पत्रांक ५०२
श्री
१७२२ आश्विन शुद्ध १
श्रीमंत महाराज राजश्री बाबासाहेब स्वामींचे सेवेसीः-
विनंती सेवक नारायण बाबुराव वैद्य कृतानेक सा नमस्कार विज्ञापन ता। छ २९ जावल मुकाम नागपूर येथेx स्वामीचे कृपाकटाक्षेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. मजवर संकटाचा समय प्राप्त जाहला. या जकरितां आपलें वर्तमान स्वामीस समजावें म्हणोन, चिरंजीव सदाशीव लक्ष्मण जोशी यांनी तपशिलें लिहिले आहे. त्याचें मनन कृपा करून समक्ष होऊन माझें संकट दूर होय, अशी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. दुसरी गत पायांशिवाय नाहीं. व मीही जाणत नाहीं. ये विषयीं आर्या श्लोकः-
त्वं मम जननी जनकस्त्वमेव बंधुः कुलंच शीलंच ।
त्वयि निष्ठुरतां याते तृणमपि वज्रायते मयीशान ।। १ ।।
फार काय लिहूं ? सेवसीश्रुत होय हे विज्ञापना.