पत्रांक ५१८
श्री.
१७२२ माघ वद्य १
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना येथील क्षेम ता।माघ वद्य १ पावेतों आपले कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. काल पत्र आपलें आलें. लिहिल्याप्रों बेवीस रुा। ब्रहाभटजीपासून घेऊन, देवीचंद मारवाडी यास देऊन, त्याची पावती घेतली. रा। दौलतराव शिंदे देवठाणींहून कूच करून, आज कासारवारीचे मुकामास गेले. याप्रों वर्तमान आहे. वो रा परशरामनाना टोंकें प्रवरासंगमकर यांस शिंदे यांचें पत्र आलें होतें. त्यावरून ते लष्करांत गेले. चिरंजीव गणोबाही आज शिंद्याचे लष्करात रा। मनोहरपंतआपाच कामानिमित्य गेला आहे. एका दो रोजां तो आला ह्मणजे सविस्तर वर्तमान कळेल, त्याप्रों लिहून पाठऊं. आज वर्तमान ऐकिलें कीं, किल्ले नगर शिंद्यांनीं सरकारांत श्रीमंतास दिल्हे. कामकाज किल्याचें सरकारांतून रा। यशवंतराव सुभेदार यांकडे सांगितलें, म्हणोन आज तिसरे प्रहरापासून वदंता आहे. मोहन तेली गांवांतून गेला ह्मणोन आपणास कळलें. त्यावरून आपण लिहिलें. त्यास, त्याचा बाप वामोरीहून आला. त्याकरतां तो बापास घेऊन देवदर्शनास सेडिवधे यास गेला होता तो काल गांवास आला. कळावें. हुर्डीपेट्या ३ वे टांहाळ कडपे २ पाठविले आहेत. पावतील. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञाप्ती.
सेवेसी मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां। नमस्कार लिखितार्थ परिसोन लोभाची वृद्धि असावी. हे विज्ञाप्ती.
रा. रा. विनायक बापूस उभयतांचा नमस्कार, पांघुरणें व नवार पाठविली ते पावली. हे विनंती.