पत्रांक ५२५
श्री.
१७२३ वैशाख शुक्ल १०
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नाना दीक्षित स्वामींचे शेवेसी:-
विद्यार्थी गोविंद भिकाजी गडबोले कृतानेक सां। नमस्कार विनंती येथील कुशल ता। वैशाख शुद्ध १० पर्यंत आपले कृपेकरून मुक्काम कसबें पुणें येथें सुखरूप असों. विशेष. आह्मीं पैठणाहून सडे होऊन निघलों तो चैत्र वद्य एकादशी गुरुवासरी सुरक्षित पावलों. मार्गी पेंढारी वगेरे यांचे दंगे पूर्वी होते ते निवारण जाहले. इतक्याकरितां मार्गाची निभावणी निर्वेध जाहली. पानशे व पुरंधरे फौजेसहीत वाळकीच्या समोर होते. त्यांचा उपद्रव कहीचा मात्र वरकड किमपि नाहीं. +++ आतां दिवसेंदिवस सुबिता दृष्टीस पडत चालली आहे. पेंढार वगैरे खानदेश प्रांती गेलें, आतां सरकारची मात्र फौज पारनेराजवळ आहे. +++ विठोजी होळकर, येशवंतराव होळकर यांचा बंधू. हजार दोन हजारांनिशीं निराळा फुटून, मुलखांत दंगा बहुत केला. गांवचें गांव उज्याड पाडिले. परंतु हल्लीं धोंडोपंत गोखले यांचे चिरंजीवांनीं कइद करून पुण्यास पाठविला. त्यास मार देऊन हत्तीचे पायांसी वैशाख शुद्ध चतुर्थीस बांधोन मारिला. वरकड मजकूर यथास्थित आहे. श्रीमंत राजश्री बाबासाहेब यांची स्वारी लौकरच जनस्थानीं निघावयाचा बेत आहे. च्यातुर्मास वास तिकडेस होईल, असा बेत आहे. शेवेसीं श्रुत होय, हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)