Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४८
श्री
१७२३ फाल्गुन वद्य १
पौ फालगुन वद्य ३ इंदुवार प्रातःकाळ जाबसुद.
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे शेवेसीः-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंति विज्ञापना ता। फालगुन वद्य १ परियंत आपले आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असो, विशेष. काल मंदवारी दों प्रहरा रात्रीं श्रीमंत तात्यांकडे पत्र सातारियाहून आलें. मार कीं, पेंढारी आजंठ्याचा घांट शुकरवारीं चढला. त्यावरून लोक फार भयाभीत होऊन गेले. ब्राह्मण मंडळी फार गेली. आतां राहतां पौ कुणबी व च्यार घरें ब्राह्मणांचीं आहेत. त्यांस धैर्य पुरत नाहीं. वस्ती फार गेली. याकरितां लोक भयभीत होऊन, निघावयाची जलदी करीत होते. त्यास, खातरजमा केली कीं, पेंढार घांट चहडला अशी पक्कीं बातमी आली, म्हणजे सरीसर्वत्र एकदांच निघून जाऊं. याप्रों खातरजमा केली. परंतु लोकांस धैर्य पुरत नाहीं. आपल्याकडील बातनी कांहीं कळत नाहीं. त्यास, शहरांत पक्की बातमी असेलच. त्याप्रों लिहावी. +++ हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४७
श्री.
१७२३ माघ वद्य १४
राजश्री नारायण बाबूराव स्वामी गोसावी यांसीः-
विनंती उपरी. राजश्री रघोजी भोसले सेनासाहेब यांणीं सनसबा तिसैनांत दरबारखर्चाबाबत तीसहजार रुा। तुमचे विद्यमानें दिल्हे. त्यापैकी सत्राहजार सातशें पन्नास रुा। खर्च होऊन, बाकी बाराहजार दोनशें पन्नास रुा। शिल्लक राहिली. म्हणोन तुह्मीं इतवारें सरकारांत समजाविलें. तो ऐवज व्यवस्थेनें खर्चावयाचा. सा बा देणें ।। चिंतो वामन कारकून निा दफ्तर याजकडे रुपये १२२५० बाराहजार दोनशें पन्नास देविले असेत. तरी पावते करून, पावलियाचें कबज घेणें जाणिजे, छ, २७ सवाल सुा इसने मयातैन व अलफ. हे विनंति.
बार.
लिा। चिंतो वामन, सदरहू वरातेप्रो बारहजार दोनशें पन्नास रु। चांदवड भरून पावलों. छ ७ जिल्काद. हस्तें पांडुरंग रामचंद्र ढमढेरे. सुा इसने मयातैन. हस्ताक्षर खुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४६
श्रीलक्ष्मीकांत.
१७२३ माघ वद्य ९
पो छ २२ सवाल सुा। इसन्ने मयातैन, माघ.
राजश्री पंतप्रधान गोसावी यांसीः-
दंडवत विनंती उपरी. गोसावी यांनीं खासदस्तुरचें पत्र राजश्री नारायण बाबूराव यांज समागमें पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखन-अभिप्राय अवगत जाहला, व मशारनिलेचेंही बोलण्यावरून सविस्तर समजण्यांत आलें असेल, यांसीं राजश्री श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव यांची विदा मुहूर्तेकडून बाहेर केली, येविशी पेशजी लिहिलेंच आहे. सांप्रत, उभयतां स्वार होऊन आले आहेत. त्यास, कित्येक सलाह मसलतीचे प्रकार उभयतांसीं व राजश्री नारायण बाबूराव यांसीं बोलण्यांत आले आहेत. सर्व अर्थ बोलतील, त्याजवरून कळों येतील. रा।. छ ११ माहे शाबान. सुज्ञाप्रत विशेष काय लिहिणें ? कृपा लोभ असो दिला पाहिजे. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३९
सर्वउपमायोग्य सदायशवंत राजमान राजाधिराजश्री आपाजीबाबा व रा। बाबूराऊ स्वामीचे सेवेसी सेवक गुंडाजी नाईक सास्टांग नमस्कार विनति येथील क्षेम छ २४ रमजान परियंत पातशाई लस्कर नजीक मोहोळ मधे सुखी इंदापूरचे रयत समजाविसी एथे गुंतलो आहो तरी इ. इ. इ.
