पत्रांक ५२८
श्री.
१७२३ आषाढ शुद्ध १
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे शेवेसीः-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना येथील कुशल ता। आषाढ शुद्ध १ परियेंत आपले आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. या सरजेराय घाटगे जामगांवास आले. हें दृष्टीनें माणसें पाहून आलें. बहुतकरून इकडूनच जावयाचा बोलवा आहे. काल प्रवरासं. गमकरांचें पत्र आलें कीं, आमचे येथील च्यार ब्राह्मण जामगांव पावेतों जातात, तुह्मांकडील कोणी पाठवा. त्यावरून दोघां चवघांस विच्यारलें. परंतु काणी जावयास सिद्ध होईना. मग चिरंजीव गणोबा आज पाठविले. ते आज प्रवरासंगमींच राहिले. उदईक तिरस्थळी मिळून दाहापांच ब्राह्मण जाणार, वौ। शास्त्रसंपन्न रा। शास्त्रीबावाही पुण्याहून उदईक जाणार, याप्रमाणें वर्तमान आहे. सरजेरायाची आवई इकडून जावयाची फार आहे. वाटेनें मोठा धूम करतो ! कदाचित् इकडून आला तर च्यार रुपये खर्चवेंच पडला, तर कैसी तजवीज करावी ? येथील विचारें तर सर्व ध्यानांतच आहे. त्यास, जैसी आज्ञा येईल तैसी वर्तणूक केली जाईल. श्रीमंत अमृतराव साहेबही सातळपाथळेयावर पुणतांब्याचे सुमारें आले आहेत. इकडे सुभानखाही सेवगांवचे ल (ग) त्यास आहेत. याप्रमाणें वर्तमान आहे. पुढें होईल तें लिहून पाठऊं. दुसरे पुण्याकडून जरीपटका वगैरे पांचच्यार हजार फौज गारदौंडची नदी उतरून यांचे मागें आले. श्रीमंत मोहोर्तानसीं बाहेर निघाले ! डेरा गारपिरावर दिल्हे. पुढें विशेष वर्तमान आढळल्यास मुजरत लिहून पाठऊं. हे विज्ञप्ती.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)