Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
ऐसिया उपरि आपणास सदरहू वादियासी पंचाईत तुह्मास राजश्री पंती दिधले त्यासी स्वामीने आपणास पुरसीस केली तरी याचे आपले भांडण आजितागाईत नाही मागे आपल्यावर बिराना वादिया ह्मणजे आपला वडील नागोपंत देसपांडिया व देसमुख ऐसे दर अमल निजामशाही मुलूक भागस्थळ होता ह्मणौन मौजे कोथळे प्रा। मजकूर तेथे तगटास गेले होते तेथे कोतावा व त्याचा लेक मेगावा ऐसे वाईदेसीचे ब्राह्मण सेतडिया मागत आले त्यासी आपले वडिली नागोजीपतीं पुसिले की तुह्मी काही लेहो जाणत असाल तरी तुह्मास लेहावयास ठेऊन त्यासी त्यानी ह्मटिले की आपण लेहो जाणत आहो चाकरी राहोन मग उभयता बापलेक चाकरीस यारिदीस ठेविले आणि कितेक रोज जाले तो कोतावा मेला मेगावा कारभार करू लागला व नागोपत मेले त्याचे पुत्र लखमो जनार्दन होते त्यासी मेगावाने जबरदस्तीने कारभार करिता कुल आटोप केला आणि आपल्या वडिलास बेदखल केले खावद च ह्मणो लागला आपले वडील गरीबे केलीं याउपेरी निजामशाही दस्तूरखान मोकासी होता खानमशारुनिले त्या जिल्यास गस्तीस आले होते ते समई आपले वडील लखमावाबावा माती खाणावयास गेले तो नफर मजकुराच्या बटकी हि माती खाणावयास आल्या त्यानीं कलागत करून उठवून वाटे लाविले मग सोसे ना ह्मणौन खान अजम दस्तूरखानाजवळ उभे राहिले कीं आपला गुमास्ता असोन... बेदखल वतनास करून सोडिले आहे तर आपला हक्कइनसाफ केला पाहिजे त्यावरी खानमाइलेने कुल परगणा बोलाऊन गीर्दनवाईचे जमीदार बोलाऊन काजी व देशमुख बोलाऊन बैसोन इनसाफ करून नफरमजकूर खोटा केला मग नफरमजकूर बाहेर घातला आणि देशपाडेपण व कसबाचे कुलकर्ण व जोतिश अष्टाधिकार आपले वडिलाचे हवाले केले खुर्द खत करून दिधले आतिण सदरहूप्रमाणे महजर करून द्यावयाचा हुकूम केला यावर लेहावयास कोण्ही नाही लेक माहादाजीपत लहाण आहे ह्मणौन खान अजम तुरकखानाचेथे विष्णु हरदेव चाकरी करीत होता तेथून आणिला आणि खानमा।इलेजवळ नेऊन उभा केला की आपला पुतण्या खान अजम तुरकखानाचेथे चाकर होता तो आणिला जो पावेतो आपला लेक दाहा बारा वरसाचा आहे तो थोर होय तो पावे तो नफर मजकूर आपल्या पुतन्या लिहील ह्मणऊन अर्ज केला त्यावरी खानमा।इले बोलिले की विष्णोवा गुमास्तेमजकुराचा सोईरा होए आणि याचे हाती कैसे लिहिणे देतोस त्यासी लखमावा बोलिले की सोईरा जाला तर काय जाले आपल्या पुतण्या आहे काय चिता आहे त्यावरी चौ पाचा वरसा माहादपत कारभार करू लागले त्यामागे विष्णुपत कारभार करू लागले नरहरपत जुनरी होते ते हि आले मग दोघे भाऊ जाले तो कितेका रोजा ममलकतमदार मलिक अबर साहेबाजवळ पुणेकर देसमुखदेसपांडिये सीवाचे झगडे पुणे देशात व सुपे देशात गावगन्ना आहेत याबदल फिर्याद जाले आणि प्रसंग