लेखांक ४० १६३८
सुहुरसन ११२६ कारणे बो। वाघोजी वलद पदाजी इबिन वाघोजी चांभार यासी माहाराजा राजश्री रंभाजी कदम साहेब मुखत्यार यानी हकीमाकडून महजर करून दिल्हा त्यात तकरीर येणेप्रमाणें -
तकरीरकर्दे बो। पदाजी वा। मालजी वा। दमाजी
कदम चांभार का। मा।र यानें तकरीर केली ऐसीजे
सोरटाचा दुकोळ यजाला त्यापलीकडे आपला पूर्वज
साया मेहेतर त्याचे पुत्र ७ पैकी सोरटाच्या
दुकोळातून राहिला हाणमेहतरी याचा लेक
दमाजी मेहतरी आपला अजा इ. इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४५
श्रीशंकर.
१७२३ पौष वद्य १४
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित बावा स्वामीचे सेवेसीः-
विनंति सेवक येसाजी गायकवाड कृतानेक सा दंडवत विनंति. येथील क्षेम ता। छ २७ माहे रमजान जाणून स्वकीय लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. यानंतर अबदुल रजाख देशमुख पा। उडणगांव याणीं आपले भाऊबंदी +++ जिवे मारिलें. त्यास त्याच्या बाइका व मुलें श्रीमंतापाशीं फिर्याद जाली. श्रीमंत राजश्री रघुनाथराऊ दादासाहेब या प्रांतीं आले. त्यासमईं भेटीस बोलाविलें. त्यास, गैरहजर होऊन, पळोन जाऊन, त्याणीं देशमुखी जप्त करून, सेलवडेस ठाणें बसऊन झेंडा लाविला ! राजश्री नारो बाबाजी सुभेदार माहाय याच्या स्वाधीन ठाणें केलें, त्यास, आह्मांस नेना. ह्मणून आह्मी श्रीमंतास अर्ज केला की, ठाणेयांत कारकून दुसरा हुजूरचा ठेवणें. त्यास, त्याणी रा सदाशीवपंत कारकून ठेविले. देशमुखीची नजर घेऊन, यंदा गुमस्तगिरी आह्माकडे दिली. आह्मीं त्यांचे गुमास्ते पेशजीचे आहेत, तेच ठेविले. अखेरसालीं देशी गेलियाजवर, श्रीमंत जप्ती पंचाईत करून मोकळी करतील अगर त्यांच्या खातरेस येईल त्यास गुमास्तगीर सांगतील. ते मुलखाचें खावंद. त्याणीं जप्ती केली, ठाणें बसविलें. त्यास, अबदुल रजाख मागें कईत. फिर्याद वतन. त्याचें ठाणें मारितां त्यास आपल्यास जाग कोठें पाहिली ! वतन जाऊन ठिकाण नाहीसें होईंल. असें कर्म न करावें. श्रीमंत पुणियास आलियाजवर, त्यांसपाशीं जाऊन, हवाल सांगोन, अर्ज करून, त्यांची कृपा निर्माण जाहालियावर ते स्थापना करितील. त्यांची नालीस शहरीं केलीयानें त्यास विशाध येईल, ऐसें न करावें. तुह्मी त्यास फजित करून सांगणें कीं शहरीं नालीश कार्याची नाही. जर त्याणीं तुमचे नाइकिलें, नालीश केली, तरी त्यास ठिकाण नाहीसें होईल. येथें वार्ता उडाली आहे कीं, बहिर बक्षी आला आहे तो खेळवाडेवर येतो. ऐसी रोज आवई उडाली. याजमुळें पा उडणगांव फरारी जाहला. शिवणेंहि फरारी जाहलें, बहुत धूम माजविली. रोज पळ सुटला. सेलवाड वैराण जाहली. त्यास, साहेबी कृपा करून नबाव शाहनवाजखांजी यांस सांगोन, सेलवाड