[ ५६ ] अलीफ. २३ जून १७०७.
सर्व शूरांत श्रेष्ठ, सर्व उमरावात थोर, इस्लामीधर्मरक्षकाचे पुत्र, रोज शाहू याणीं पातशाही कृपेते सतोषी होऊन जाणावें की- तुह्माकडील रायभान वकील याणीं विनंति केली जे, तुह्मी आपले जहागिरीचे महालीं आल्यानतर इकडे यावयाचा इरादा केला आहे, याजकरिता राणीनें जमीदारीचा फर्मान मिळावा ह्मणोन कृत्रिमाने अर्जी लिहिली होती. तिला व तिचे चिरंजीवास कपटी समजोन त्याचें उत्तर दिल्हें नाहीं. कारण कीं, आमचे मुलकांतील राज्य व जमीदारी तुह्मांकडे असावी आणि तुह्मी आपले वडिलांप्रमाणे तेथें कायम रहावें. नंतर जे किल्ले थोरले पातशाहींतील त्या वेळेस हातीं आले नउते तेहि फौज पाठवून घ्यावे. जाणोन तुह्मी आत्मिक असें समजोन हा फर्मान पंज्यासुद्धां लिहिला आहे तरी तुह्मीं आपले फौजेसुद्धां जलद येथें येऊन पोहोचणें. ह्मणजे तुह्मावरी कृपा आणि लोभ वारंवार उत्कृष्ट होईल. छ ४ माहे रबिलाखर, सन १ जुलूस.