पत्रांक ५१७
श्री.
१७२२ माघ शुद्ध ११
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना येथील कुशल जाणून ता। माघ शुद्ध ११ पर्यंत यथास्थित असे विशेप, परवां जिवता दळयाबरोबर पत्र पाठविलें तें पावलें. पुण्याचें पत्र पाठविलें तें तिळाच्या पिशव्या नव, मल्हारपंत कुळकर्णी याचे माणूस पुण्यास गेले, त्याबराबर पाटविली. कळावें. रा॥ दवलतराव शिंदे निंबदेहरें येथें आला, ह्मणोन वर्तमान आहे. खचित आला. पुढें पुण्यस्तंभाची आवई आहे. बाहेर अफवा ऐकतों कीं, खटला राहोरीचे मुक्कामीहून पुणतांब्याकडे रवाना करून, सडा तिरस्तळीकडे येणार. ऐसें लोक बोलतात. वरकड सर्व मजकूर यथास्थित आहे. देवीचंद वाणी आपणाकडे आला आहे. राजश्री व्यंकटरावजी गांडापुरकर आपले गांवीं बावनपागेचे गर्दीपासून आहेत. ते मुलीचें लग्न येथें करितात. त्यांस राजश्री शिवरामपंत तात्याचा वाडा च्यार दिवस लग्न करावयास जागा प्रशस्त आहे. याकरता त्याची परवाननी पाठऊन द्यावी. अ ++ नारोपंतास सांगून त्याची चिठ्ठी पाठऊन द्यावी. वरकड नवल विशेष जालियास लिहून पाठऊं, बहुत काय लिहिणें ? हे विज्ञाप्ती.
महाराजांचे सेवेसी मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां। नमस्कार, लिखतार्थ परिसोन लाभाची वृद्धी असावी. हे विज्ञाप्ती.
राजश्री विनायकबापूस सां। नमस्कार.