व उडणगांव याजविशीं बार खास चिठी मेहेरेनशीं देऊन पाठवणें, श्रीमंत राजश्री जाधवराऊ आपल्या पदरचे आहेत ह्मणून हे अर्ज साहेबास लिहिली. साहेबीं चित्त घालून, खामखाई बरखास चिटी घेऊन पाठविली पाहिजे. नाहीं तरी, उडणगांव परगणा वैराण जाहला. बक्षीची दहशत भारी पडली. याजमुळें रयत फरारी जाहली. या गोष्टीचा बंदोबस्त साहेवाखेरीज होणार नाही. ह्मणून अर्ज सेवेसीं लिहिली. विनंति लिहिली हे मान्य करून, बरखास चिठी घेऊन पाठवणें, देशमुख आपलेपाशीं राहों देणें. श्रीमंत पुणियास आलियाजवर, आमचे यजमान व साहेब मिळोन, त्याचा अर्ज करून मग जें होणें तें होईल. बहुत काय लिहिणे ? हे विनंतिलक्ष.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४४
श्री.
१७२३ मार्गशीर्ष वद्य ३
जमा माहालपोता कमावीस बाबा रघोजी भोसले सेनासाहेबसुभा यांजकडे संस्थान गदेमंडलें रेवाउत्तरतीर याजबा. ऐवज सरकारात घ्यावयाचा ठरला आहे. त्यापैकीं गु।। आनंदराव बाबूराव वैद्य यांणीं भिकारीदास जोहरी याजकडून देविले. ते हस्तें परशराम नाईक अनगल, चांदवड रु।।
१९७०० छ १५ साबान.
१०३०० छ १६ सावान.
----------
३००००
तीस हजार रुो चांदवड पोता जमा असेत. छ १६ साबान, सुा इसने मयातैन व अलफ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४३
श्री.
१७२३ कार्तिक शुद्ध ७
राजश्रियाविराजित राजमान्यराजश्री गंगाधरपंत यांप्रति रामचंद्र दीक्षित आशिर्वाद उपरी येथील क्षेम तार कार्तिक शुद्ध ७ रविवार पावेतों यथास्थित असों. विशेष. अलीकडे तुमचें वर्तमान पत्र येऊन कळत नाहीं व लष्करचें बातमीचें वर्तमान कळत नाहीं. इकडे लष्करचें वर्तमान कीं, मीरखान पठाण व गोपाळराव व श्रीपतराव व पेंढार ऐंसें ब-हाणपुरीं येऊन दाखल जालें, ते इकडे येतात, ह्मणोन श्रीमंतांचे डांकेचे वर्तमान गांडापुरीं व प्रवरासंगमी शनवारीं आलें, येणें कडून चित्त चिंताक्रांत आहे. मिरखानाचे फौजेची दहशत भारी आहे. याजकरितां तिरस्थळी घाबरली आहे. त्यास, * शहरीं फौजेचें पक्कें वर्तमान असेल ते लिहून पाठवावें. शहरी पक्कीं बातमी नसल्यास शेंदुरणीस मुजरहू बोसमी करितां अजुरदार पाठऊन, पक्की बातमी आणवून, कोणीकडे जाते हें सविस्तर बातमी आणवून लिहून पाठविणें, अथवा शहरीं वर्तमान पक्कें असलियास, तुमचें उत्तर लवकर पाठवावें. म्हणजे तुमचे लिहिल्यावरून मुलामाणसांची शहरीं यावयाची तजवीज करूं हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८
महामेरु अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमानी राजश्री आपाजी व बाबूराऊ स्वामी गोसावियासी