केला ह्मणौन विष्णु हरदेव व जाऊ पाटिल ऐसे हजूर पाठविले तो जागीर खान अलीशान याकूदखान साहेबास मोकासा प्रा। मजकूर होता त्याजवळ गेलेती कोतोवाचा लेक मेगावा उभा राहिला ते खबर कळलियाउपेरि माहादाजीपत हजूर गेल जाऊन खान अजम याकूदखान साहेबाजवळ आपली हकीकती जाहीर केली खानमाइलें तैसा च आपला हेजीब बराबर देऊन मलिक साहेबाजवळ माहादपतास पाठविलें तेथे माहादपती आपले जबानीं कुल हकीकत गुमास्तेमजकुराची खान अजम दस्तूरखानाचे वेळेची जाहीर केली त्यावर इनसाफ करिता दरोग बातील दिसोन आलियाउपेरि दूर केला नफरमजकुरास खुर्द खत परवाना देविला आणि माहाली महजर करावयाचा हुकूम केला त्याउपेरी माहादपंत परगणेमजकुरास आले त्यावरी विष्णोपंताचा लेक हरिपत माहादाजीपताबराबर कारभार करीत होता व सखोपती हिं केला तों माहादपंत मेले
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५६४
श्री. १७२४ वैशाख वद्य ४
वा श्रीमंत राजश्री नाना दीक्षित नाना स्वामींचे सेवेसीं:-
पो। शामराव शिवराम सां नमस्कार विज्ञापना येथील कुशल तो। छ १८ मोहोरम पावेतों पेठ मालेगांव यथास्थित असों विशेष. आपण ती। राजश्री गणेश शिवराम यांचें पत्र नेवासियाहून पाठविलें तें पावलें. त्यांत मजकूर कीं, लष्करचें वर्तमान होळकराकडील वगैरे दिनचर्येचें सविस्तर लिहून पाठवावें. त्याजवरून तीर्थस्वरूपजीचे नांवें पत्र लिहून पाठविलें आहे. त्याजवरून आपले ध्यानास येईल, अलाहिदा पत्र ती। स लिा आहे. तो लखोटा नेवासियास पावता करावा. बहुत काय लिहिणें ? लोभाची वृद्धी करावी हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५६३
श्री.
१७२४ वैशाख वद्य १
पुा ती राजश्री बाबा वडिलांचे सेवेसीं:-
...नाहींतर मालेगांवास पठाणी मोरचे लावावे. याप्रों येशवंतरायाची ताकीद. मोरचे लावले ह्मणजे येशवंतराव याणींहि मालेगांवीं यावें, या प्रों त्याची बातमी खचित. येशवंतराव होळकर याचे लष्करांतून पत्रें येथें कोणकोणास आलें. मालेगांवीं येण्याचा मोठा इरादा आहे. येथेंहि सावधच आहेत. ईश्वर काय घडवील तें पाहावे. परंतु ठीक नाहीं. पठाण येथून ललींगास बारा कोसांवर आहे. एका दों रोजांत मालेगांवीं शहा त्यांचा येईल. दुसरें श्रीमंतांणी हुजरे येशवंतराव याजकडेस पा। होते. त्याजबा एक हत्ती व पांच घोडे वगैरे नजर श्रीमंतांस, एक कारकून अगोदर देऊन, पा आहे. काल मुकाम मालेगांवीं होता. हुजरे यांसीं किल्यांत बोलाविलें होतें. त्यांणीं वर्तमान सांगितलें कीं होळकर याची चाल कांहीं ठीक नाहीं. बहुत मुद्दे घातिले आहेत. हे मुद्दे प्रों जाल्यास, मग आह्मी कांहीं ठाणीं घेणार नाहीं व उपद्रवही होणार नाहीं. या प्रों बोलणीं जालीं. उगेच समाधानास्तव हत्ती वगैरे पाठविले आहेत. परंतु