंजाम येथें आला आहे. शेपन्नास भिल्ल ठार जाले. नित्य स्वारी होत आहे. आपल्याकडील सविस्तर ल्याहावें. सत्वर ऐवज व स्वार पाठवावे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. हे विनंति.