स्नेहांकित गोपाळराऊ सीरसास्टांग नमस्कार विनति उपरि ता। छ ७ जमा- दिलाखर परनु सुखरूप असो मुकाम शहाचे लस्कर बालेघाट पार उतरून गेले आह्मी घोडी लसकरांत घातली आजि तिचे वाके पा। गुंजोटीस देविले होते तेथील देसमुख व देसपांडे पळून गेले व वराताचे वाके वसूल जाले नाहीत व तेस हि वाके पावले नाहीत तेव्हा आह्मापासि आले आलियाउपरि आह्मासि + + + + काही करू न ये ते खटखट केली आह्मी बाईरान केलेयावरी ते रुपये एकशे सतेवीस व पाचे + + नीबकाने अडीच महिनेचे वेज रुपये १५ देविले ऐनु देने रुपये १४२ बेतेळीस देने यास आह्मी आपलेपासून रुपये ४० चाळीस रोजमुरातून व वेजेवा। रुपये ३९ व गुंजाटीस रु॥ ११॥ ऐनु रु॥ ९०॥ साडे नावद दिले बाकी उरले रु॥ ५१॥ साडे एकावन ते ए करून देत होत त्यास आह्मी घाट खाले जाऊ लागलो मग ऐसा होई +++ तुह्मापासि पाठविले आहे तरी + + + + काट करून देणे व घोडी तीन पाठविली आहेत सारगी व कुमाईत इ. इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४२
श्रीमार्तड प्रा.
१७२३ कार्तिक शुद्ध ५
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी व मल्हार रामचंद्र कुळकर्णी मोजे कायगांव सां। नमस्कार विनंती विज्ञापना येथील कुशल तां। कार्तिक शुद्ध ५ पावेतों आपले आशिर्वांदेकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. डालटन कंपू कूच करून सोमवारीं वेरुळास गेला. आत्माराम बाबा वागनीस यांची फौज वेरुळास गेली. वेरुळकरांसीं यांची लढाई लागली आहेच. वैजापुराकडे शामरायाची पागा आहेच, बावनपागे इकडे येतात, ह्मणोन आवई आहे. गांवची पेरणी जाली. जोंधळे चांगले तास लागले आहेत. सालमारीं पर्जन्य फार; यामुळें पेरणी मागस जाली. परंतु जोंधळे चांगले आहेत. मग पुढें कसें होईल तें पाहावें. ++ + हे विज्ञप्ती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३७
इष्टजनमनोहर अखंडितलक्षुमीविराजित माहामेरू राजमान्य राजश्री रामाजी देसपांडे पा। सुपे
०॥ स्वामी गोसावी यास सेवक ठेवणाईत पिराजी व सुभानजि देसमुख व नरसोवा देसपांडे पाए दोणी कर जोडुनु दंडवत अनुकर्मे नमस्कार विनति उपरि एथील क्षेम जाणउनु माहाराजे आपले स्वस्तिक्षेम लेखन केले पाहिजे यानंतर माहाराजे कृपा करुनु पत्र पाठविले ते सिरी धरुनु सनाथ जालो यावरी माहाराजे पैकियाचे विशी लिहिले तरी दासोपंत कामास गेले आहेत व ते आलियावरी स्वामीचे पैकियाचे विल्हे करुनु देउनु दासोपंत ८॥१० रोजा एतील सर्वेच माहालीस पाठउनु देणे आणि आपले पैकियाचे निर्गम करुनु घउनु जाणे बहुत लेहू तरी आपण सेवक असो माहाराजाचे पायासी बहु अतर पडले आतां अंतर पडणार नाही कोप न कीजे सोडउनु लौकिक केला तो कीर्ती माहाराजाची जाली आहे आह्मी तो माहाराजाचे बहुत कृतउपकारी जालो आहो यावरी आह्मी लिहितां पुरवत नाही बहुत काय लिहिणे हे विनति