त्यांचे ध्यानांत श्रीमंत वगैरे कोणीच नाहीं. याप्रों या प्रांतांत गर्दी आहे. येरंडोल भडगांव येथें खंडणी माणे याणीं घेतली असतां पुन्हां येशवंतराव यांणीं रोखे केले. तेव्हां निरुपाय जाणून येरंडोल भडगांव उज्याड जालीं, काशीराव होळकर हे येशवंतराव यांतून फुटून सेंदव्यास किल्यांत जाऊन बसले आहेत. शिंदे याजकडील फौज गोपाळरावभाऊ बराणपुरास अलीकडे एक मजल आले आहेत. सरजेराव वगैरे हेहि ब-हाणपुरावर आहेत. मालेगांव वगैरे येथील गुंते उलगडून मग ब-हाणपुरास जावें. याप्रों बेत आहेत. मग काय घडेल तें पाहावें. आणिक नवल विशेष ल्याहावयायोग्य नाहीं. जिवाजी येशवंतहि येशवंतराव होळकर यांजपाशीच आहेत. सेंदुर्णी वगैरे महालांत ठाणीं जिवाजीचींच आहेत. कोणी महाल वस्तीस राहिले नाहींत. ऐसें आहे. कळावें, बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५६२
श्री.
१७२४ वैशाख वद्य १
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नानाजी दीक्षित स्वामीचे सेवेसीं:-
विद्यार्थि गणेश शिवराम कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. आपण पत्र पा तें पावलें. मालेगांवींहून तुमचें येथें पत्रें आलीं. त्यांत येशवंतराव होळकरयांचे लष्कराची बातमी काय आली ते लिहावी, म्हणोन आज्ञा. ऐशास, मालेगांवाहून श्रीमंत राजश्री गोपाळरावबापा यांची पत्रें परवां आलीं. त्यांत मार येशवंतराव होळकर थाळनेरास आहेत. पंचवीस हजार फौज व पेंढार वगैरे चाळीस हजार परियंत जमाव आहे. काशीराव होळकर येशवंतराव याजपासून निघोन सेंदव्याचे किल्यांत गेले. ते तोफा फिराऊन किल्याचा बंदोबस्त करून आहेत. काशीराव आपलेपासून निघून गेल्यामुळें, येशवंतराव यांस अविश्वास होऊन, खानदेशांत माने यांज समागमें काशीराव यांजकडील आचंबेसिंग व गणपतराव नारायण दिवाण होते, त्यांस माने यांजला येशवंतराव यांणी लिहून कायद करविलें, आणि माने अंमळनेरचे सुमारें होते व शहामतखान पठाण माचलपुरावर होता, त्यांजला निकडीनें आपले जवळ बोलाऊन नेलें. झाडून जमावसुधां येशवंतराव थाळनेरावर आहेत. एक रोंख दक्षिणेवर यावयाचा व एक बेत बराणपुराकडे जावें. असे दोन बेत आहेत. बातमीस माणसें गेलीं आहेत. पुढें वर्तमान येईल तसें लिहू. या अन्वयें मालेगांवचे पत्रांत मार आहेत. स्वामीस कळावें. पुढें समजल्यासारखें विनंति लिहिल्यास, आज्ञेप्रमाणें आळस करणार नाहीं. आपण मालेगांवीं माणूस पाठविलें आहे, तें आज यावेंसें आहे. त्यांस, आलें ह्मणजे अलीकडील तिकडे काय वृत्त असेल, तें कळेल. मजलाहि पत्र आलियावर अधिकउणें कळविण्याविशीं आज्ञा असावी. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञाप्ति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५६१
श्री.
