पत्रांक ५१६
१७२२ पौष वद्य १३
राजश्रियाविरजित राजमान्य राजश्री बाजीपंत स्वामीचे सेवेसी:-
पोष्य गंगाधर गणेश साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता। पौष वा १३ पावेतों यथास्थित जाणून स्वकीयें लिहीत जावें. विशेप. तुह्मी ती। दादाची रवानगी केली. ते येथें सुखरूप पावले. आह्मी यावे. सबब माणसें गाडली ठेविली. कालपासून इकडे पेंढारी, निा शिंदे, याची आवई दाट उठली. भागानगराकडे जाणार, दहापांच कोशीं स्वार पेंढारी आढळले, अशी आवई दाट बोलतात. सबब राहिलों. दुसरेंहि काम जरूरीचें, याजमुळें गुंता जाहला. गाडली माणसें उगीच ठेवावीं, तर तुह्मीं रागें भरुं नये, जाणून माघारी पाठविली आहे. अमावास्या जाल्यावर येथूनच माणसें घेऊन येतों. तुह्मी मार्ग लक्षूं नये. आजच निघणार हातो. परंतु दोषा चौघांनी मोडे घातले व दुसरें काम जरूरीचें प्राप्त जालें. सबब राहिलों. तुह्मीं रागे भरूं नये. वोढीमुळें कांहीं सुचत नाहीं. तुह्मापाशीं येऊन येथें लठीकवाद कोठवर घ्यावा. तुह्मांस सर्व ठावकेंचे आहे. तुह्मी तेथे घाबरू नये. पेंढारी आपले तिकडे येत नाहीं. वरकड मार, यजमान तेथें आले आहेत. फार मर्जी सरंक्षावी. राजश्री बाळाजीराव व काशीनाथराव मराठे यांचाही समाचार घ्यावा. त्यांची मर्जी खुप ठेवावी. तुह्मांस येथून सरंजाम दाळ तुरीची वजन ।३।, हरभ-याची १ दीपाव, सालंमिश्री ८९, १ व दादानी दिला ३, रोख, बापूबरोबर पाठविले आहेत रु. वीस हे घ्यावे. उत्तर पाठवावे. पौषआकार जाला. तुह्मांस कळावें. महारास मंगळवारचे पाहोस दिल्हे आहे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. पुण्याहून राजश्री पंतांची स्वारी येणार, असे वर्तमान तुमचे तेथें आहे, ह्मणून दादा सांगत होते. यजमानस्वामीचे पत्र नाहीं. तिकडे आणखी काय वर्तमान असेल तें लिहून पाठवावें. हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)