[ ५५ ] अलीफ. १९ मे १७०७.
राजे शाहू याणीं बादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावें कीं, तुमचें पत्र पावून लोभास कारण झालें. तुह्मास मनसब व दहा हजारी स्वाराची सरदारी दिली असे व बाकीचे व तुमचे सर्व मा। सैद अबदुलखान बहादुर कुतुबुलमुलुख याजकडे सांगितलें आहे त्याप्रों। अमलांत आणावें आणि आपला वकील एक तुमचें येणें येथें होई त्यापूर्वीं पाठवून द्यावा, ह्मणजे मनसबेच्या सनदा सरकारांतून तयार करविल्या जातील. छ २७ सफर, सन १ जुलूस.