१७२४ वैशाख वद्य १
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसी:-
विद्यार्थि गणेश शिवराम कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता वैशाख वा १ आपलें कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. यानंतर पत्रीं आज्ञा कीं, रा। येशवंतराव होळकर यांची बातमी थाळनेरास दाखल जाल्याची ऐकिली होती. पुनां माघारें गेल्याचें ऐकतों, येविशीं सत्यमिथ्या खचित वर्तमान आणवावयाकरितां मालेगांवीं माणूस पाठवित असों. त्यास, तुमचें पत्र पाठऊन देणें म्हणून आज्ञा. त्यास, मालेगांवीं माझे कनिष्ट बंधू चिरंजीव शामरावजी आहेत. त्यांस पत्र लिहून पा आहे. हें मनन होऊन रवानगीची आज्ञा व्हावी. म्हणजे तेथून सविस्तर बातमी येईल. लखोट्यावर शामराव शिवराम म्हणून लिा द्यावें. आणि माणसास सांगावें, गणपतराव मोकाशी यांचे घर पुसावें ह्मणजे गुंता पडणार नाहीं. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५६०
श्री.
१७२४ वैशाख शुद्ध १०
सहस्त्रायु चिरंजीव रा। शामराव नाना यांसी गणेश शिवराम आशीर्वाद उपरी येथील कुशल ता. वैशाख वा १० मुा केा। नेवासें येथें यथास्थित असों. विशेष. तुम्हीं श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न रा नाना दीक्षित कायगांवकर यांचे मानसा समागमें शेनवारचें पत्रें पाठविलीं ते मंगळवारी साहा घटका रात्रीस पावलीं. मार अलाहिदा तुमचें पत्र आमचें नांवें होतें, त्याजसुधां सविस्तर समजला. ईश्वरें मोठें अरिष्ट आणिलें. प्राण वांचणें कठीण जालें. याजकरितां तुम्हीं इकडील सला न पाहतां सर्व मंडळी निघालां, हें बहुत चांगलें केलें, येथे येऊन पोंहोचावें. मग पुढें श्री जसें घडवील तसें घडवो. तेथील बंदोबस्त करून लौकर निघोन यावें. लोभ कीजे. रा मिती वैशाख वा ९ मंगळवार प्रथम साहा घटका रात्र हे आशीर्वाद.
राजश्री रामचंद्रपंत आपा स्वामीस सा। नमस्कार विनंति उपरी चिरंजीव शामराव मंडळीसुधां निघोन येतात, त्या पक्षीं मागें मालेगांवीं आतां तुम्हीच आहां, आणि चिरंजीव असले तर विलग ! वेळ प्रसंगास तुम्हांशिवाय दुसरियाचें धैर्य काय आहे ? मुलें लेकरें प्राण वांचून मात्र येतात. परंतु यज. मानाकडील वस्तभाव किल्यांत आहे. त्यांची तजवीज अगोदर लिहिल्याप्रों करून माणिकपुजास रवाना करावा. तो माणिकपु जहि जागा बांकी नव्हे जाणून, तेथेंच ठेविलीं. त्यास, हें आपलें माथां मोठें अपयश आहे. बरें वाईट जाल्यास तोंड दाखवावयास जागा नाहीं. याजकरितां आतां तुमचे प्राण वस्तभाव जवळ आहे. कळेल तसें संरक्षण करून, आह्मांस वर्तमान कळवीत जावें. लोभ कीजे. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५५९
श्रीहाळसाकांत.
१७२४ वैशाख शुद्ध १०
श्रीशाहुछत्रपतिअखिल प्रौढ प्रतापपुंरदर । आनंदराव गायकवाड सेना खासखेल समशेर बाहादर।।
तैनात जाबता सिलेदार जदीद एकांडे कारकून कृष्णाजी अनंत आ १ तैनात दरमाही नक्की शिरस्ता. सु। इसने मयातैन व अलफ, रुा
६०० जातीस.
१०० शार्गिद पेशा बा।
----------
७००
एकूण असामी एक, यास तैनात दरमाही नक्की सिा रु।। सातसें करार केले असेत. पौ नाणेंबटा वगैरे व दरबार खर्च वजा होऊन, बाकी तैनातीचें शाईचे मार्गे पावलें. चाकरी इमानी इतबारें करावी. हजिरीस घोडे तीनशावर किंमतीचे लागेल, लढाईत घोडे निशाण पुढें पडित जाहाल्यास दाखला पाहून किंमत पांचाचे मते ठरेल ती दिल्ही जाईल. लुटींत नगारा, निशाण, नौबत, ढाल, पालखी, व हत्ती, खजीना व तोफा सांपडेल ते सरकारांत दाखल करावी. चाकरीची तेरीख छ ८ साबान सन मार पासून चालू असे. जाणिजे छ ९ माहे साबान, मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५५८
श्री.
१७२४ वैशाख शुद्ध ६
अपत्य शामरावजीनें चरणावर मस्तक ठेऊन शिरसा नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागायत वैशाख वद्य ६ मंदवासर मुकाम मोलेगांव जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. वडिलीं आसीर्वादपत्र श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजश्री नाना दीक्षित कायगांवकर यांचे माणसांसमागमें पाठविलें तें पाऊन मार कळला. लिहिलें की फौजेचें वर्तमान दिनचयेंचें सविस्तर लिा पाठवणें. ह्मणोन पत्रीं आज्ञा. त्यास, श्रीमंत राजश्री यशवंतराव होळकर हे अमळनेर नजीक बहादुरपुरें येथें आहे. जाण्याचा इरादा दक्षणेस नालेगांव चांदवड इकडे यावें, व एक बोलावा कीं ब-हाणपुराकडेस जावें. राजश्री माणे वे गणपतराव हे येरंडोल वगैरे येथील खंडणी घेऊन पा-होळ्यास आले. तेथें रोखा तीनलक्षांचा केला. तेव्हां पान्होळकर लढाईस सिद्ध जाला, एक लढाई चांगली किल्यासीं जाली. माणे मागें फिरोन मुकाम ह्मसवे येथें आले. मग तह पडला. नंतर पा-होळकर हे माण्याचे लष्करांत मेजवानीस गेले. वस्त्र घेऊन आले. दुसरे दिवशीं माणें यांसी किल्यांत मेजवानीस बोलाविलें. सैपाक सिध करून बोलाऊ पाठविलें. तेव्हां माणे यांचें ह्मणणें पडलें कीं, दोनहजार सरंजामानिशी किल्यांत येऊ तेव्हां पा-होळकर यांचे चित्तास आलें नाहीं. पंचवीसा स्वारांनशीं मात्र यावें. तें माण्यांनी कबूल केलें नाहीं. गग......मेजवाणीचा सरंजाम माणे याजकडेस पाठविला. तो माणे यांणी माघारा दिल्हा. तों पा-होळेकर यांनी शेला पागोटें घेतलें होतें, तें माघारें पाठऊन दिल्हें. मग तीं माणे यांणीं तीनलक्षांचा ( रोखा ) केला. यांणीं उत्तर सांगून पाठविलें कीं, दारूगोळा मात्र आहे. पैका.तर मिळणें कठीण. असें बोलणें मात्र होऊन, माणे मुकाम करून आहेत. येशवंतराव पा-होळ्यास माणे यांचे कुमकीस येणार. किल्यांत पाणी नाहीं, इतक्याणीं मात्र जेर आहे. पुढें काय होईल तें पाहावें. येशवंतराव याजकडेस गेला होता. त्याची भेटी घेऊन दरकूच ललिंगास आला. वाडी लुटली व माडीही घेतली. तेव्हां किल्लेदार तीस हजार रुपये द्यावयास सिद्ध. हें पठाणाचे मनास न आलें. लक्ष रुपये द्यावे आणि किल्ला खालीं करून द्यावा, याप्रमाणें बोलणें पडलें आहे. अद्यापि कांहीं ठरावांत आलें नाहीं. ललिंगाचा गुंता उरकला ह्मणजे पठाणांनीं मालेगांवास यावें, अशी बोलवा आहे. रोखा चौंलक्षांचा केला आहे. माण्य जाल्यास उत्तम......
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५५७
श्री.
१७२४ चैत्र वद्य १०
पो मिती चैत्र वद्य १२ गुरुवार, सहस्त्रायु चिरंजीव लक्ष्मीनारायण दीक्षित यांप्रति गोविंद दीक्षित आशीर्वाद उपरी येथील क्षेम चैत्र वद्य १० तिसरा प्रहर जाणोन स्वकीय लिहिणें, विशेष, तुह्मीं दोन पत्रें पाठविलीं. तें एक दोंप्रहरीं व एक तिसरे प्रहरीं पावोन वर्तमान कळों आलें. लष्करचे गडबडीमुळे लोक भयाभीत जालें, म्हणोन विस्तारे करून लिहिलें, त्यांस राजश्री आबाजी महादेव व चिंतो विठ्ठल या उभयतांस मल्हारपंताहातीं आमचें नांवें पत्रें लिहणें. त्यांत मजकूर कीं, आपले सैन्याचा रोंख तिरस्थळीवर यावयाचा आहे, म्हणोन येथील ब्राह्मण सर्व भयभीत जाले आहेत, त्यास आपलें अभयपत्र आलियास लोक निश्चित राहतील, याप्रों पत्रें देऊन माणसें लष्करास पाठवावीं. तेथील उत्तर आश्वासनाचें आलें तरी उत्तमच जालें, नाहींतर, तुम्हीं इकडे यावयाचे करावें, वो बाळकृष्णभट हालीं टोकियांत आहे. त्यांजला वे। नारायण जोशी यांजला भेटावयासीं सांगितलें आहे. तिकडेहि पाठऊन बंदोबस्त जेथवर होईल तेथवर करून घ्यावा. लष्कर नगराहून कूच जाहलियास तिरस्थळीचे दाहावीस ब्राह्मण पुढें पाठविणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५५६
पो छ ६ मोहरम शके १७२४
श्री.
१७२४ चैत्र वद्य ८
राजश्री पंतप्रधान गोसावी यांसी:-
इंडवत विनंती उपरी गोसावी यांनीं खासदस्तुरपत्र पाठविलें तें पावोन जाहला. राजश्री नारायण बाबूराव यांसीं व उभयतांसीं बोलणीं जाहला. याचा मजकूर मशारनिलेनीं लिहिला असेल. सांप्रत समक्षता व्हावयाचा विचार जो दूरंदेशीनें ठहरला तो त्रिवर्ग लिहितील. त्याप्रों परस्परें मनांत वागावा, यांत बहुत चांगलें आहे म्हणोन लिहिलें तें कळलें. व त्रिवर्गोचे लिहिल्यावरूनहि येविशींचे सर्व भाव समजण्यांत आले. त्यांस, आपण इकडेस अंतःकरणापासून लोभ ममता ठेऊन आहेत, हें समजोन खातरजमा पहिली होती ती अधिकोत्तर जाहाली आहे. येथीलहि निःसीम भाव जातीशीं खचित आहे. हा प्रकार उभयतांनीं बोलण्यांत आणलाच आहे. तेव्हां याचा तपशील पत्रांत ल्याहवा, ऐसें नाहीं, जो बेत उभयतांनीं आपणांसी केला आहे तो दूरदेशीचे मार्गे फारच चांगला पोख्त आहे. तोच खचित असे. यांत येथून कदापि दुसरें व्हावयाचें नाहीं. जो बेत होईल त्याप्रोंच तेथून घडल्यास तैशा सारिखे इकडून घडेल व जैसा इशारा येऊन पोहोंचल तदनुसार अंमलांत येईल, हे खातरजमा पुर्ती असावी. एतद्विषयींचा मजकूर उमयतांस व राजश्री नारायण बाबूराव यांसीं लिहिण्यांत आला आहे. बोलतील त्याजवरून कळों येईल. रा छ २२ माहे जिल्हेज. सुज्ञाप्रति विशेष काय लिहिणें ? कृपा लोभ असों दिला पाहिजे. हे विनंति. मोर्तबसुद. *